औरंगाबादेत धरणे, लातूर आणि हिंगोलीत मोर्चा

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मोठे मोर्चे निघत असल्याने त्यांना आरक्षण देण्यासाठी राज्यसरकार काही ना काही हालचाली करताना दिसत आहेत. मात्र, त्याच वेळी मुस्लिमांना ५ टक्के आरक्षण देण्याबाबत सरकार कमालीचे उदासीन असल्याचा आरोप करत जमीयत उलेमा हिंद संघटनेने मंगळवारी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. या आंदोलनात मोठय़ा प्रमाणात नागरिकांचा सहभाग होता.

स्वातंत्र्योत्तर काळात भारतीय मुस्लीम समाज सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक क्षेत्रात मागे फेकला गेला. या अनुषंगाने न्यायमूर्ती सच्चर, न्यायमूर्ती रंगनाथ मिश्र व मेहमूर्दर रहेमान कमेटीने मुस्लीम समाजाच्या मागासलेपणाची चर्चा अहवालात केली आहे. या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आरक्षणाची शिफारसही केली आहे. त्याची दखल घेत महाराष्ट्र सरकारने मुस्लीम समाजासाठी ५ टक्के आरक्षण देणे वैध ठरविले. मात्र, मुस्लीम समाजाच्या आरक्षणाच्या अध्यादेशाची कालमर्यादा संपूनही सरकारने काही पावले उचलली नाहीत. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मोर्चे निघत असल्याने त्यांना आरक्षण देण्यासाठी सरकार काही हालचाली करत असल्याचे दिसू लागले आहे. मात्र, मुस्लिमांच्या आरक्षणासाठी सरकार काहीच करत नसल्याने त्यावर नाराजी व्यक्त करत जमीयत उलेमा संघटनेचे अध्यक्ष हाफीज नदीम सिद्दीकी यांनी सरकारवर टीका केली. विभागीय आयुक्तांना दिलेल्या निवेदनात मुस्लिमांना ५ टक्के आरक्षण देण्याची मागणी त्यांनी केली. धरणे आंदोलनात मुस्लीम तरुणांचा सहभाग लक्षणीय होता. या वेळी  संघटनेचे शहराध्यक्ष खलील खान, मोईज फारुखी, मौलाना निजामोद्दीन मिल्ली आदींची उपस्थिती होती.

आरक्षणाच्या मागणीसाठी औशामध्ये मोर्चा

लातूर- आरक्षणाच्या मागणीसाठी  शहरातील किल्ले मदानावरून सकाळी ११.३० वाजता निघालेला मोर्चा जलालशाही चौक, गांधी चौक माग्रे तहसील कार्यालयावर गेला. या मोर्चात लहान मुलांसह तरुणांनी हातात आरक्षणाच्या मागणीचे फलक व झेंडे घेतले होते. यापूर्वीच्या सरकारने मुस्लीम समाजाला आरक्षणाची शिफारस केली होती. सध्याच्या सरकारने याबाबतीत काही पावले उचलली नाहीत. सरकार जाणीवपूर्वक चालढकल करत असल्याचा आरोप मोच्रेकऱ्यांनी लेखी निवेदनात केला आहे.

मुस्लीम समाजाला ५ टक्के आरक्षण मंजूर न केल्यास महाराष्ट्रभर आंदोलन करण्याचा इशारा या प्रसंगी देण्यात आला. अहेमद सिद्दीकी मुसा कासमी, मुजम्मील आली मुक्ती याकूब काश्मी, इरफान सौदागर, आदींच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत.

िहगोलीमध्ये भव्य मोर्चा

हिंगोली- जमीयत उलेमा िहद या राष्ट्रीय संघटनेच्या वतीने मुस्लीम समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी भव्य मोर्चा काढण्यात आला. या वेळी मुफ्ती शफीक खान यांचे भाषण झाले. मुस्लीम समाजाच्या ५ टक्के आरक्षणाचा मुद्दा तातडीने कारवाई करून तडीस न्यावा, अन्यथा जमीयत उलेमा िहद संपूर्ण राज्यात आंदोलनाचा मार्ग पत्कारले, असा इशारा दिला आहे.

