24 January 2021

News Flash

ओबामा-बायडेन : धोरणे आणि परिणाम

नवे राष्ट्राध्यक्ष म्हणून जो बायडेन या महिन्यात सूत्रे हाती घेतील.

बुधवारी अमेरिकी संसदभवन- कॅपिटॉलवर मावळते अध्यक्ष ट्रम्प यांच्या समर्थकांनी केलेला हल्ला पाहून सत्ताबदलाची औपचारिक प्रक्रिया कधी एकदा पार पडते, असे विवेकी अमेरिकींना आणि जगभरच्या लोकशाहीप्रेमींना वाटत असेल. नवे राष्ट्राध्यक्ष म्हणून जो बायडेन या महिन्यात सूत्रे हाती घेतील. बायडेन नेमस्त आहेत, लोकशाहीची बूज राखणारे आहेत, म्हणून ट्रम्प यांच्या आक्रस्ताळ्या, उचापतीखोर कार्यकाळापेक्षा अमेरिकेला आणि जगालाही ते बरे दिवस दाखवतील अशी आशा ठेवणेही ठीक. पण त्या आशेस वास्तवाचा पायाही हवाच. तो देणाऱ्या पुस्तकाविषयीची ही बुकबातमी! पुस्तकाचे शीर्षक आहे- ‘द सेंटर डिड नॉट होल्ड’ आणि त्याचे लेखक आहेत- कायदा व राज्यशास्त्राचे अभ्यासक रॉबर्ट आयसेनबर्ग! बायडेन हे बराक ओबामा यांच्या कार्यकाळात अमेरिकेचे उपाध्यक्ष होते. त्यामुळे ओबामा यांच्या काळातील धोरणात्मक निर्णयांत बायडेन यांचाही महत्त्वाचा वाटा राहिला, याची आठवण हे पुस्तक करून देते. ते करताना अशा अनेक निर्णयांचे दाखलेही आयसेनबर्ग यांनी दिले आहेत. उदा. जॉर्ज बुश यांच्या काळात झाले त्याच्या दहापट ड्रोन हल्ले ओबामा-बायडेन यांच्या काळात झाले किंवा याच काळात अमली पदार्थाच्या सेवनाने होणाऱ्या मृत्यूंत ४० टक्क्यांनी वाढ झाली. अर्थात, यावरून लेखकास बायडेन नकोतच की काय, असा प्रश्न पडेल; पण तो पडणाऱ्यांनी- हे पुस्तक अमेरिकी निवडणुकीआधी नाही तर तिच्या निकालानंतर प्रसिद्ध होत आहे, हे ध्यानात घेतलेले बरे!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 9, 2021 12:59 am

Web Title: the center did not hold mppg 94
Next Stories
1 मतभेदांनी घडलेली संस्कृती..
2 नाही नियम तरीही..
3 ‘हिंद स्वराज’मधले गांधीजी!
Just Now!
X