करोनामुळे गेली दोन वर्षे वाहन उत्पादक कंपन्या सावध भूमिका घेत गुंतवणूक करीत असताना टाटा मोटर्स या भारताच्या अग्रगण्य वाहन उत्पादक कंपनीने मात्र नावीन्यतेवर भर देत बाजारात नवे पर्याय देत आहे. टाटा मोटर्स विद्युत वाहन निर्मितीतही आघाडीवर आहेत. मात्र टाटाच्या सीएनजीवरील कारची प्रतीक्षा कार खरेदीदारांना होती. टाटाने आता यातही दमदार पदार्पण केले आहे. बुधवारी टाटाने त्यांच्या लोकप्रिय कार टियागो व टिगोर यामध्ये प्रगत सीएनजी तंत्रज्ञान लाँच करीत त्या नव्या रूपात बाजारात आणल्या आहेत.

कंपनी फिटेड सीएनजी कार देणाऱ्या सध्या भारतात दोनच महत्त्वाच्या कार उत्पादक कंपन्या आहेत. एक म्हणजे मारुती सुझुकी आणि दुसरी ह्यांदाई. मारुतीच्या अल्टो, एस प्रेसो, सेलेरिओ, वॅगनार, डिझायर, अर्टिगा आणि इको या सीएनजीवरील कार उपलब्ध असून ह्युंदाई मोटर्सच्या ग्रॅन्ड आय टेन, सॅन्ट्रो, ऑरा आणि एक्ससेन्ट या चार कार सीएनजीवरील कार उपलब्ध आहेत. या दोन्ही कंपन्यांचा या प्रकारातील वाहनांमध्ये दबदबा आहे. 

LinkedIn, top companies, india
वित्तीय, तंत्रज्ञान क्षेत्राची आघाडी; लिंक्डइनकडून देशातील मोठ्या २५ कंपन्यांची यादी जाहीर
Pune model of co-working space From start-ups to large companies everyone is getting preference
को- वर्किंग स्पेसचे पुणेरी मॉडेल! स्टार्टअपपासून मोठ्या कंपन्यांपर्यंत सर्वांचीच मिळतेय पसंती
Apple Company has decided to fires 600 employees in California
‘ॲपल’कडून ६०० कर्मचाऱ्यांना नारळ; कंपनीकडून करोनानंतरची पहिलीच मोठी कर्मचारी कपात
Force Motors out of tractor business news
फोर्स मोटर्स ट्रॅक्टर व्यवसायातून बाहेर

पेट्रोल, डिझेलची झालेली दरवाढ पाहता हरित, उत्सर्जन अनुकूल गतिशीलतेसाठी मागणी झपाटय़ाने वाढत आहे. यात विद्युत कार खरेदीकडे अजून खरेदीदार वळलेला दिसत नाही. विद्युत कारच्या  अधिकच्या किमती व पायाभूत सुविधा नसल्याने काही मोजक्याच विद्युत कार बाजारात आल्या आहेत. त्यातही टाटा आघाडीवर असून त्यांनी नेक्सॉन आणि टिगोर इव्ही या दोन कार उपलब्ध करून दिल्या आहेत. 

२०२० या वर्षांतील एप्रिल ते स्पटेंबर या सहा महिन्यांत ५१ हजार ४४८ सीएनजी कारची विक्री झाली होती तर २०२१ या वर्षांत याच कालावधीत त्यात दुपटीने वाढ होत १ लाख १ हजार ४१२ कारच विक्री झाली आहे. यावरून सीएनजी कारला असलेली मागणी अधोरेखित होते. असे असताना टाटा सीएनजीवरील कारची निर्मिती का करीत नाही असा एक प्रश्न खरेदीदारांना होता. या प्रश्नाला टाटाने उशिरा का होईना प्रतिसाद देत दोन लोकप्रिय कार टियागो व टिगोर सीएनजीवर बाजारात उपलब्ध करून दिल्या आहेत. 

सर्वोच्च शक्ती

नवीन आयसीएनजी टियागो व टिगोरमध्ये रेवोट्रॉन १.२ लिटर बीएस-६ इंजिनची शक्ती आहे. हे इंजिन ७३ पीएसची अधिकतम शक्ती निर्माण करते, जी या विभागामधील कोणत्याही सीएनजी कारसाठी सर्वोच्च आह, असा कपनीचा दावा आहे. आयसीएनजी कार्समध्ये दर्जात्मक तंत्रज्ञान व वैशिष्टय़े आहेत. कार्यक्षमता देण्यासाठी आणि पेट्रोल ते सीएनजी व सीएनजी ते पेट्रोल या इंधन मोड्सच्या एकसंधी शििफ्टगसाठी उत्तमरीत्या तयार करण्यात आल्या आहेत. ज्यामुळे ग्राहकांना  सर्वोत्तम कार चालवण्याचा अनुभव मिळतो. सीएनजी ग्राहकांना निवड करण्याची सुविधा देण्याच्या प्रयत्नामध्ये टाटा मोटर्सने टियागो व टिगोरच्या ट्रिम लेव्हल्समध्ये त्यांची आयसीएनजी वाहने उपलब्ध केली आहेत. दोन्ही कार्स सर्व ग्राहकांसाठी प्रमाणित पर्याय म्हणून दोन वर्षांची वॉरंटी किंवा ७५,००० किमीपर्यंतची वॉरंटी देण्यात आली आहे.

