मारुती सुझुकीने नुकतीच त्यांच्या सर्वाधिक लोकप्रिय हॅचबॅक कार्सच्या यादीत आघाडीवर असणाऱ्या वॅगनआरचं नवं अपडेटेड मॉडेल लॉन्च केलं. वॅगनआर ही देशामधील सर्वाधिक विकली जाणारी छोट्या आकाराची कार आहे. सहा लाखांपर्यंतच्या बजेटमध्ये उत्तम गाडी घेण्याच्या विचारात असणाऱ्यांसाठी ही गाडी उत्तम पर्याय ठरु शकते. या गाडीमध्ये अनेक नवीन फीचर्स असून गाडीचा लूकही एकदम हटके आणि तरुणाईला भूरळ घालणारा आहे.

नक्की वाचा >> Tata Punch: एक लाख भरा आणि टाटा पंचचे मालक व्हा; जाणून घ्या या Mini SUV चे फिचर्स, किती मासिक EMI भरावा लागेल पाहा

ड्युएल-टोन कलरमध्ये गाडी उपलब्ध
वॅगनआर ड्युएल टोन कलरमध्ये उपलब्ध आहे. यामध्ये ब्लॅक रुफसोबत मॅग्मा ग्रे आणि ब्लॅक रुफसोबत गॅलेंट रेड असे दोन पर्याय उपलब्ध आहेत. तसेच टॉप व्हेरिएंटमध्ये कंपनीने कंपनीने ब्लॅकआउट अलॉय व्हील्स दिले आहेत. याचबरोबरच कारमध्ये हेडलॅम्पसाठी काळ्या रंगाचे इंसर्ट आणि एक डार्क रेडिएटर ग्रिलही देण्यात आला आहे.

Why was business women Truong My Lan sentenced to death for corruption in Vietnam
भ्रष्टाचाराबद्दल उद्योजिकेला थेट फाशीची शिक्षा… व्हिएतनाममधील घटनेने जगभर खळबळ का उडाली? तेथे मृत्युदंडाचे प्रमाण इतके अधिक का?
Pune model of co-working space From start-ups to large companies everyone is getting preference
को- वर्किंग स्पेसचे पुणेरी मॉडेल! स्टार्टअपपासून मोठ्या कंपन्यांपर्यंत सर्वांचीच मिळतेय पसंती
Apple Company has decided to fires 600 employees in California
‘ॲपल’कडून ६०० कर्मचाऱ्यांना नारळ; कंपनीकडून करोनानंतरची पहिलीच मोठी कर्मचारी कपात
The Reserve Bank kept the repo rate steady in its monetary policy meeting for the fiscal year
कर्जदारांचा पुन्हा हिरमोड; व्याजदर कपात नाहीच! रिझर्व्ह बँकेकडून सलग सातव्या बैठकीत ‘जैसे थे’ धोरण

कारमध्ये अनेक भन्नाट फीचर्स
वॅगनआरमध्ये अंतर्गत बरेच बदल करण्यात आला आहेत. तसेच या गाडीच्या नव्या फीचर्सची यादी सांगायची झाल्यास त्यामध्ये ऑटोमॅटिक स्टार्ट-स्टॉप सिस्टीम आणि ऑटोमॅटिक ट्रिम्समध्ये हिल-होल्ड असिस्टचे पर्याय देण्यात आलेत. त्याचप्रमाणे सात इंचांचा स्मार्ट प्ले स्टूडिओ यूनिटही कनेक्टेड कार अॅप्लिकेशनसोबत सॅटेलाइटन नेव्हिगेशनसोबत उपलब्ध करुन दिलं आहे. वॅगनआरमध्ये आता ड्यूएल-एअरबॅगसोबतच सुरक्षेसंदर्भातील इतरही उपाययोजना आधीपेक्षा अधिक सक्षम करण्यात आल्या आहेत.

नक्की वाचा >> Ola S1 Scooter: केवळ ४९९ रुपयांमध्ये बूक करा ओलाची नवी इलेक्ट्रिक स्कूटर; किंमत एक लाखाहूनही कमी, पाहा फिचर्स

दमदार मायलेज…
मारुती सुझुकीने या नव्या अपडेटमध्ये वॅगनआरला फ्लूएल इकनॉमिक कार बनवण्यासाठी विशेष मेहनत घेतली आहे. १.० लिटरच्या तीन-सिलेंडर मोटर ऑटोमॅटिक बॉक्ससहीत २५.१९ किलोमीटर प्रति लीटरचं मायलेज देईल असा कंपनीचा दावा आहे. ही वाढ आधिच्या मायलेजपेक्षा १५ टक्के अधिक आहे. १.२ लीटरचं मोठं इंजिन ८८.७ बीएचपी पीकअप पॉवरच्या क्षमतेचं आहे. एएणटी यूनिटसहीत या मॉडेलचं मायलेज २४.४३ किमी प्रति लीटर असेल असं सांगण्यात आलं आहे.

घसघशीत सूट…
मारुती सुझुकीने ऑगस्ट महिन्यामध्ये या कारवर चांगली घसघशीत सूट दिली आहे. वेगवेगळ्या ऑफर्सअंतर्गत ३० हजारांपर्यंतची सूट या गाडीवर कंपनीकडून देण्यात आली आहे. या ऑफर्समध्ये १० हजार रुपयांची थेट सूट देण्यात आली आहे. तसेच १५ हजार रुपये एक्सचेंज बोनस आणि पाच हजार कॉर्परेट सूट अशी एकूण ३० हजारांची सूट या गाडीवर देण्यात आली आहे. अर्थात ही सूट सीएनजी मॉडेलवर उपलब्ध नाही. वॅगनआरच्या सीएनजी गाड्यांवर कोणतीही ऑफर देण्यात आलेली नाही. वॅगनआरच्या नव्या मॉडेलची किंमत पाच लाख ३९ हजार रुपये (एक्सशोरुम) इतकी आहे.