छत्रपती संभाजीनगर : फुलंब्री तालुक्यातील जातेगाव येथे शेतीतील वादातून लाठ्या-काठ्या मारून निर्घृण खून केल्याप्रकरणात चौघांना जन्मठेप व विविध कलमांखाली ४४ हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. आर. उबाळे यांनी बुधवारी सुनावली. सुनील तेजराव शेजवळ, संगीता सुनील शेजवळ, साहेबराव तेजराव शेजवळ आणि ज्योती साहेबराव शेजवळ, अशी आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी मृत कोंडिराम मालवणकर यांची पत्नी सुनीता यांनी १० जुलै २०१४ रोजी फुलंब्री पोलीस ठाण्यात विविध कलमांखाली सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.

हेही वाचा : तुळजाभवानीचा सोन्याचा प्राचीन मुकूट गायब! अनेक दुर्मिळ दागिन्यांच्या वजनात कमालीची तफावत; दोषी व्यक्ती ठरविण्यासाठी स्वतंत्र समिती

Two cases of sexual assault by teachers in Mumbai
मुंबईत शिक्षकाकडून लैंगिक अत्याचाराच्या आठवड्याभरात दोन घटना; पाच महिन्यात पोक्सोचे ५०९ गुन्हे
31st August Panchang & Marathi Rashi Bhavishya
श्रावणी शनिवार, ३१ ऑगस्ट पंचांग: महिन्याचा शेवटच्या दिवशी ‘या’ राशींवर होईल महादेव, शनिदेवाची कृपा; अचानक धनलाभ तर कलेला मिळेल कौतुकाची थाप; वाचा तुमचे राशीभविष्य
Surya nakshatra gochar 2024 From August 16 Sun enter in Magha Nakshatra
१६ ऑगस्टपासून नुसता पैसाच पैसा; सूर्याच्या मघा नक्षत्रातील प्रवेशाने ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींच्या मान-सन्मात अन् संपत्तीत वाढ
Gold import decline due to CAD
सोने आयातीत घट; चार महिन्यांत ४.२३ टक्क्यांनी घसरून १२.६४ अब्ज डॉलरवर
diseases mumbai, diseases outbreak,
मुंबईत साथीच्या आजाराचा प्रादुर्भाव; हिवताप, डेंग्यू, लेप्टो, स्वाईन फ्लूच्या रुग्णांमध्ये वाढ
Army terrorist encounter in Doda district
काश्मीरमध्ये कॅप्टन शहीद; एक अतिरेकी ठार, दोडा जिल्ह्यात लष्कर-दहशतवाद्यांमध्ये चकमक
MHADA, expensive houses, flat Worli,
मुंबई : म्हाडाची अल्प गटात महागडी घरे, वरळीतील सदनिका २.६२ कोटींची; मासिक उत्पन्नाची मर्यादा ७५ हजार रुपये
Fifth Anniversary of Article 370 Abrogation in jammu and kashmir
लेख : काश्मीर भानावर कधी येणार?

फिर्यादीनुसार जातेगाव येथील गट नं. ६५ मधील गायरान शेत जमीन मालवणकर व कुटूंबीयांकडे आहे. घटनेच्या दोन महिन्यांपूर्वीपासून मालवणकर कुटुंबीय व आरोपींमध्ये जमिनीवरून वाद सुरू होता. या प्रकरणात तपास अधिकारी तत्कालीन निरीक्षक वाय. वी. जाधव आणि उपनिरीक्षक जी. टी. गायकवाड यांनी दोषारोपपत्र दाखल केले. अतिरिक्त लोकाभियोक्ता राजू पहाडीया यांनी १५ साक्षीदारांचे जबाब नोंदवले. या प्रकरणात माहिती पुरवण्याचे काम ताठे यांनी केले. दंडाच्या रक्कमेपैकी ४० हजार रुपये फिर्यादीला देण्याचे आदेशित केले आहे.