‘ब्रेग्झिट’ हाच पर्याय दीड वर्षांपूर्वीच्या सार्वमतात ब्रिटिशांनी निवडल्याने, आता ब्रिटनने युरोपीय महासंघातून बाहेर पडण्याची औपचारिक प्रक्रियाच काय ती बाकी आहे.. तीही २९ मार्च २०१९ पर्यंत पूर्ण होईलच. पण ब्रिटनने स्वत:च्या पायावर हा धोंडा पाडून घेण्याआधी जे शहाणे सूर उमटले होते, ते मात्र विरलेले नाहीत. उलट, केलेली चूक आता ब्रिटिश लोकांच्या नव्हे, पण तिथल्या लोकप्रतिनिधींच्या तरी लक्षात येते आहे! ब्रिटनमधील लिबरल डेमॉक्रॅट पक्षाचे एक नेते आणि २०१० ते २०१५ या काळातील उपपंतप्रधान निक क्लेग हे ‘ब्रेग्झिट नको’ म्हणून कंठशोष करीत होते. अखेर अलीकडेच त्यांनी, या विषयी पुस्तक लिहिले. पण ही बातमी, ते पुस्तक बाजारात आल्याची नव्हे..

हुजूर (कॉन्झव्‍‌र्हेटिव्ह) पक्षाशी केलेली युती, त्या पक्षाचे नेते आणि तत्कालीन पंतप्रधान डेव्हिड कॅमेरॉन यांच्यासह बुडालेली सत्तानौका, २०१५ च्याच नव्हे तर २०१७ च्याही निवडणुकीतला पराभव, असे धक्के खाऊनही क्लेग आणि त्यांचा लिबरल डेमॉक्रॅट पक्ष युरोपीय महासंघात राहण्याच्या बाजूचाच. यंदाच्या निवडणुकीत तर खुद्द क्लेग यांनाच पराभवाच्या नामुष्कीला सामोरे जावे लागले. एवढे झाले तरी लोकानुनयी राजकारण न करण्याचा त्यांच्या पक्षाचा शिरस्ता क्लेग यांनी कायम राखला आहेच. ब्रेग्झिटच्या निर्णयाचे ‘ऐतिहासिक चूक’ म्हणून वर्णन करणाऱ्या क्लेग यांनी ‘हाऊ टु स्टॉप ब्रेग्झिट (अ‍ॅण्ड मेक ब्रिटन ग्रेट अगेन)’ हे पुस्तक लिहिले. ब्रेग्झिटच्या फेरविचाराचे आवाहन करणारे आणि त्यासंदर्भातील कायद्यांची गुंतागुंत सुलभ करून सांगणारे हे पुस्तक आहे.

Dindori lok sabha election 2024, Communist Party of India (Marxist), jiva pandu gavit
दिंडोरीत कार्यकर्त्यांच्या दबावामुळे माकप उमेदवार उभा करणार
Israel-Iran Conflict
इराणला प्रत्युत्तर देऊ नका! जागतिक नेत्यांचे इस्रायलला आवाहन
Damania plea
दोषमुक्तीविरोधात दमानिया यांच्या याचिकेची उच्च न्यायालयाकडून दखल, भुजबळ कुटुंबीयांना नोटीस बजावून भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश
Hyderabad Inter-Faith Couple Attacked By Muslim
हैदराबादमध्ये आंतरधर्मीय जोडप्यावर हल्ला, VIDEO व्हायरल झाल्यानंतर पोलिसांकडून कारवाई, ४ जण गजाआड

बातमी अशी की, ते पुस्तक यंदाच्या ‘पार्लमेन्टरी बुक अवॉर्ड’साठी निवडले गेले! विशेष म्हणजे, या पुरस्कारासाठी ब्रिटनच्या पार्लमेण्ट सदस्यांचे मतदान घेतले जाते. त्यात सर्वाधिक पसंतीची मते मिळवणाऱ्या पुस्तकालाच हा पुरस्कार दिला जातो. त्यामुळे एक प्रकारे क्लेग यांच्या मतालाच ब्रिटनच्या पार्लमेण्टने पसंती दिल्यासारखे आहे. सध्या ब्रिटनमध्ये होत असलेली ब्रेग्झिटच्या फेरविचाराची मागणी पाहता, ब्रिटनच्या पार्लमेण्ट सदस्यांचा ब्रेग्झिटनंतरचा हा कौल पुरेसा बोलका आहे!