इलेक्ट्रिक वाहन उत्पादक कंपनी MXmoto ने भारतात क्रूझर इलेक्ट्रिक मोटारसायकल एमएक्स मोटो एम१६ ला (mXmoto M16) लाँच केली आहे. ही कंपनीची रफ आणि टफ इलेक्ट्रिक मोटारसायकल आहे, ज्यावर कंपनी आठ वर्षांची बॅटरी पॅकची वॉरंटी तर मोटार कंट्रोलरवर तीन वर्षांची वॉरंटी देत आहे. कंपनीचा दावा आहे की, ही भारतीय रस्त्यांवर उत्कृष्ट परफॉर्मन्स देईल. चला तर mXmoto M16 या नवीन मोटारसायकलचे फीचर्स पाहू…

फीचर्स :

Vivo company New Smartphone T3x 5G launch in India on Know About design and price range of this upcoming model
50MP कॅमेरा अन् फास्ट चार्जिंग सपोर्टसह विवोचा ‘हा’ स्मार्टफोन होणार लाँच; किंमत फक्त…
world's first self-driven electric
एप्रिल फुल नव्हे, खरचं चालकाशिवाय धावतेय ही दुचाकी! भाविश अग्रवालने केली Ola Soloची घोषणा, पाहा Video
BMW iX xDrive50 launch
बाकी कंपन्यांची उडाली झोप, नवी इलेक्ट्रिक SUV देशात दाखल, सिंगल चार्जमध्ये धावते ६३५ किमी, पण किंमत तर…
bharti hexacom set to launch ipo
भारती हेक्साकॉमची ३ एप्रिलपासून प्रारंभिक समभाग विक्री

एम१६ (M16) मोटारसायकल मेटल बॉडीने बनलेली आहे. एमएक्स मोटो एम१६ ला (mXmoto M16) मस्क्यूलर टँक, लहान फ्लायस्क्रीनसह गोल हेडलाइट, क्लासिक स्टेप-अप डिझाइनसह सिंगल-पीस सीट, रुंद हँडल, यूएसडी फोर्क्स, ड्युअल रिअर शॉक (dual rear shocks) , १७ इंच चाकं, दोन्ही टोकांना डिस्क ब्रेक आहेत.

हेही वाचा…बाकी कंपन्यांना जे जमलं नाही ते टाटानं करून दाखवलं; ‘या’ नव्या एसयूव्‍ही कारला मिळालं ५ स्टार सेफ्टी रेटींग

बॅटरी फीचर्स:

मोटारसायकल लिथियम-आयन बॅटरी पॅकद्वारे समर्थित आहे आणि पूर्ण चार्ज केल्यावर कंपनी 160-220km च्या रेंजचा दावा करते. कंपनीचा दावा आहे की, बॅटरी पॅक तीन तासांत ० ते ९० टक्के रिचार्ज केली जाऊ शकते. तसेच मोटारसायकलला 140Nm टॉर्क जनरेट केला आहे. बहुतेक इलेक्ट्रिक वाहनांप्रमाणे, mXmoto M16 ला ऑनबोर्ड नेव्हिगेशन, कॉल नोटिफिकेशन्स आणि म्युझिक सिस्टमसह ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीसह टीएफटी (TFT) डिस्प्ले मिळतो आहे. मोटारसायकलमध्ये क्रूझ कंट्रोल, पार्क असिस्ट, रिव्हर्स मोड आणि हिल स्टार्ट असिस्ट असे फीचर्स असणार आहेत. तसेच बाईकची सुरुवातीची किंमत १,९८,००० रुपये (एक्स-शोरूम) आहे. अश्या जबरदस्त फीचर्ससह इलेक्ट्रिक वाहन उत्पादक कंपनी एमएक्समोटो एम१६ (MXmoto M16) भारतात लाँच झाली आहे.