scorecardresearch

Komaki Ranger: देशातील पहिली इलेक्ट्रिक क्रूझर बाइक सिंगल चार्जमध्ये धावते २०० किमीपर्यंत; जाणून घ्या फिचर्स आणि किंमत

कंपनी २६ जानेवारीपासून कोमाकी डीलरकडे उपलब्ध करून देईल. याशिवाय तुम्ही कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊनही नोंद करू शकता.

Komaki-Ranger
Komaki Ranger: देशातील पहिली इलेक्ट्रिक क्रूझर बाइक सिंगल चार्जमध्ये धावते २०० किमीपर्यंत; जाणून घ्या फिचर्स आणि किंमत (Photo- Komaki)

देशात गेल्या काही दिवसात इलेक्ट्रिक बाइक्सची मागणी वाढली. यामुळे ऑटो कंपन्या नवीन डिझाइन आणि फिचर्ससह स्कूटर आणि बाइक्स तयार करत आहेत. आज आम्ही तुम्हाला देशातील पहिल्या इलेक्ट्रिक क्रूझर बाइकबद्दल सांगणार आहोत. इलेक्ट्रिक टू व्हीलर निर्माता कंपनी कोमाकीने लॉन्च केली आहे. या बाइकचे नाव कोमाकी रेंजर आहे. जर तुम्हाला ही बाइक घ्यायची असेल, तर कंपनी २६ जानेवारीपासून कोमाकी डीलरकडे उपलब्ध करून देईल. याशिवाय तुम्ही कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊनही नोंद करू शकता.

कंपनीने बाइकला आकर्षक डिझाइन दिले आहे, ही बाइक पाहून तुम्हाला बजाज एव्हेंजर किंवा हार्ले डेविडसनच्या बाइकची झलक दिसेल. पॉवरसाठी तर कंपनीने ४००० वॅट मोटरसह ४ किलोवॅट क्षमतेचा बॅटरी पॅक दिला आहे. ही बाइक एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर १८० ते २०० किमीची रेंज देते. आरामदायी वाइड स्पिल सीट, ड्युअल स्टोरेज स्पेस, एलईडी हेडलॅम्प, ड्युअल पॅसेंजर फूटरेस्ट, रिअर टेल लॅम्प गार्ड, रिअर बॅक रेस्ट, साइड स्टँड सेन्सर, फ्लेम इफेक्टसह ड्युअल साउंड पाईप्स, फ्रंट बॉडी गार्ड, मोबाइल चार्जिंग युनिट, रिअर प्रोटेक्शन गार्ड या सारखे फिचर्स आहेत.
हायटेक फीचर्समध्ये साउंड सिस्टम, गियर मोड, रिव्हर्स मोड, क्रूझर कंट्रोल, अँटी थेफ्ट लॉक यासारखे फीचर्स ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीसह देण्यात आले आहेत.

Bajaj Pulsar 125 Neon vs Hero Glamour: स्टाईल, मायलेज आणि किंमतीत कोणती गाडी फायदेशीर?, जाणून घ्या

कोमाकी रेंजर गार्नेट रेड, डीप ब्लू आणि जेट ब्लॅक या तीन रंगात उपलब्ध आहे. बाईक कंपनीने १.६८ लाख रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीसह बाजारात लॉन्च केली आहे. केंद्र सरकारकडून इलेक्ट्रिक वाहनांना दिलेली सबसिडी पाहता या बाइकची किंमत खूपच कमी होऊ शकते.

मराठीतील सर्व ऑटो ( Auto ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 25-01-2022 at 13:45 IST