06 August 2020

News Flash

Ishita

सोलापुरात बंदला दुसऱ्या दिवशीही संमिश्र प्रतिसाद

केंद्र सरकारच्या कामगारविरोधी धोरणाच्या विरोधात बुधवारी व गुरुवारी विविध ३५ कामगार संघटनांनी पुकारलेल्या देशव्यापी ‘बंद’ला सोलापूर शहर व जिल्हय़ात दुसऱ्या दिवशीही संमिश्र प्रतिसाद मिळाला. यंत्रमाग व विडी कामगारांचा गुरुवारी बंदमध्ये चांगला प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. यानिमित्ताने होम मैदानावर आयोजित कामगारांच्या महापडाव अभियानास अपेक्षित प्रतिसाद मिळू शकला नाही.

दक्षिण सोलापुरात कारकलला सापडले प्राचीन अवशेष

दक्षिण सोलापूर तालुक्यातील कारकल येथे सोलापूर विद्यापीठातील पुरातत्त्वशास्त्र विभागाने केलेल्या उत्खननात आद्य ऐतिहासिक कालखंडांचे तसेच रोमन संस्कृतीचे पुरावे आढळून आल्याचे विभागप्रमुख डॉ. माया पाटील यांनी सांगितले.
भीमा नदीच्या तीरावर कारकल हे छोटेस गाव आहे. या ठिकाणी प्राचीन संस्कृतीच्या खुणा आढळून आल्या. त्यामुळे पुरातत्त्वीय उत्खननासाठी सोलापूर विद्यापीठाच्या मान्यतेने नवी दिल्लीच्या भारतीय पुरातत्त्वशास्त्र सर्वेक्षण विभागाकडे प्रस्ताव आला होता. या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर प्रत्यक्ष उत्खनन कार्याला प्रारंभ झाला

यंत्रमाग कामगारांच्या आंदोलनामुळे १५०० कोटी रुपयांची उलाढाल ठप्प

इचलकरंजीतील यंत्रमाग कामगारांच्या गेले महिनाभर सुरू असलेल्या कामबंद आंदोलनामुळे सुमारे १५०० कोटी रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे. वस्त्रनगरीच्या आर्थिक नाडय़ा आवळल्या गेल्याच आहेत. शिवाय, या नगरीशी जोडले गेलेले उत्तर-दक्षिण भारत व्यापारी कनेक्शन थंडावले आहे. उत्तर भारतातील कापड व्यापारावर तर दक्षिण भारतातील सूत व्यापाऱ्यावर परिणाम झाला असून त्यांनाही दररोज कोटय़वधी रुपयांची झळ बसत आहे. देशातील सूती कापडाची प्रमुख बाजारपेठ असलेल्या इचलकरंजीतील कामगारांचे आंदोलन कधी एकदा संपते याकडे उत्तर-दक्षिण भारतातील वस्त्रजगताचे लक्ष वेधले आहे.

बांधकाम कामगारांचा कोल्हापुरात मोर्चा

बांधकाम कामगारांसाठी शासनाने लागू केलेल्या कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी गुरुवारी कोल्हापूर जिल्हय़ातील बांधकाम कामगारांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. मोर्चामध्ये जिल्हय़ातील बांधकाम कामगार मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते. या कामगारांनी केंद्र शासनाविरुद्ध सुरू असलेल्या कामगारांच्या लढय़ाला पाठिंबा जाहीर केला.

अंगणवाडी सेविकांचा विविध मागण्यांसाठी थाळी नाद मोर्चा

महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाच्यावतीने अंगणवाडी सेविकांनी बुधवारी कराड तहसील कचेरीवर मोर्चा काढून थाळी नाद आंदोलन केले. विविध जिल्हय़ांमधून आलेल्या अंगणवाडी सेविकांना पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबोहर ठिय्या आंदोलनास मनाई केल्यामुळे हजारांवर अंगणवाडी सेविकांनी तहसील कार्यालयाच्या दिशेने मोर्चा काढला.

