07 March 2021

News Flash

बस-मालमोटारीची धडक; २२ जखमी

एस. टी. बस आणि ऊसतोडणी कामगारांना घेऊन येणारी मालमोटार यांची समोरासमोर धडक होऊन २२ जण गंभीर जखमी झाले.

एस. टी. बस आणि ऊसतोडणी कामगारांना घेऊन येणारी मालमोटार यांची समोरासमोर धडक होऊन २२ जण गंभीर जखमी झाले. औरंगाबाद-बीड महामार्गावर जालना जिल्ह्य़ातील अंबड तालुक्यात महाकाळ फाटय़ाजवळ बुधवारी दुपारी तीनच्या सुमारास हा अपघात घडला. जखमींना बीड, अंबड, जालना व औरंगाबाद येथील रुग्णालयात हलविण्यात आले.
बीड आगाराची बीडहून औरंगाबादकडे जाणारी बस (एमएच २० बीएल ११००) व अंबडच्या समर्थ सहकारी साखर कारखान्यात ऊसतोड मजूर घेऊन जाणाऱ्या मालमोटारीची समोरासमोर धडक होऊन हा अपघात झाला. अपघातानंतर मालमोटार उलटली. जखमींमध्ये बसचालक गोपीनाथ जाधव (वय ३६, गेवराई), विजया बांगर (वय ४०, बीड) या दोन जखमींना पाचोड ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार करून औरंगाबादला हलविण्यात आले. सय्यदाबी शेख गनी (वय ४०), नारायण रोटे (वय ६९), उमाकांत देवळे (वय ६१), बाळू पवार (वय २०, सर्व औरंगाबाद), सय्यद इरफान इब्राहिम (वय २५), पल्लवी खडके (वय २८), प्रेमलता खडके (वय ५५, बीड), शारदा पांचाळ (वय ५२, धारूर) यांच्यावर अंबडला प्राथमिक उपचार करण्यात आले.
मालमोटारीतील संजय राठोड व जखमींना बीड येथे हलविण्यात आले. त्यांची नावे कळू शकली नाहीत. अपघातामुळे विस्कळीत झालेली वाहतूक तब्बल दीड तासानंतर सुरळीत करण्यात आली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 5, 2015 1:10 am

Web Title: bus motor accident 22 injured
टॅग : Bus,Injured
Next Stories
1 जीवलग फाऊंडेशनची आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांना भाऊबीजेची ओवाळणी
2 सेनेचा प्रवेश, भाजपला ठेंगा
3 भाजपच्या वर्चस्वाला सुरुंग; राष्ट्रवादीचे दमदार पुनरागमन
Just Now!
X