scorecardresearch

झकास! बॉलीवूड अभिनेता अनिल कपूरचा त्याच्या ‘या’ लक्झरी कारसोबतचा फोटो झाला व्हायरल

अनिल कपूरचा लक्झरी व्हॅन सोबतचा फोटो सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

झकास! बॉलीवूड अभिनेता अनिल कपूरचा त्याच्या ‘या’ लक्झरी कारसोबतचा फोटो झाला व्हायरल
अनिल कपूर त्याच्या Toyota Vellfire MPV मध्ये दिसला. (Photo-Youtube)

बॉलिवूडचा लखन म्हणजे अभिनेता अनिल कपूरने आजवर विविध भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलंय. अनिल कपूर सध्या फिटनेससाठी ओळखले जातात. नुकतेच ज्येष्ठ अभिनेते अनिल कपूर त्याच्या अति-आलिशान टोयोटा वेलफायर प्रीमियम MPV मध्ये विमानतळावर दिसले. दक्षिण पूर्व आशियाई बाजारपेठांमध्ये ही लक्झरी व्हॅन लोकप्रिय आहे. अनिल कपूरचा लक्झरी व्हॅन सोबतचा फोटो सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

कशी आहे ‘ही’ लक्झरी व्हॅन

टोयोटा वेलफायरला लाँच झाल्यापासून मार्केटमध्ये मध्यम यश मिळाले आहे. हे अशा लोकांसाठी आहे, ज्यांना फिरताना कॉर्पोरेट मीटिंग किंवा काही प्रकारचे गेट-टूगेदर आयोजित करणे आवडते. मागचा डबा प्रवाशांसाठी तसेच त्यांच्या सामानासाठी लाउंज आणि भरपूर जागा देतो.

टोयोटा किर्लोस्कर मोटर्स कंपनीची हाय एंड एमपीव्ही Toyota Vellfire एमपीव्ही काळ्या रंगात आहे. सेंटर कन्सोलच्या चारही बाजूंनी सिल्वर फिनिशिंग देण्यात आली आहे, ज्यात टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आणि एसी मॉड्यूल आहे. याशिवाय वेलफायरमध्ये लेदर वूडन फिनिश, मल्टी-फंक्शन स्टिअरिंग व्हील आणि ट्वीन पॉड इंस्ट्रुमेंट क्लस्टरचाही समावेश आहे.

(आणखी वाचा : कार्तिक आर्यनला ‘या’ बाइकचे वेड; घेऊन फिरला मुंबईतल्या रस्त्यांवर! )

या एमपीव्हीमध्ये व्हेंटिलेटेड आणि हीटेड सीट्स आहेत. ज्यात मेमरी आणि रिक्लायनिंगची सुविधा आहे. याशिवाय लेदर अपहोल्स्ट्री, पॉवर साइड आणि रिअर डोअर, ट्वीन मोनोरुफ, सनशेड्स, अँबिएंट लायटिंग, सीट टेबल्स, स्वयंचलित वातावरण नियंत्रण, पर्सनल स्पॉट लाइट आणि ७ एअरबॅग्ज मिळणार आहेत. भारतात टोयोटा वेलफायर २.५ लिटर पेट्रोल हायब्रिड इंजिनसह लाँच केली आहे.

मराठीतील सर्व ऑटो ( Auto ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-12-2022 at 16:21 IST

संबंधित बातम्या