यंत्रमाग कामगारांचा मोर्चा; ८५ पैसे मजुरीचा प्रस्ताव मान्य

इचलकरंजीतील यंत्रमाग कामगारांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेला ८५ पैसे मजुरीचा प्रस्ताव मान्य असल्याचे गुरुवारी स्पष्ट केले. मात्र बोनसच्या विषयाला त्यांनी बगल दिली. आठ तास पाळी, हजेरी कार्ड या मागण्यांसाठी कामगार नेते आग्रही राहिले.

मंगळवेढय़ाजवळ अपघातात दोघा पिता-पुत्राचा मृत्यू

ट्रॅक्टर व मोटारसायकल यांची धडक बसून घडलेल्या अपघातात मोटारसायकलवरील ऊसतोड कामगार असलेल्या दोघा पिता-पुत्राचा जागीच मृत्यू झाला. मंगळवेढय़ाजवळ हा अपघात घडला. मल्हारी धोंडिबा बिचकुले (वय ५५) शिंगू मल्हारी बिचकुले (वय १८,रा. खुपसुंगी, ता. मंगळवेढा) अशी मृत पिता-पुत्राची नावे आहेत.

अल्पवयीन मुलीच्या खुनाची घटना उघड

सराफाला लुटण्यात आलेल्या गुन्ह्य़ाची चौकशी करीत असतांना येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने इचलकरंजीतील अल्पवयीन मुलीच्या खुनाचा धक्कादायक प्रकार बुधवारी सायंकाळी उघडकीस आणला. कोमल पवार असे मुलीचे नांव आहे. याप्रकरणी तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांनी प्रेमप्रकरणातून खून केल्याची कबुली दिली आहे. तब्बल अडीच महिन्यानंतर शहापूर येथील खणीतून सडलेला मृतदेह आज बाहेर काढण्यात आला.

किरकोळ क्षेत्रातील विदेशी गुंतवणुकीविरुद्ध निवेदन

किरकोळ क्षेत्रात थेट विदेशी गुंतवणूकीवर विरोधी व्यक्त करण्यासाठी व अन्न सुरक्षा मानके कायद्यातील जाचक अटींविरोधात काल कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी संजय पवार यांना भेटून निवेदन देण्यात आले. या वेळी संजय पवार यांनी शासनाशी पत्रव्यवहार करून योग्यती कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले.

किसान सभेच्या वतीने राजू शेट्टी यांचा निषेध

कृषिमंत्री शरद पवार यांच्यावर सवंग लोकप्रियतेसाठी राजकीय द्वेषापोटी आरोप करणाऱ्या खासदार राजू शेट्टी यांचा राष्ट्रवादी किसान सभेच्या वतीने पत्रकाद्वारे निषेध करण्यात आला. शेतकऱ्यांच्या नेत्यावर टीका करणाऱ्यांना जशास तसे उत्तर किसान सभा देईल, असा इशारा दिला आहे.

अशिक्षित शेतक ऱ्याचा पुत्र बनला शिक्षणाधिकारी

जिद्द, चिकाटी व कठोर परिश्रमाच्या जोरावर एका अशिक्षित शेतकऱ्याच्या शिक्षकपुत्राने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या शिक्षणाधिकारी सरळसेवा परीक्षेत खुल्या गटात आठवे स्थान मिळविले आहे. राजेश क्षीरसागर असे त्याचे नाव आहे. हा गुणवंत तरुण माळशिरस तालुक्यातील माळीनगरचा रहिवासी आहे.

वृक्षारोपण जबाबदारी उल्लंघनाबद्दल आयआरबी कंपनीस नोटीस बजावणार

शहरातील रस्ते बनवताना वृक्षारोपणाच्या जबाबदारीचे उल्लंघन करणाऱ्या आयआरबी कंपनी व रस्तेविकास महामंडळावर कारवाई करणारी नोटीस तातडीने बजावण्यात येईल. त्यांना न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे वृक्षारोपण करण्यास भाग पाडण्यात येईल, अशी ग्वाही महापालिकेच्या आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी बुधवारी टोलविरोधी कृती समितीच्या सदस्यांना दिली.

