परवडणाऱ्या प्रवासी बाईकची देशात नेहमीच क्रेझ राहिली आहे. चांगले मायलेज आणि कमी किमतीमुळे लोकांना ते जास्त आवडतात. २०२२ या सरत्या वर्षात नोव्हेंबर महिन्यात या दमदार बाईक्सना सर्वाधिक पसंती मिळाली आहे. आज आम्ही तुम्हाला देशात सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या काही सर्वात किफायतशीर आणि जास्त मायलेज असलेल्या मोटारसायकलींबद्दल सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया…

Hero Splendor Plus

pm narendra modi speech on congress muslim
Video: “काँग्रेस मुस्लिमांना, जास्त मुलं असणाऱ्यांना देशाची संपत्ती वाटून टाकेल”, पंतप्रधान मोदींचं राजस्थानच्या सभेत विधान!
pegasus apple advisory
iPhone वर ‘पेगॅसस’सारख्या स्पायवेअरचे संकट, खासगी डेटावर हॅकर्सची संभाव्य ‘नजर’; उपाय काय?
free medical facility to employees on election duty
नागपूर: कर्मचाऱ्यांना नि:शुल्क उपचार, दिव्यांगांसाठी केंद्रावर व्हीलचेअर
World Oldest Person from Venezuela Juan Vicente Pérez dies at aged 114 Ones Set Guinness World Records
रोज मद्य सेवन करणाऱ्या जगातील सर्वांत वृद्ध व्यक्तीचे निधन; ‘त्यांचे’ कुटुंब पाहिलेत का?

Hero Splendor Plus ही देशातील सर्वाधिक विकली जाणारी बाईक आहे. Hero MotoCorp चे स्प्लेंडर नोव्हेंबर २०२२ मध्ये २,६५,५८८ युनिट विक्रीसह मोटारसायकल विक्री चार्टमध्ये शीर्षस्थानी आहे.

Bajaj Pulsar

बजाज पल्सर सिरीजने ७२,७३५ युनिट विक्री केली आहे. जे बारा महिन्यांपूर्वीच्या याच कालावधीत ६१,९१३ युनिट्सच्या तुलनेत १७.४ टक्क्यांच्या वार्षिक सकारात्मक वाढीसह होते.

(हे ही वाचा : Hero Bike: Royal Enfield ला टक्कर द्यायला आली Heroची सर्वात स्वस्त ‘ही’ बाईक; फीचर्स पाहून तुम्हीही म्हणाल… )

Hero HF Deluxe

हिरो एचएफ डिलक्सने ६५,०७४ युनिट्ससह चौथ्या स्थानावर राहिले, जे मागील वर्षी याच कालावधीत ७६,१४९ युनिट्सच्या तुलनेत १४.५ टक्क्यांच्या वार्षिक नकारात्मक विक्री वाढीसह होते.

Honda CB Unicorn

Honda चे CB Unicorn २८,७२९ युनिट्सची विक्री केली आहे. TVS Apache तसेच रायडर १२५ ने गेल्या महिन्यात एकूण २७,००० युनिट्सची विक्री केली आहे.

Royal Enfield Classic 350

रॉयल एनफिल्ड क्लासिक 350 आणि हंटर 350 अनुक्रमे २६,७०२ युनिट्स आणि १५,५८८ युनिट्सची विक्री केली आहे.