कार क्षेत्रातील MPV विभागाला त्याच्या ७ सीटर कारसाठी प्राधान्य दिले जाते ज्यांचा वापर कौटुंबिक आणि व्यावसायिक दोन्हीसाठी केला जातो.

जर तुमचे कुटुंब मोठे असेल आणि तुम्हाला ७ सीटर प्रीमियम कार घ्यायची असेल तर जाणून घ्या रेनॉल्ट ट्रायबरसाठी उत्तम फायनान्स प्लान.

Funny Answer Sheets Viral
वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी विद्यार्थ्यांने सांगितला नवा उपाय; व्हायरल उत्तरपत्रिका वाचून तुम्हीही लावाल डोक्याला हात
Bengaluru firm workers hire goons to beat strict colleague arrested video viral
कामाचा दबाव टाकणाऱ्या व्यवस्थापकाला कर्मचाऱ्यांनी गुंडांच्या मदतीने केली बेदम मारहाण; पाहा धक्कादायक Video
a father beat child for his betterment by his shoes watch viral video of fathers love
लेकाच्या भल्यासाठी वडिलांनी दिला चोप, बुटाने धू धू धुतले, VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “वडिलांचे असे प्रेम…”
diver artist uma mani began exploring new depths to life at age 49
४९ व्या वर्षी शिकल्या स्कुबा डायव्हिंग; आज समुद्र संरक्षणासाठी करतायत मोलाचे काम; कोण आहेत उमा मणी?

रेनॉल्ट ट्रायबरच्या लिमिटेड एडिशनची सुरुवातीची किंमत ७,२४,००० रुपये आहे जी ऑन-रोड असताना ८.०७,५९३ रुपयांपर्यंत जाते. परंतु तुम्ही एवढी मोठी रक्कम खर्च न करता केवळ ७९ हजार रुपये डाउन पेमेंट देऊन ही कार खरेदी करू शकता.
ऑनलाइन डाउन पेमेंट आणि ईएमआय कॅल्क्युलेटरनुसार, जर तुम्ही ही कार खरेदी केली तर बँक यासाठी ७,०,३७६ रुपये कर्ज देईल.

या कर्जानंतर, तुम्हाला ७९,००० रुपये डाउन पेमेंट भरावे लागेल आणि त्यानंतर दरमहा १५,००२ रुपये मासिक ईएमआय भरावे लागेल.

या कारवरील कर्जाची परतफेड करण्यासाठी, बँकेने पाच वर्षांचा कालावधी निश्चित केला आहे ज्यामध्ये बँक दिलेल्या कर्जाच्या रकमेवर वार्षिक ९.८ टक्के व्याज आकारेल.

Renault Triber चा फायनान्स प्लॅन वाचल्यानंतर, जर तुम्हाला ही कार खरेदी करायची असेल, तर आता या कारचे इंजिनपासून ते फीचर्सपर्यंतची संपूर्ण माहिती जाणून घ्या.

आणखी वाचा : तुम्ही Electric Scooter किंवा E Car घेण्याचा विचार करत असाल तर या ५ गोष्टी लक्षात ठेवा

Nault Triber मध्ये, कंपनीने 999 cc इंजिन दिले आहे जे 71.01 bhp पॉवर आणि 96 Nm चा पीक टॉर्क जनरेट करते, ज्यामध्ये मॅन्युअल ट्रान्समिशन दिले जाते.

फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर मल्टी-फंक्शन स्टीयरिंग व्हील, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, इंजिन स्टार्ट-स्टॉप, अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम यासारखे फीचर्स देण्यात आले आहेत.

कारच्या मायलेजबद्दल कंपनीचा दावा आहे की ही कार 19.02 kmpl चा मायलेज देते आणि हे मायलेज ARAI ने प्रमाणित केले आहे.

(महत्त्वाची सूचना : या कारवर उपलब्ध कर्ज, डाउन पेमेंट आणि व्याजदरांची योजना तुमच्या बँकिंग आणि CIBIL स्कोअरवर अवलंबून आहे. तुम्ही तुमच्या बँकिंग आणि CIBIL स्कोअरमध्ये नकारात्मक अहवाल दिल्यास, बँक त्यानुसार कर्जाची रक्कम, डाउन पेमेंट रक्कम आणि व्याजदर योजनेत बदल करू शकते.)