वडवणीत मूक मोर्चा

बीड- मुस्लिम समाज सामाजिक, शैक्षणिक आणि आíथक बाबतीत मागे पडला आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी सातत्याने पाठपुरावा केलेला असून न्यायालयानेही पाच टक्के शैक्षणिक आरक्षण वैध ठरवले होते. मात्र, राज्य सरकार या मागणीकडे कानाडोळा करत असल्याचा आरोप करत जमिअत उलमा ए िहदच्या नेतृत्वाखाली जिल्हाभरात धरणे आंदोलन करण्यात आले.बीड जिल्ह्यात मंगळवारी ठिकठिकाणच्या तहसील कार्यालयासमोर मुस्लिम समाजाने आरक्षणाच्या मागणीसाठी धरणे आंदोलन केले. बीडमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जमिअत उलमा ए िहदचे जिल्हाध्यक्ष मुफ्ती मोहंमद जावेद हुसनी, अब्दुल्ला कुरेशी, मौलाना साबेर रशिदी, माजी आमदार सय्यद सलीम आदींच्या उपस्थितीत आंदोलन करून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

मुस्लीम समाजास ५ टक्के आरक्षणाची मागणी

जालना- शासकीय नोक ऱ्या आणि शिक्षणात मुस्लीम समाजास पाच टक्के आरक्षण देण्याच्या मागणीसाठी ‘जमियत उलेमा हिंद’च्या वतीने मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे धरण्यात आले. ‘जमियता उलेमा हिंद’च्या जिल्हा शाखेचे कार्यकारी अध्यक्ष इकबाल पाशा, सचिव मौलाना अहमदखान, उपसचिव मौलाना रइस, जालना शहराध्यक्ष मुक्ती अब्दूर्रहेमान, शहर सचिव मुक्ती सोहेल, शहर उपसचिव हफीज जुबेर यांच्यासह अब्दूल हफीज, शाह आलमखान, मिर्जा अन्वर बेग, मोहम्मद माजेद शेख अमीर, अ‍ॅड अश्फाक पठाण यांची नावे निवेदनावर आहेत. माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे आमदार राजेश टोपे, जिल्हा काँग्रेस अध्यक्ष सुरेश जेथलिया, माजी आमदार कैलास गोरंटय़ाल, काँग्रेसचे जालना शहर अध्यक्ष अब्दूल हाफीज यांनीही मागणीस पाठिंबा दर्शविला आहे.

तालुक्यांमध्ये मोच्रे, आज परभणीत धरणे

परभणी- मुस्लिम समाजाला शैक्षणिक व नोकरीमध्ये पाच टक्के आरक्षण देण्यात यावे, या मागणीसाठी जिल्हाभरातून तहसील कार्यालयावर जमीयत ए उलेमा िहद या संघटनेने मोच्रे काढून निवेदने सादर केली. उद्या बुधवारी परभणीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे धरण्यात येणार आहेत. आज सेलू, जिंतूर, पाथरी, पालम, सोनपेठ या ठिकाणी मोच्रे काढून आरक्षणाची मागणी केली.

सकल मराठा समाजाने सप्टेंबरमध्ये आरक्षणासाठी मोर्चा काढला तर काल सोमवारी परभणीत बौद्ध व इतर मागासवर्गीयांनी अ‍ॅट्रॉसिटीचा कायदा अधिक कडक करावा, या मागणीसाठी मोर्चा काढला. मराठा व बौद्ध समाजाच्या मोर्चापाठोपाठ आज जमीयत उलेमा िहद या राष्ट्रीय संघटनेने जिल्हाभरातील तहसील कार्यालयावर मोर्चा काढत आरक्षणाची मागणी केली.

सेलू येथे काढण्यात आलेल्या मुस्लिम मोर्चात माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर, अ‍ॅड. हेमंत आडळकर सहभागी झाले होते. तर याच ठिकाणी सकल मराठा समाजाने या मोर्चाला जाहीर पाठिंबा दिला. जिंतूर येथे जमीयत उलेमा िहदच्या मूक मोर्चात आ. विजय भांबळे, माजी नगराध्यक्ष सचिन गोरे, प्रताप देशमुख, डॉ. पंडित दराडे, राष्ट्रवादीचे सर्व नगरसेवक तसेच काँग्रेसच्या नगरसेवकांनी आपला पाठिंबा देऊन मोर्चात सहभाग नोंदवला.

Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Muslim reservation morcha in marathwada
First published on: 19-10-2016 at 01:41 IST