छत्रपती संभाजीनगर – शहरातील क्रांती चौक परिसरात शुक्रवारी दुपारनंतर ५० लाखांची रोकड पकडण्यात आली. जप्त केलेली ही रक्कम, ६० हजारांचे दोन मोबाईल व इतर साहित्य मिळून एकून ५२ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल असून प्राथमिक माहितीनुसार रक्कम हवालाची असल्याचे समजते. याप्रकरणी क्रांती चौक पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अर्जुन भास्कर मुंडलिक (वय ५०, तापडियानगर) व सिद्धेश अर्जुन मुंडलिक (वय २३), असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तींची नावे आहेत.

वरील दोघेही सिल्लेखाना येथून दुचाकीवर एका बॅगेतून ५० लाखांची रोकड घेऊन जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्याची माहिती सहायक पोलीस आयुक्त संपत शिंदे यांना मिळाली. त्यांनी या संदर्भातील माहिती पोलीस उपायुक्त नितीन बगाटे यांना दिल्यानंतर सापळा रचून रक्कम पकडली.

speeding truck with gas cylinders hits elderly couple
भरधाव एचपी गॅसच्या ट्रकने ज्येष्ठ दाम्पत्याला उडवले; आकाशवाणी चौकातील घटना, महिलेचा मृत्यू
80 sheep died after truck overturned
ट्रक उलटून ८० मेंढ्या दगावल्या
NEET exam
नीट परीक्षेविरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल, १८ जून रोजी सुनावणी होणार
neet, sambhajinagar
छत्रपती संभाजीनगरमध्ये नीटच्या विद्यार्थ्यांचे आंदोलन
nanded 4 died
नांदेडमध्ये चौघांचा मृत्यू; दोघांचा बुडून तर दोघे अपघातात ठार
dharashiv rain marathi news
तेवीस मंडळांत दमदार पाऊस; धाराशिव, कळंब तालुक्याला मोठ्या पावसाची प्रतिक्षा
beed, tentions in the beed, Offensive statement about Manoj Jarange Patil, Offensive statement about Pankaja Munde, beed news,
बीडमध्ये तणाव; पंकजा मुंडेंनंतर मनोज जरांगे पाटील यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान
Paralyzed antelope Species deer , Paralyzed antelope Species deer Gives Birth to Healthy Fawn, antelope Species deer, sarparagni wildlife rehabilitation centre, beed,
बीडमधील ‘सर्पराज्ञी’त पक्षाघाताने घायाळ हरणीचे बाळंतपण
bogus cotton seeds sambhajinagar
छत्रपती संभाजीनगर: बाेगस कापूस बियाण्यांची विक्री; गंगापूरमध्ये गुन्हा

हेही वाचा – एक कोटीची लाच मागणारा पोलीस निरीक्षक हरिभाऊ खाडे याच्याकडे घबाड सापडले; एक कोटी रोख, ७२ लाखांचे दागिने व स्थावर मालमत्ता

हेही वाचा – निवडणुकीच्या धामधुमीत २६७ शेतकऱ्यांच्या आत्महत्या

बरोबर आठवड्यापूर्वीच सिल्लेखाना चौकापासून काही अंतरावर असलेल्या पैठणगेट परिसरात ३९ लाख रुपयांची रोकड पकडली होती. त्याच दिवशी छत्रपती संभाजीनगरमधील निवडणुकीचा प्रचार थंडावला होता व १३ मे रोजी मतदान होते. त्याला मतदानासाठी रक्कम देण्याचा वापर करण्याचा संशय होता. आता शुक्रवारी पकडलेली ५० लाखांची रक्कम ही हवालाची असल्याची प्राथमिक माहिती आहे.