युक्रेनवर केलेल्या हल्ल्यानंतर रशियावर अनेक देशांनी निर्बंध लादले आहेत. त्याचबरोबर अनेक कंपन्यांनी रशियामधून काढता पाय घेतला आहे. तसेच सोशल मीडिया कंपन्यांनी बंधनं आणली आहे. असं असताना आता रशियाने आपली रणनिती आखली आहे. निर्बंध लादल्यानंतर रशियाने २०० हून अधिक उत्पादन करत असलेल्या कार आणि ऑटो पार्ट्सच्या निर्यातीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा परिणाम केवळ रशियामध्येच नाही तर जगभरातील वाहन उद्योगावर होणार आहे. या निर्णयामुळे आगामी काळात ऑटो उत्पादकांसमोर चालू असलेले सेमीकंडक्टर संकट आणखीनच वाढणार आहे. “रशियाविरोधात मोर्चा उभा करणाऱ्या देशांसाठी हा निर्णय आहे.” रशियन अर्थ मंत्रालयाने सांगितलंआहे.

गेल्या महिन्यात संघर्ष वाढल्याने अनेक कार निर्मात्यांनी रशियामधील ऑपरेशन्स स्थगित करण्याचा निर्णय घेतला. होंडा, टोयोटा, फोक्सवॅगन, जनरल मोटर्स, जग्वॉर लँड रोव्हर, मर्सिडिज बेन्झसारख्या कार उत्पादक कंपन्या आघाडीवर आहेत. दुसरीकडे फोर्ड आणि बीएमडब्ल्यूने कार उत्पादनासोबतच निर्यात देखील थांबवली आहे. स्टेलांटिस, जीप, फियाट आणि प्यूजॉट सारख्या ब्रँडची मालकी असलेला समूह देखील गुरुवारी या यादीत सामील झाला आहे. कंपनीने सांगितले की, त्यांनी रशियात कारची आयात आणि निर्यात स्थगित केली आहे. स्टेलांटिसची रशियातील कलुगा येथे उत्पादन प्लांट असून मालकी मित्सुबिशीसह संयुक्तपणे आहे.

Loksatta explained Arab nations split after failed Iranian attack on Israel
जॉर्डनने इराणी ड्रोन, क्षेपणास्त्रे का पाडली? इस्रायलवरील फसलेल्या इराणी हल्ल्यानंतर अरब राष्ट्रांमध्ये फूट? 
bombay share market, sesex, nifty
भू-राजकीय तणाव वाढण्याच्या भीतीने ‘सेन्सेक्स’ची ४५६ अंश गाळण
economic confidence china japan company
जर्मन कंपन्या चीनमधून पुन्हा जपानमध्ये का जात आहेत?
Apple Company has decided to fires 600 employees in California
‘ॲपल’कडून ६०० कर्मचाऱ्यांना नारळ; कंपनीकडून करोनानंतरची पहिलीच मोठी कर्मचारी कपात

Hero Glamour vs Honda Shine: किंमत, स्टाइल आणि मायलेजमध्ये कोण वरचढ? जाणून घ्या

कार आणि ऑटो पार्ट्सच्या निर्यातीवर रशियाची बंदी या वर्षाच्या शेवटपर्यंत कायम राहणार आहे. रशियाच्या निर्यात सूचीमधून काढून टाकलेल्या वस्तूंमध्ये वाहने, दूरसंचार, वैद्यकीय, कृषी, विद्युत उपकरणे आणि लाकूड यांचा समावेश आहे. मॉस्कोतील एका अधिकाऱ्याने सांगितले की त्यांनी “रशियाविरूद्ध कारवाया करणार्‍या देशांना लाकूड उत्पादनांची निर्यात थांबवली आहे.”

ड्रायव्हिंग लायसन्सचे नूतनीकरण करण्यास उशीर झाल्यास भरावा लागेल इतका दंड

ह्युंदाई, रशियामधील प्रमुख विदेशी कार उत्पादकांपैकी एक आहे अलीकडेच कंपनीने जाहीर केले की, पुरवठा साखळीतील व्यत्ययामुळे उत्पादन पुन्हा सुरू करण्याचा विचार करीत आहे. तथापि, कार आणि ऑटो पार्ट्सच्या निर्यातीवर रशियाची बंदी कायम राहिल्यास ह्युंदाईसाठी ऑपरेशन पुन्हा सुरू करणे कठीण होईल.