औद्योगिक बंदला कोल्हापुरात प्रतिसाद

देशपातळीवरील दोन दिवसीय औद्योगिक बंदला बुधवारी कोल्हापुरातील श्रमिकांनी चांगला प्रतिसाद दिला. संघटित व असंघटित क्षेत्रातील कामगार आंदोलनात उतरल्याने औद्योगिक पातळीवर शांतता होती. सर्व कामगार संघटना कृती समितीच्या नेतृत्वाखाली काढलेल्या मोर्चामध्ये सुमारे ४ हजारांहून अधिक कामगार सहभागी झाले होते. बंदमुळे बँक ग्राहकांना चांगलाच फटका बसला.

इचलकरंजीत कामगारांचा मोर्चा

केंद्रीय कामगार संघटनांनी पुकारलेल्या भारत बंद आंदोलनांतर्गत इचलकरंजीत कामगारांनी मोर्चा काढून शासनाविरोधात निदर्शने केली. तर नगरपालिका कर्मचारी, शिक्षक यांनी काळय़ा फिती लावून काम केले.

सोलापुरात बंदला संमिश्र प्रतिसाद; राज्य कर्मचारी व कामगारांचा मोर्चा

केंद्र सरकारच्या कामगारविरोधी धोरणाच्या विरोधात बुधवारी व गुरूवारी विविध ३५ कामगार संघटनांनी पुकारलेल्या देशव्यापी ‘बंद’ला सोलापूर शहर व जिल्ह्य़ात संमिश्र प्रतिसाद मिळाला. यंत्रमाग व विडी उद्योगांना बुधवारी साप्ताहिक सुटी असल्यामुळे त्यांचा बंदमधील सहभाग गृहीत धरला गेला नाही. मात्र उद्या गुरूवारी या कामगारांचा बंदमध्ये सहभाग किती राहणार, याचे चित्र स्पष्ट होणार आहे.

लाच स्वीकारताना फौजदारास पकडले

गुन्हेगार असणाऱ्या आरोपीकडून एक हजार रुपयांची लाच स्वीकारताना सांगली येथील विश्रामबाग पोलीस ठाण्यातील सहायक फौजदारास रंगेहात पकडले. या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सहायक फौजदार नंदकिशोर रघुनाथ कोळेकर यास अटक केली असून त्याच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

डॉ. लहाने यांच्याकडून ३८६ नेत्ररुग्णांवर शस्त्रक्रिया

माढा तालुक्यातील पिंपळनेर येथील विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना व माढेश्वरी नागरी सहकारी बँक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मोफत नेत्रदान शिबिरात मुंबईच्या जे. जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता तथा ज्येष्ठ नेत्ररोगतज्ज्ञ पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांनी ३८६ नेत्ररुग्णांवर शस्त्रक्रिया केल्या.

वृत्तपत्रांचे ‘व्रत’ऐवजी व्यवसाय झाला- आपटे

वृत्तपत्र चालवणे हे आज व्रत न राहता त्याचा व्यवसाय होऊ पाहात आहे. त्यात चांगल्या कामाला, विचाराला प्रसिद्धीऐवजी भडक गोष्टींना प्राधान्य मिळत असून, समाजालाही ते आवडत असल्याची खंत व्यक्त करताना अशा विपरीत परिस्थितीमध्ये समाज बदलण्याचे काम वृत्तपत्रांचे असल्याने त्यासाठी वृत्तपत्रे ही व्रतपत्रे म्हणूनच चालवली गेली पाहिजेत, असे आवाहन साप्ताहिक आपले जगचे संपादक तथा ज्येष्ठ पत्रकार वसंतराव आपटे यांनी केले.

