टाटा मोटर्सने जून महिन्यात निवडक कार्सवर आकर्षक डिस्काउंट ऑफर जाहीर केल्या आहेत, ज्यामध्ये कंपनीच्या हॅचबॅक कार ते सेडान आणि एसयूव्हीवर हा डिस्काउंट मिळू शकतो.

टाटा मोटर्सच्या या कार्सवर मिळणाऱ्या डिस्काउंटमध्ये एक्सचेंज बोनसशिवाय इतर फायदेही दिले जात आहेत. ही डिस्काउंट ऑफर ३० जूनपर्यंत वैध आहे. परंतु ग्राहकांच्या प्रतिक्रिया लक्षात घेऊन ती आणखी वाढवण्यात येऊ शकते.
तुम्ही देखील टाटा मोटर्स कडून नवीन कार घेण्याचा विचार करत असाल तर कोणती कार खरेदी करून किती फायदा होऊ शकतो हे तुम्ही येथे जाणून घेऊ शकता.

आणखी वाचा : Maruti Ignis vs Tata Tiago: किंमत, मायलेज, फिचर्स आणि स्टाईलमध्ये कोणती कार चांगली? जाणून घ्या

Tata Tiago: ही या सेगमेंटमधील एक लोकप्रिय हॅचबॅक कार आहे, जी खरेदी केल्यावर तुम्हाला ३१,५००० रूपयांपर्यंतचा फायदा मिळू शकतो. कंपनी या कारच्या वेगवेगळ्या व्हेरिएंटवर वेगवेगळे डिस्काउंट देत आहे. यामध्ये तुम्ही त्याचे XM आणि XT व्हेरिएंट विकत घेतल्यास त्यावर २१,५०० रुपयांची सूट मिळेल आणि जर तुम्ही त्याचे XZ व्हेरिएंट विकत घेतले तर त्यावर ३१,५०० रुपयांची सूट दिली जाईल.

Tata Tigor: टाटा टिगोर ही सेडान सेगमेंटमधील एक लोकप्रिय कार आहे, जी तुम्हाला खरेदी केल्यावर ३१,५०० रुपयांचा नफा देऊ शकते. जर तुम्ही त्याचे XE आणि XM व्हेरिएंट विकत घेतले तर तुम्हाला त्यावर २१,५०० रुपयांची सूट मिळेल, तर XZ व्हेरिएंट विकत घेतल्यास कंपनी ३१,५०० रुपयांची सूट देत आहे.

आणखी वाचा : अर्ध्याहून कमी किमतीत खरेदी करा Datsun redi go, जाणून घ्या ऑफर

Tata Harrier: ही कंपनीची एक लोकप्रिय SUV आहे, ज्यावर तुम्ही ती खरेदी करून ६० हजार रुपयांचा नफा मिळवू शकता. या डिस्काउंटमध्ये ४० हजार रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि २० हजार रुपयांपर्यंत कॉर्पोरेट डिस्काउंट दिला जात आहे.

Tata Safari: ही त्यांच्या कंपनीची प्रीमियम SUV आहे, ज्यावर तुम्ही ती खरेदी करून ४० हजार रुपयांपर्यंतचा फायदा मिळवू शकता. या डिस्काउंटमध्ये कंपनी ४०,००० रुपयांचा एक्सचेंज बोनस देत आहे.

महत्त्वाची सूचना: टाटा मोटर्सने जारी केलेल्या सवलतीच्या ऑफर राज्यानुसार बदलू शकतात आणि कंपनी कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय ही सवलत ऑफर संपुष्टात आणू शकते किंवा वाढवू शकते.