इसिसने फ्रान्समधील पॅरिस शहरावर केलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ लातुरात मुस्लीम समाजाच्या वतीने गांधी चौकात मूक निदर्शने करून जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन दिले.
गेल्या आठवडय़ात फ्रान्समधील पॅरिस शहरावर इसिस या दहशतवादी संघटनेने बॉम्बहल्ले करून निष्पापांचे जीव घेतले. हे कृत्य माणुसकीला काळिमा फासणारे असून या दहशतवादी संघटनेला इस्लामशी जोडण्याचे प्रयत्न काही जणांकडून होत आहेत हे पूर्णपणे चुकीचे आहे. जगातील कोणताही धर्म हा दहशतवादाचे समर्थन करत नाही. इस्लाम हा मानवतावादी धर्म आहे, त्यामुळे इसिसच्या हल्ल्याचा आम्ही तीव्र निषेध करतो, असे मत मांडत गांधी चौकात मुस्लीम बांधवांनी निदर्शने केली. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनही देण्यात आले. या प्रसंगी मोहसीन खान, मोईज शेख, अॅड. आर. झेड. हाश्मी, अब्दुल मोमीन, मिनहाज शेख, इस्माईल फुलारी, अॅड. आर. वाय. शेख, अब्दुल गालिब आदी उपस्थित होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Silent demonstration against isis attacked
First published on: 22-11-2015 at 01:40 IST