प्रतीक्षा का?

‘टाटा’च्या कार सीएनजी प्रकारात याव्यात अशी खरेदीदारांची अपेक्षा होती. मात्र टाटाने या प्रकारात कार बाजारात आणली नव्हती. याबाबत टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेईकल्सचे विक्री, विपणनचे उपाध्यक्ष राजन अंबा यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, टाटाने सीएनजी कार देण्याचा अचानक निर्णय घेतला असे नाही. यावर अनेक दिवसांपासून काम सुरू होते. ग्राहकांना सर्वोत्तम देण्यासाठी आम्ही काम करीत होतो व आता ‘टाटा’ने या दोन कार सर्वोत्तम दिल्या आहेत. चांगली वाहने देण्यासाठी वेळ तर लागतोच, असेही त्यांनी सांगितले.

चार आधारस्तंभ

कार्यक्षमता– दर्जात्मक शक्ती, सुलभ गतिशीलता, प्रत्येक प्रदेशामध्ये प्रभावी ड्रायिव्हग आणि रिटन्र्ड सस्पेंशनसह टियागो व टिगोर आयसीएनजी त्यांच्या संबंधित विभागामध्ये निश्चितच सर्वात शक्तिशाली कार्स आहेत, असा कंपनीचा दावा आहे. 

सुरक्षितता – सुरक्षिततेसाठी प्रमाणित व्यासपीठावर निर्माण करण्यात आलेल्या दोन्ही कार्समध्ये अत्यंत मजबूत स्टीलचा वापर करण्यात आला असून दर्जात्मक सुरक्षितता वैशिटय़े आहेत- जसे दोन एअरबॅग्ज, एबीएससह ईबीडी व कॉर्नर स्टेबिलिटी कंट्रोल.

तंत्रज्ञान- सिंगल अडवान्स ईयीसू, इंधनांमध्ये ऑटो स्विचओव्हर, सीएनजीमध्ये डायरेक्ट स्टार्ट (सेगमेंट फस्र्ट), जलद रिफ्यूइिलग आणि डिजिटल इन्स्ट्रमेंट क्लस्टरसह टियागो व टिगोर आयसीएनजी त्यांच्या मालकांना अधिक आरामदायीपणा व सोयीसुविधा देण्यासाठी उत्तमरीत्या डिझाइन करण्यात आल्या आहेत.

आकर्षक वैशिष्टय़े–  दोन्ही कार्समध्ये सर्वोत्तम वैशिष्टय़ांची भर करण्यात आली आहे. टियागो आयसीएनजीमध्ये प्रोजेक्टर हेडलॅम्प्स, एलईडी डीआरएल, बाहेरील भागावर क्रोम सजावट आणि प्रिमिअम ब्लॅक व बीज डय़ुअल टोन इंटीरिअर्स अशी नवीन वैशिष्टय़े आहेत. टिगोर आयसीएनजीमध्ये रेन सेिन्सग वायपर्स, ऑटोमॅटिक हेडलॅम्प्स, डय़ुअल टोन रूफ, नवीन सीट फॅब्रिक आणि नवीन डय़ुअल टोन ब्लॅक व बीज इंटीरिअर्स अशी वैशिष्टय़े आहेत.

तसेच सध्याच्या कलर पॅलेटमध्ये अधिक भर करत कंपनीने टियागोमध्ये आकर्षक नवीन मिडनाइट प्लम आणि टिगोरमध्ये मॅग्नेटिक रेड या रंगांची भर केली आहे.

सीएनजी सक्षम वाहनांच्या झपाटय़ाने विकसित होणाऱ्या विभागामध्ये या प्रवेशासह आम्ही आमच्या सूक्ष्मदर्शी ग्राहकांना अधिक निवड देत आहोत. आमची आयसीएनजी श्रेणी अविश्वसनीय कार्यक्षमता, प्रीमिअम वैशिष्टय़ांची व्यापक रेंज, अपमार्केट इंटीरिअर्स आणि तडजोड न करणाऱ्या सुरक्षिततेसह आनंददायी अनुभव देईल. रचना, कार्यक्षमता , सुरक्षा आणि तंत्रज्ञान दिल्याने या कार या श्रेणीप्रती लोकप्रियतेमध्ये अधिक वाढ  करतील. – शैलेश चंद्रा,  व्यवस्थापकीय संचालक, टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेईकल्स लि. आणि टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटी

टियागो किंमत

एक्सएम : ६,३९,९००

एक्सई : ६,०९,९००

एक्सटी : ६,६९,९००

एक्सझेड : ७,५२,९००

टिगोर

एक्सझेड : ७,६९,९००

एक्सझेड  : ८,२९,९००

दिल्ली एक्स शोरुम