Royal Enfield ही देशातील ३५०cc मोटरसायकलची सर्वात मोठी उत्पादक कंपनी आहे. कंपनी केवळ भारतातच नाही तर जगभरातील अनेक देशांमध्ये आपल्या बाईकची विक्री करते. या चेन्नई-आधारित मोटरसायकल ब्रँडने फेब्रुवारी २०२४ मध्ये एकूण ७५ हजार ९३५ युनिट्सची विक्री नोंदवली आहे. हे फेब्रुवारी २०२३ मध्ये विकल्या गेलेल्या ७१ हजार ५४४ युनिट्सपेक्षा ५.४१ टक्क्यांनी जास्त आहे. मात्र, जानेवारीच्या तुलनेत कंपनीच्या विक्रीत घट झाली आहे. जानेवारी २०२४ मध्ये कंपनीने ७६ हजार १८७ मोटारसायकली विकल्या होत्या. कंपनीने गेल्या महिन्यात देशांतर्गत बाजारात ६७ हजार ९२२ मोटारींची विक्री केली, तर ८ हजार ०१३ मोटारींची निर्यात केली.

सध्या, रॉयल एनफिल्ड आपल्या दुचाकी लाइनअपमध्ये ३५०cc, ४११cc, ४५०cc आणि ६५०cc मोटारसायकलींचे उत्पादन करत आहे. कंपनीच्या काही प्रमुख ३५०cc मॉडेल्सबद्दल बोलायचे झाले तर यामध्ये Classic 350, Bullet 350 आणि Hunter 350 यांचा समावेश आहे. यापैकी सर्वाधिक विकली जाणारी बाईक क्लासिक 350 आहे. रॉयल एनफिल्डच्या सर्व बाईकची विक्री किती झाली, ते जाणून घ्या…

Competition among 7 companies under incentive scheme for ACC production
‘एसीसी’ उत्पादनासाठी प्रोत्साहन योजनेअंतर्गत ७ कंपन्यांमध्ये चढाओढ
Tata Punch Car sale
टाटाच्या ‘या’ सर्वात स्वस्त SUV नं Wagon R, Dzire चं वर्चस्व संपवलं? झाली दणक्यात विक्री, मायलेज २६ किमी
Pune model of co-working space From start-ups to large companies everyone is getting preference
को- वर्किंग स्पेसचे पुणेरी मॉडेल! स्टार्टअपपासून मोठ्या कंपन्यांपर्यंत सर्वांचीच मिळतेय पसंती
Xiaomi SU7 EV Launch
बाकी कंपन्यांची उडाली झोप, २४ तासांत धडाधड विकली गेली ‘ही’ इलेक्ट्रिक कार, किंमत…

फेब्रुवारीमध्ये ‘या’ मॉडेल्सची सर्वाधिक विक्री

फेब्रुवारी २०२४ मध्ये क्लासिक 350 च्या एकूण २८ हजार ३१० युनिट्सची विक्री झाली. त्याच वेळी, बुलेट 350 च्या १३ हजार ९४४ युनिट्स, हंटर 350 च्या १२ हजार १२२ युनिट्स, मेटियर 350 च्या ८ हजार १२५ युनिट्स, हिमालयनच्या २ हजार २७८ युनिट्स, ६५० ट्विन्सच्या २ हजार ०७० युनिट्स आणि सुपर मिटिओर ६५० च्या १ हजार ०७३ युनिट्सची विक्री झाली आहे.

जानेवारी २०२४ च्या तुलनेत निर्यात वाढली

रॉयल एनफिल्डने फेब्रुवारीमध्ये आपल्या बाईकच्या निर्यातीतही वाढ नोंदवली आहे. जानेवारी २०२४ मध्ये, बाईक उत्पादकाने एकूण ५ हजार ६३१ बाईक्सची निर्यात केली, तर फेब्रुवारीमध्ये निर्यात ८ हजार ०१३ युनिट्सपर्यंत वाढली. कंपनीने निर्यातीत ४२ टक्क्यांची वाढ केली आहे.

ही कंपनीची नवीनतम बाईक

कंपनीने गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये हिमालयन 450 भारतीय बाजारात लाँच केले होते. नवीन हिमालयनची सुरुवातीची किंमत २.६९ लाख रुपये (एक्स-शोरूम) ठेवण्यात आली आहे. त्याच्या टॉप मॉडेलची किंमत २.८४ लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. Royal Enfield ने एकदम नवीन ४५२cc क्षमतेचा सिंगल सिलेंडर, लिक्विड-कूल्ड इंजिन हिमालयात दिले आहे जे अंदाजे ४० bhp ची पॉवर आणि ४० Nm चा पीक टॉर्क जनरेट करते.