सध्या भारतीय ऑटोमोबाइल क्षेत्रामध्ये अनेक सेगमेंटच्या कार्स लोकप्रिय होत आहेत. त्यात सनरूफ फीचर्स असलेल्या कार्स खरेदीकरण्याकडे ग्राहकांचा कल वाढलेला दिसून येत आहे. हल्ली अनेक कंपन्या आपल्या अनेक मॉडेल्समध्ये सनरूफ हे फीचर देत आहेत. अनेक ग्राहक या फीचरसाठी अधिक प्रीमियम भरण्यासाठी देखील तयार असतात. आज आपण अशा काही कार्स पाहणार आहोत ज्यात सनरूफ हे फीचर्स ग्राहकांना मिळते. आज आपण अशा काही कार्स पाहणार आहोत ज्याची किंमत १० लाखांच्या आतमध्ये असेल आणि त्यामध्ये सनरूफ हे फीचर्स देखील कंपनीकडून देण्यात आलेले आहे.

टाटा Altroz

टाटा अल्ट्रोज सध्या भारतातील सर्वात परवडणारी कार आहे ज्यात इलेक्ट्रिक सनरूफ मिळते. सनरूफसह अल्ट्रोझच्या सर्वात स्वस्त व्हेरिएंटची किंमत ७. ३५ लाख (एक्सशोरूम) रुपये आहे. अल्ट्रोझ ही कार एका लिटर पेट्रोलमध्ये १८.५३ किलोमीटरचे मायलेज देते असा टाटा मोटर्सचा दावा आहे. Tata Altroz ​​मध्ये कंपनीने १,१९९ सीसीचे इंजिन दिले आहे . ज्यात ५ स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन आहे. हे इंजिन ८४.८८ बीएचपी पॉवरचे आहे. यामध्ये टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, मल्टी-फंक्शन स्टीयरिंग व्हील, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, इंजिन स्टार्ट स्टॉप बटण, अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टम, फ्रंट सीटवर ड्युअल एअरबॅग्ज यांसारखे फीचर्स या गाडीमध्ये येतात. याबाबतचे वृत्त Financial Express ने दिले आहे.

mumbai cyber fraud 25 crore
मुंबईतील सर्वात मोठा सायबर स्कॅम; महिलेची २५ कोटींची फसवणूक, चोरांची ट्रीक अशी होती
shoe sizing system in india
भारतात येणार नवीन ‘शू सायझिंग सिस्टिम’, ‘भा’ म्हणजे काय आणि त्याची गरज का आहे?
Unicorns List India ranks third
Unicorns List: अमेरिका व चीनपाठोपाठ भारत तिसऱ्या स्थानावर
8 point 85 percent interest rate on fixed deposits by Bajaj Finance
बजाज फायनान्सतर्फे मुदत ठेवींवर ८.८५ टक्के व्याजदर

हेही वाचा : सणासुदीत ग्राहकांना दिलासा! Hyundaiच्या ‘या’ कार्सवर बंपर सूट, पाहा खरेदीवर किती होईल तुमच्या पैशांची बचत

ह्युंदाई Exter

Exter ही ह्युंदाई कंपनीची एक मायक्रो एसयूव्ही आहे. जुलै महिन्यात ही कार भारतात लॉन्च झाली आहे. सनरूफसह ही कंपनीची सर्वात परवडणारी कार आहे. ह्युंदाईची भारतातील ही सर्वात लहान एसयूव्ही आहे. याच्या टॉप व्हेरियंटची एक्स-शोरूम किंमत ९.३१ लाख रुपये आहे.Hyundai Xtor ला १.२ लीटर काप्पा पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन ५ स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन आणि AMT गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. कंपनीने कारच्या सीएनजी व्हर्जनमध्येही हेच इंजिन दिले आहे. हे इंजिन ८१.८६ bhp पॉवर आणि ११३.८ Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे.

टाटा Punch

टाटा पंच ही ह्युंदाई एक्सटरशी स्पर्धा करते. टाटा पंचची किंमत ८.३५ (एक्सशोरूम ) लाखांपासून सुरु होते. या सुरुवातीच्या किंमतीमध्ये टाटा पंचमध्ये ग्राहकांना सनरूफ हे फिचर मिळते. यामध्ये १.२ लिटरचे नॅचरल एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. जे ५-स्पीड मॅन्युअल आणि ६-स्पीड MMT गिअरबॉक्ससह जोडण्यात आले आहे. टाटा पंच आता सीएनजी पर्ययामध्ये देखील उपलब्ध आहे.

हेही वाचा : Petrol-Diesel Price on 22 September: सर्वसामान्यांच्या खिशाला लागणार कात्री! पेट्रोल-डिझेल महागलं, वाचा तुमच्या शहरातील किमती

टाटा Nexon

टाटा मोटर्सने या महिन्याच्या सुरुवातीला Nexon चे नवीन मॉडेल लॉन्च केले आहे. नवीन मॉडेलमध्ये नेक्सॉन स्मार्ट+ ट्रिमसह एक सनरूफ ऑफर करण्यात आले आहे. ज्याची किंमत ९.७० (एक्सशोरूम )लाखांपासून सुरु होते. नेक्सॉनच्या या नवीन व्हेरिएंटमध्ये १. २ लिटरचे टर्बो पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. जे ५-स्पीड म्णायुअल ट्रान्समिशनसह जोडण्यात आले आहे.