डॉ. डी. वाय. पाटील ट्रस्टच्या वतीने गृहिणी महोत्सव

बचतगट व महिला मंडळाच्या माध्यमातून महिलांनी तयार केलेल्या विविध उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी डॉ. डी. वाय. पाटील कला, क्रीडा, शैक्षणिक व सांस्कृतिक ट्रस्टच्या वतीने ‘गृहिणी महोत्सव २०१३’चे आयोजन करण्यात आले आहे. प्रतिमा सतेज पाटील यांनी या महोत्सवाचे आयोजन केले आहे.

कराड पंचायत समितीच्या सभेत तालुक्यातील दुष्काळावर चर्चा

सातारा जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये फेब्रुवारी महिन्यातच पाण्याचे भीषण दुर्भिक्ष जाणवू लागले आहे. दुष्काळग्रस्तांना मदतीचा हात मिळावा म्हणून कराड पंचायत समिती सदस्यांचा एक दिवसाचा भत्ता देण्याचा निर्णय घेण्यात आला. दयानंद पाटील यांनी मांडलेल्या या ठरावास सर्व सदस्यांनी एकमताने मंजुरी दिली.

‘नेट’ परीक्षेसाठी संगणक प्रणाली

बारावी सायन्सनंतर मेडिकल व इंजिनिअरिंगसाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना ‘नेट’ची परीक्षेसाठी १७ हजार प्रश्न असलेली संगणक प्रणाली सुशील इंगळे, अभिजित कोळी व अमित ठाकूर यांनी तयार केली आहे. ते म्हणाले, की पारंपरिक पद्धतीने विद्यार्थ्यांना नेट परीक्षेस सामारे जावे लागते. ही अडचण विचारात घेऊन हे ‘सॉफ्टवेअर’ विकसित केले आहे. यामध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, बायॉलोजी आणि मॅथेमेटिक्स विषयाचा समावेश केला आहे.

शहा कन्स्ट्रक्शनची आयकर विभागाकडून नियमित तपासणी!

राज्यमंत्री भास्कर जाधव यांच्या मुला-मुलीच्या विवाहानंतर चर्चेत आलेल्या कराडातील शहा कन्स्ट्रक्शनची आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी चौकशी केली. पंकज हॉटेलमध्ये असलेले शहा कन्स्ट्रक्शनचे कार्यालय व हॉटेलच्या कागदपत्रांचीही यावेळी तपासणी करण्यात आली. यावर संबंधितांनी ही नियमित तपासणी असल्याचे म्हटले आहे.

स्वत:चा ऊस जळत असताना तरुणाकडून मोफत पाणीपुरवठा…

मोहोळ तालक्यातील तीन हजार लोकसंख्या असलेल्या शिरापूर या गावात दुष्काळामुळे भीषण पाणीटंचाई जाणवत आहे. विशेषत: महिलावर्गाला पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. गावातील सर्व कूपनलिका बंद पडल्या असून विहिरीही आटल्या आहेत. परंतु अशा प्रतिकूल परिस्थितीत स्वत:च्या शेतातील उसाच्या पिकाकडे दुर्लक्ष करून अनिल पाटील या शेतकऱ्याने सामाजिक बांधिलकी म्हणून स्वखर्चाने संपूर्ण गावाला पाणीपुरवठा सुरू केला आहे.

नायकवडी यांची पक्षातून हकालपट्टी करा- दिनकर पाटील

शाही विवाह सोहळय़ामुळे अडचणीत आलेले सांगलीचे महापौर इद्रीस नायकवडी हे आता राजकीयदृष्टय़ाही पेचात सापडले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे सांगली जिल्हाध्यक्ष माजी आमदार दिनकर पाटील यांनी महापौर नायकवडी यांचा राष्ट्रवादी काँग्रेसशी संबंध उरला नसल्याचे स्पष्ट करून त्यांची पक्षातून हकालपट्टी करावी, अशी मागणी केली आ

Just Now!
X