पैसा हा आजच्या काळात अत्यंत महत्वाची गोष्ट झाली आहे. प्रत्येकजण पैसा कमावण्यासाठी धडपडत आहे. जगात असे अनेक लोक आहेत जे आजही प्रामाणिकपणे मेहनत करुन एक एक रुपया कमावत आहे तर दुसरीकडे असेही लोक आहे ज्यांना फार कष्ट न घेता झटपट पैसा कमावायचा असतो. त्यासाठी हे लोक कोणत्याही थराला जातात. अनेक लोक कर्ज काढतात आणि आपल्या गरजा भागवण्याचा प्रयत्न करतात पण जेव्हा घेतलेले कर्ज फेडण्याची वेळ येते तेव्हा मात्र हे लोक पळवाट शोधतात. पैशांसाठी होणाऱ्या गुन्हेगारीचे प्रमाणा काही कमी नाही दरम्यान एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका महिलेने कर्ज काढण्यासाठी असे काही कृत्य केले आहे ज्याची कल्पनाही कोणी केली नसेल.
त्याचे झाले असे की , एका ब्राझिलियन महिला एका मृत व्यक्तीच्या सहीचा वापर करून कर्ज मिळवण्याचा प्रयत्न करत होती. दरम्यान महिलेला अटक करण्यात आली आहे. तुम्हाला विश्वास बसणार नाही पण ही महिला मृत व्यक्तीला व्हिलचेअरवर बसवून थेट बँकेत घेऊन गेली. रॉयटर्सला पोलिसांनी दिलेल्या , ही घटना मंगळवारी रिओ उपनगरात घडली.
एरिका व्हिएरा न्युनेस या महिलला व्हिलचेअरवर बसलेल्या व्यक्तीला घेऊ बँकेत गेली. हा व्यक्ती काही तासांपूर्वीच मृत पावला होता. बँकेतील कर्मचाऱ्यांना तिने सांगितले की, तो व्यक्ती तिचा काका आहे, त्याला १७,००० रियास (अंदाजे २.७१ लाख रुपये) कर्ज घ्यायचे होते. या एरिकाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडीओमधील व्यक्ती मृत असल्याचे स्पष्टपणे दिसते कारण त्या व्यक्तीची मान मागे पुढे पडते आहे पण एरिका त्याच्या मानेला हात लावून आधार देत असल्याचे दिसते. त्याच्या शरीरात प्राण नसल्याने त्याचा हात देखील टेबलावरून आपोआप खाली जात आहे. एरिका त्या व्यक्तीचा हात पकडून त्याच्या हाताने सही करण्याचा प्रयत्न करत आहे. प्रतिसाद मिळवण्याच्या प्रयत्नात, एरिका काकाशी बोलत असल्याचे भासवून म्हणते की, “काका, तुम्ही ऐकत आहात का? तुम्हाला स्वाक्षरी करणे आवश्यक आहे.” अर्थात ती व्यक्ती मृत असल्याने काहीच प्रतिसाद देत नाही त्याच्याऐवजी मी सही करू का असेही ती बँक कर्मचाऱ्यांना सुचवते. “तुम्हाला बरे वाटत नसेल तुम्हाला हॉस्पिटलमध्ये नेण्यात येईल”, असे एरिकामृत काकांना सांगत असल्याचे व्हिडीओमध्ये दिसते आहे.’
हेही वाचा – भांडी घासावी लागू नये व्यक्तीने शोधला भन्नाट जुगाड! हर्ष गोयंकांनी शेअर केला मजेशीर व्हिडीओ
काकांचा चेहरा पाहून जेव्हा त्यांची चौकशी केली तेव्हा ती त्यांना बरे नाही असे सांगते. तिची सर्व वर्तणूक संशयास्पद असल्याची शंका बँक कर्मचाऱ्यांना आली. त्यामुळे त्यांनी तातडीने पोलिसांना बोलावून घेतले. पोलिस तातडीने घटना स्थळी दाखल झाले आणि एरिकाला ताब्यात घेतले. मृत व्यक्तीचे शरीर पुढील तपासाठी पाठवण्यात आले.
एरिकाने असा दावा केला की, तो व्यक्ती बँकेत आल्यानंतर मेला आहे पण पोलिसांच्या फॉरेन्सिक विश्लेषणात त्याचा मृत्यू अगोदर झाल्याचे निष्पन्न झाले.
हेही वाचा – गुलाबी सायकल अन् तिच्या चेहऱ्यावरील आनंद! स्वयंपाकीण ताईचे कष्ट वाचवण्यासाठी व्यक्तीने केली ‘ही’ खास मदत
न्यूयॉर्क पोस्टच्या वृत्तानुसार पोलिस प्रमुख फॅबियो लुईझ यांनी टीव्ही ग्लोबोला माहिती देताना सांगितले, की“आधीपासूनच मृत व्यक्तीला घेऊ एरिकाने बँकेत प्रवेश केला आणि कर्जासाठी त्याची सही घेण्याचे नाटक करण्याचा प्रयत्न केला.
हेही वाचा – पुराच्या पाण्यात बुडणाऱ्या मांजरीची जीव वाचवण्यासाठी धडपड! कारच्या दरवाजाच्या हँडलला लटकून….पाहा थरारक Video
पोलिसांनी सांगितले ते त्या व्यक्तीच्या मृत्यूची चौकशी करतील आणि एरिका व्हिएरा नुनेसचे त्याच्याशी नाते शोधतील. संशयित बँकेच्या फसवणुकीत इतर नातेवाईकांचाही सहभाग ते तपासणार आहेत.