सध्या देशात SUV सेंगमेंट लोकप्रिय ठरले आहे. प्रत्येक वाहन उत्पादन कंपनी या तेजीने वाढणाऱ्या सेगमेंटमध्ये स्वतःची स्पेस निर्माण करण्याची तयारी करत आहेत. पहिल्यांदाच कार खरेदी करणाऱ्यांमध्ये ४-मीटर एसयुव्हीची क्रेझ कायम आहे. यामुळे कार कंपन्याही आणखी एसयूव्ही लाँच करण्यावर भर देत आहेत. देशात कॉम्पॅक्ट एसयुव्हीची मागणी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे सर्वच कार निर्माता कंपन्यादेखील आपले एक-एक व्हेरिएंट कॉम्पॅक्ट एसयुव्ही सेगमेंटमध्ये बाजारात आणण्याची रणनीती आखतच असतातच. दमदार फीचर्स, लूक डिझाईनमुळे या कारची भारतीय बाजारपेठेत वाढतच चालली आहे.

भारतीय बाजारात, दहा लाखांपेक्षा कमी किमतीच्या SUV सर्वात जास्त विकल्या जातात, परंतु ४-मीटरपेक्षा मोठ्या SUV ची खूप क्रेझ आहे. ज्या लोकांना अशी SUV खरेदी करायची आहे त्यांचे बजेट साधारणपणे १० लाख रुपयांपेक्षा जास्त आहे. त्यांच्यासाठी देशात ४-मीटरपेक्षा मोठ्या एसयूव्हीसाठी अनेक पर्याय आहेत. महागड्या असूनही यातील काही गाड्यांची विक्री चांगली होत आहे. ४-मीटरपेक्षा मोठ्या SUV बद्दल बोलायचे तर, त्यातील काही ४.२ मीटर आणि काही ४.४ मीटर आहेत आणि काही लोक त्यांना कॉम्पॅक्ट SUV म्हणतात आणि काही त्यांना मध्यम आकाराच्या SUV म्हणतात. येथे आज आम्ही तुम्हाला फोर मीटरपेक्षा मोठ्या अशा पाच SUV बद्दल सांगत आहोत ज्यांना भारतीय बाजारपेठेत सर्वाधिक मागणी आहे.

(हे ही वाचा : किंमत २.८९ लाख, मायलेज १९.७१ किमी; मारुतीची ७ सीटर कार स्वस्तात आणा घरी, कुठे मिळतेय शानदार डील?)

भारतीय बाजारपेठेत ‘या’ ४ मीटरपेक्षा मोठ्या SUV ची सर्वाधिक मागणी

१. ह्युंदाई क्रेटा

या यादीत Hyundai Creta पहिल्या क्रमांकावर आहे. Hyundai Creta ही गेल्या महिन्यात, म्हणजे एप्रिल २०२४ मध्ये त्याच्या सेगमेंटमध्ये सर्वाधिक विक्री होणारी SUV होती आणि ती १५,४४७ लोकांनी खरेदी केली होती. फेसलिफ्ट मॉडेल लाँच झाल्यानंतर क्रेटाच्या मागणीत प्रचंड वाढ झाली आहे.

२. महिंद्रा स्कॉर्पिओ

महिंद्रा स्कॉर्पिओ दुसऱ्या स्थानावर होती, जी गेल्या महिन्यात १४,८०७ ग्राहकांनी खरेदी केली होती. महिंद्रा स्कॉर्पिओ स्कॉर्पिओ एन आणि स्कॉर्पिओ क्लासिक मॉडेलमध्ये विकली जात आहे.

३. मारुती सुझुकी ग्रँड विटारा

मारुती सुझुकीची नवी ग्रँड विटारा एसयूव्हीही मागे नाही. यादीत तिसरे स्थान घेत, ७,६५१ युनिट्सची विक्री गाठली आहे.

४. किआ सेल्टॉस

Kia Seltos चौथ्या स्थानावर होती जी गेल्या महिन्यात ६,७३४ ग्राहकांनी खरेदी केली होती. Kia Motors ने या वर्षाच्या सुरुवातीला सेल्टोस फेसलिफ्ट लाँच केली होती.

५. टोयोटा अर्बन क्रूझर हायरायडर

एप्रिल महिन्यात टोयोटा अर्बन क्रूझर हायरायडरने तब्बल ३,२५२ मोटारींची विक्री केली.