Honda ही एक लोकप्रिय वाहन उत्पादक कंपनी आहे. या कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी आतापर्यंत नवनवीन एसयूव्ही, सेडान आणि हॅचबॅक कार्स बाजारात लॉन्च केल्या आहेत. त्यामध्ये आपल्याला नवीन फीचर्स आणि अपडेटेड इंजिन आणि अन्य गोष्टी पाहायला मिळतात. होंडा कार्स इंडिया लिमिटेड (एचसीआयएल) या कंपनीने एक नवीन मोठी घोषणा केली आहे. तर ही घोषणा नेमकी काय आहे याबद्दल अधिक माहिती आपण जाणून घेऊयात.

देशातील एक लोकप्रिय वाहन उत्पादक कंपनी असणाऱ्या होंडा कार्स इंडिया लिमिटेड (HCIL) कंपनीने एक घोषणा केली आहे. कंपनीच्या आगामी लॉन्च होणाऱ्या SUV ला Honda Elevate असे नाव देण्याची घोषणा होंडा कंपनीने केली आहे. Elevate ही कंपनीची नवीन माध्यम आकाराची एसयूव्ही आहे. या एसयूव्हीचा पुढील महिन्यामध्ये भारतात वर्ल्ड प्रीमिअर होणार आहे. हे मॉडेल जागतिक मॉडेल म्हणून विकसित करण्यात आले आहे.

Mumbai to Mandwa water transport will be closed from 26th May
मुंबई ते मांडवा जलवाहतुक २६ मे पासून बंद होणार
What should be the format of degree education
भविष्यातील पदवी शिक्षणाचे स्वरूप कसे असावे?
Kawasaki Ninja 400 discontinued in India
आधी केली स्वस्त अन् आता कंपनीने ‘ही’ बाईक केली बंद; मुंबईतील रस्त्यांवर धावताना दिसणार नाही, किंमत होती…
2024 Force Gurkha launch
Mahindra Thar चा खेळ संपणार? १० सीटर कार आणल्यानंतर फोर्सची Gurkha नव्या अवतारात देशात दाखल
Apple plans to make iPads attractive again give the iPad Pro and iPad Air tablet a makeover On Seven May
Apple आयपॅड पुन्हा होणार स्टेटस सिम्बॉल; मोठा डिस्प्ले, दमदार प्रोसेसर, कंपनी ‘या’ दिवशी करणार घोषणा
Worlds smallest escalator in Japan unic escalators video goes viral
जगातील सर्वात लहान एस्केलेटर कुठे आहे? भारतीय तरुणीचा VIDEO होतोय प्रचंड व्हायरल
RBI restrictions on Konark Urban Cooperative Bank
रिझर्व्ह बँकेचे कोणार्क अर्बन सहकारी बँकेवर निर्बंध
Hyundai Aura
बाकी कंपन्या पाहतच राहिल्या; देशातील बाजारात ‘या’ स्वस्त सेडान कारचा जलवा; झाली दणक्यात विक्री, मायलेज २२ किमी

हेही वाचा : Toyota ने लॉन्च केली सुरक्षित Innova Crysta, ७ एअरबॅग्जवाली MPV पाहून इतर कंपन्यांचं टेन्शन वाढलं

ऑल न्यू एलिव्हेट हे मॉडेल एक आदर्श शहरी एसयूव्ही लॉन्च करण्याच्या कंपनीच्या प्रयत्नांचे प्रतिनिधित्व करते. जे जीवनामध्ये चांगल्या गोष्टींसाठी आकर्षित करते. जगभरातील एसयूव्ही ची मागणी पूर्ण करण्यासाठी होंडा एलिव्हेट हे नवीन जागतिक मॉडेल म्हणून विकसित करण्यात आले आहे. नवीन मॉडेलमध्ये लोकांच्या जीवनशैलीच्या गरजा आणि होंडाच्या नवीन एसयूव्ही बद्दलच्या त्यांच्या अपेक्षांचा समावेश करण्यात आला आहे. भारत ही पहिली बाजारपेठ असणार आहे जिथे Hoonda Elevate लॉन्च होणार आहे.