MG मोटर ही एक लोकप्रिय वाहन उत्पादक कंपनी आहे. आपल्या ग्राहकांसाठी कंपनी नवनवीन मॉडेल्स बाजारपाठेमध्ये सादर करत असते. त्यामध्ये कंपनी नवनवीन अपडेट आणि फीचर्स देखील देत असते. आता आपण एमजी मोटर्स एप्रिल महिन्यात किती युनिट्सची विक्री झाली झाली आहे याबद्दल जाणून घेऊयात.

एमजी मोटर्सने एप्रिल २०२३ महिन्यात एकूण ४,५५१ युनिट्सची विक्री केली आहे. जी गेल्या वर्षीच्या एप्रिल महिन्याच्या तुलनेत दुप्पट आहे. गेल्या वर्षी म्हणजे एप्रिल २०२२ मध्ये कंपनीने २००८ युनिट्सची विक्री केली होती. या वेळी कंपनीच्या युनिट्सची विक्री वाढवण्यामध्ये एमजी हेक्टर या एसयूव्हीचा महत्वाचा वाटा आहे. एकूण विक्रीपैकी ७० टक्के विक्री या एसयूव्हीची झाली आहे.

Dolly Chaiwala and Bill Gates
Dolly Chaiwala मायक्रोसॉफ्ट विंडोज १२चा ब्रँड अँबॅसेडर? जाणून घ्या सत्य
Xiaomi SU7 EV Launch
बाकी कंपन्यांची उडाली झोप, २४ तासांत धडाधड विकली गेली ‘ही’ इलेक्ट्रिक कार, किंमत…
Stock market indices Sensex and Nifty registered gains
अर्थवर्षाची निर्देशांक तेजीनेच सांगता; वर्षभरात सेन्सेक्सची २४.८५ टक्के, तर निफ्टीची २८.६१ टक्के झेप
Hero Pleasure Plus Xtec Sports launch
Activa, Jupiter समोर तगडं आव्हान; ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीसह देशात आली हिरोची नवी स्कूटर, ८० हजारांहून कमी किंमत

हेही वाचा : VIDEO: प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ई-शिवनेरी बसचे लोकार्पण, जाणून घ्या कुठे-कुठे धावणार

मार्च महिन्यातील विक्री

एमजी मोटर्सच्या युनिट्सच्या विक्रीचे मार्च महिन्यातील आकडे पाहिले तर एप्रिलच्या तुलनेत मार्च २०२३ मध्ये कंपनीने जास्त युनिट्सची विक्री केली होती. मार्च महिन्यात कंपनीने ६,५०१ युनिट्सची विक्री केली आहे. कंपनीने याचे कारण काही मॉडेल्सवरील सप्लाय चेनमध्ये काही अडचणी असल्याचे सांगितले आहे. या अडचणी सोडवण्यासाठी त्यावर कंपनी सतत काम करत आहे.

भारतात एमजी मोटर्स आपल्या गाड्यांच्या ६ मॉडेल्सची विक्री करते. ज्यामध्ये सर्वात स्वस्त कार ही MG Comet (७.९८ लाख रुपये) आहे. तर सर्वात महाग अशी MG Gloster ही कार आहे. ज्याची किंमत ३२.६० लाख रुपये इतकी आहे. कंपनीच्या या गाड्यांमध्ये ५ SUV आणि एक हॅचबॅक कारकहा समावेश आहे.

हेही वाचा : Petrol-Diesel Price on 2 May: पेट्रोल-डिझेलच्या किमतीत मोठी वाढ; जाणून घ्या तुमच्या शहरातील इंधनाचे दर

MG Comet झाली लॉन्च

एमजी कॉमेट ही कार कंपनीने नुकतीच सादर केली आहे. याची एक्स-शोरूम किंमत ही ७.९८ लाख रुपयांमध्ये सादर केली आहे. याचे बुकिंग १५ मे पासून ग्राहकांना करता येणार आहे. एमजी कॉमेट ही कार कंपनीने नुकतीच सादर केली आहे. याची एक्स-शोरूम किंमत ही ७.९८ लाख रुपयांमध्ये सादर केली आहे. याचे बुकिंग १५ मे पासून ग्राहकांना करता येणार आहे. ही कार त्याच्या सेगमेंटमधील सर्वात परवडणारी कार आहे. जी Tata च्या Tata Tiago पेक्षा ७१,००० रुपयांनी तर Citroën EC3 पेक्षा ३.५ लाखांनी स्वस्त आहे.