भारतात रस्ते आणि वाहतुकीची समस्या पाहता अनेक जण दुचाकींना पसंती देतात. इच्छित स्थळी जाण्यासाठी दुचाकी सोयीची ठरते. त्यामुळे चारचाकी वाहनांपेक्षा दुचाकींची मागणी अधिक आहे. भारतात गेल्या दिवसात दुचाकी विक्रीत हिरो मोटोकॉर्प कंपनी आघाडीवर होती. मात्र आता बदल होताना दिसत आहे. बजाज ऑटो कंपनी आता अव्वल स्थानी पोहोचली आहे. बजाज ऑटोने नोव्हेंबर महिन्यात ३,३७,९६२ दुचाकींची विक्री केली. तर हिरो मोटोकॉर्प दुचाकींची विक्री ही ३,२९,१८५ इतकी होती.

असं असलं तरी देशांतर्गत विक्रीत हिरो मोटोकॉर्प कंपनी आघाडीवर आहे. हिरो मोटोकॉर्पने नोव्हेंबर महिन्यात देशांतर्गत बाजारात ३,०८,६५४ वाहनांची विक्री केली. त्या तुलनेत बजाज ऑटोच्या दुचाकींची देशांतर्गत विक्री १,४४,९५३ इतकी होती. त्यामुळे बजाज ऑटोने निर्यातीमुळे आघाडी मिळवली आहे. नोव्हेंबर महिन्यात बजाज ऑटोने एकूण उत्पादनाच्या ५७ टक्के निर्यात केली. निर्यातीतील या वाढीमुळे कंपनीला देशांतर्गत विक्रीतील २३ टक्के घट भरून काढण्यास मदत झाली. निर्यातीपेक्षा देशांतर्गत विक्रीवर अधिक लक्ष केंद्रित केल्यामुळे हिरो मोटोकॉर्पला तोटा सहन करावा लागला. हिरो मोटोकॉर्पच्या देशांतर्गत विक्रीतही नोव्हेंबर महिन्यात सुमारे ३९ टक्क्यांनी घट झाली आहे.

Dombivli, poultry farm, Kopar railway station
डोंबिवली जवळील कोपर रेल्वे स्थानकालगत हरितपट्ट्यात कोंबड्यांचा खुराडा, रेल्वे प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी
candidates chess gukesh takes sole lead by beating alireza firouzja
गुकेशचे अग्रस्थान भक्कम; नेपोम्नियाशी, नाकामुरा, कारुआना संयुक्त दुसऱ्या स्थानी; अखेरची फेरी शिल्लक 
Dombivli railway station, roof platform Dombivli,
डोंबिवली रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक पाचवर छत नसल्याने प्रवाशांना उन्हाचे चटके
CSMT station, toilets, passengers at CSMT,
सीएसएमटी स्थानकात प्रवाशांचे हाल, अपुऱ्या स्वच्छतागृहांमुळे पुरुष महिलांची कुचंबणा

हिरोच्या दोन दुचाकींना ग्राहकांची सर्वाधिक पसंती; एका महिन्यात विकल्या ४ लाख गाड्या

दुसरीकडे, देशातील प्रसिद्ध दुचाकी निर्मिती करणारी टीव्हीएस मोटर कंपनीसाठी नोव्हेंबर महिना निराशाजनक ठरला. या महिन्यात विक्रीत घट दिसून आली. नोव्हेंबर २०२१ मध्ये टीव्हीएसची एकूण विक्री १५ टक्क्यांनी घसरून २,७२,६९३ युनिट्स झाली. कंपनीने बुधवारी ही माहिती दिली. चेन्नईस्थित टीव्हीएस मोटरने शेअर बाजाराला दिलेल्या माहितीत सांगितले की, कंपनीने गेल्या वर्षी याच महिन्यात ३,२२,७०९ युनिट्सची विक्री केली होती. गेल्या महिन्यात त्याच्या दुचाकी वाहनांची एकूण विक्री २,५७,८६३ युनिट्स होती. नोव्हेंबर २०२० मध्ये ३,११,५१९ युनिट्स होती. अशा प्रकारे त्यात १७ टक्क्यांची घसरण दिसून आली.