लातूर जिल्हा परिषदेच्या स्वच्छता अभियानाच्या लोगोत ‘लई भारी’ हा शब्द घालण्यासाठी बराच खटाटोप करण्यात आला. कारण लातूरचे सुपुत्र अभिनेते रितेश देशमुख यांचा ‘लई भारी’ हा चित्रपट बराच गाजला. त्यामुळे शुक्रवारी जागतिक शौचालय दिनाचे औचित्य साधून लातूर जिल्हय़ाच्या नकाशात ‘आम्ही लातूरकर लई भारी, राखू स्वच्छता, जपू पाणी जीवापरी’ या संकल्पनेसह स्वच्छ व जलयुक्त लातूरचा ध्यास बाळगणाऱ्या पाणी व स्वच्छताविषयक लोगोचे अनावरण स्थायी समितीच्या बठकीत करण्यात आले.
देशपातळीवर स्वच्छ भारत मिशनने गांधीजींच्या प्रतिकात्मक चष्म्यातून स्वच्छ भारताचे स्वप्न पाहणारा एक पाऊल स्वच्छतेकडे या संकल्पनेसह लोगो स्वीकारला. राज्यस्तरावर महाराष्ट्र राज्याने राज्याच्या नकाशासह माझा महाराष्ट्र, स्वच्छ महाराष्ट्र या संकल्पनेसह लोगो स्वीकारला. राज्याच्या धर्तीवर सर्व जिल्हय़ांना आपल्या जिल्हय़ाचा आत्मसन्मान जपणारा लोगो तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. पाणी व स्वच्छता या विषयाचे महत्त्व लक्षात घेता या विषयासोबत स्थानिक आत्मीयता जोडण्याच्या दृष्टीने राज्यातील सर्व जिल्हय़ांनी आपले लोगो तयार केले आहेत. यातही लातूरने आपले वेगळेपण जपत आपली भौगोलिक ओळख दाखवणाऱ्या नकाशात स्थानिक भाषेत लोकप्रिय शब्द असलेला ‘लई भारी’ लोगोमध्ये वापरला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lai bhari logo in swachata abhiyan in latur
First published on: 21-11-2015 at 01:20 IST