Upcoming MG Comet EV: भारतात इलेक्ट्रिक गाड्यांची मागणी झपाट्याने वाढत आहेत. याचाच फायदा घेत अनेक कंपन्या आपल्या इलेक्ट्रीक गाड्या मार्केटमध्ये आणत आहे. यातच आता देशात लहान आकाराच्या कारची डिमांड वाढली आहे. याचे अनेक कारणे आहेत. याची डिमांड पाहून MG Motors कडून सर्वात आधी छोटी टू सीटर टू डोर कारला लाँच केले जात आहे. MG Comet EV हे कॉम्पॅक्ट इलेक्ट्रिक वाहन आहे जे आकारात मारुती सुझुकी अल्टोपेक्षाही लहान असणार आहे.

MG Comet EV फीचर्स

अलीकडे, MG ने स्टीयरिंग व्हील आणि डॅशबोर्डबद्दल माहिती देणारी एक टीझर प्रतिमा जारी केली. त्यानुसार यात कंट्रोल बटणांसह २ स्पोक स्टीयरिंग व्हील दिले जाईल. याशिवाय यामध्ये एक डिजिटल डिस्प्ले दिला जाईल, जो इन्फोटेनमेंट सिस्टम आणि इन्स्ट्रुमेंट क्लस्टर म्हणून काम करेल. याशिवाय एलईडी हेडलाइट्स आणि टेललाइट्स, कनेक्टेड टेक्नॉलॉजी आणि अॅम्बियंट लाइटिंग यांसारखे फिचर्स यात पाहायला मिळतील.

Mixed trend in global markets and selling by investors in banking finance and consumer goods stocks
पाच सत्रातील तेजीला खिंडार; नफावसुलीने ‘सेन्सेक्स’ला सहा शतकी झळ
Samsung launched on Friday a new variant of its popular budget F15 smartphone Here is all the details
२० हजारांपेक्षा कमी किमतीत सॅमसंगचा ट्रिपल कॅमेरा सेटअपचा स्मार्टफोन; बॅटरी लाईफ बघून म्हणाल ‘डील Done’
Is this waitress serving at a restaurant in China robot or human Find out
भारताला ‘कॅन्सर कॅपिटल ऑफ द वर्ल्ड’ का म्हटले जाते? तज्ज्ञांकडून जाणून घ्या कारण…
Unicorns List India ranks third
Unicorns List: अमेरिका व चीनपाठोपाठ भारत तिसऱ्या स्थानावर

(हे ही वाचा: टाटाचा नाद करायचा नाय! देशात आणतेय ‘या’ तीन कारचे अपडेटेड मॉडेल्स, सीएनजी अन् ADAS फीचर्स सोबत…)

MG Comet EV डिझाईन आणि लुक

ही भारतातील सर्वात छोटी कार असेल. साइजच्या बाबतीत ही इलेक्ट्रिक कार अल्टो 800 पेक्षा लहान आहे.  या कारची लांबी फक्त २.९ मीटर असेल. रिपोर्ट्सनुसार, कंपनी ही कार एकूण पाच रंगांमध्ये सादर करेल. यामध्ये पांढरा, निळा, पिवळा, गुलाबी आणि हिरवा रंगांचा समावेश आहे.

MG Comet EV रेंज

या इलेक्ट्रिक कारमध्ये १७.३ kWh क्षमतेचा बॅटरी पॅक दिसू शकतो, ज्याची ड्रायव्हिंग रेंज एका चार्जवर २००-२५० किमी असू शकते. ही छोटी इलेक्ट्रिक कार शहरातील ग्राहकांना लक्ष्य केले जाईल, कारण ही कार तिच्या आकारामुळे गर्दीच्या ठिकाणी चांगला पर्याय असेल.

(हे ही वाचा: EV Sales in India: ‘ईव्ही’च हवी! देशात इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीने ओलांडला १० लाखांचा टप्पा )

MG Comet EV कधी होणार लाँच?

MG Motor India १९ एप्रिल रोजी त्यांची इलेक्ट्रिक कार, लाँच करणार आहे. ही कार भारतीय बाजारपेठेतील कंपनीची दुसरी आणि सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार असेल.

MG Comet EV कार किंमत

एमजी कॉमेट इलेक्ट्रिक कार १० लाख रुपयांच्या संभाव्य किमतीत सादर केली जाऊ शकते. ही कार लाँच झाल्यानंतर Tata Tiago EV, Tata Tigor EV आणि Citroen EC3 शी स्पर्धा करेल.