Tata vs Maruti vs Hyundai: भारतीय बाजारपेठेत सर्वाधिक स्पर्धा एसयूव्ही कारमध्ये होत आहे. मारुती सुझुकी ते टाटा मोटर्स आणि ह्युंदाई सारख्या कंपन्या अधिकाधिक ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत. जर आपण सर्वाधिक विकल्या जाणार्‍या एसयूव्हीबद्दल बोललो तर या प्रकरणात टाटा मोटर्सच्या वाहनाने इतर कंपन्यांसाठी अडचणी निर्माण केल्या आहेत. मारुती सुझुकी ब्रेझा ही गेल्या दोन महिन्यांपासून सर्वाधिक विक्री होणारी SUV असली तरी टाटाची कार देखील सर्वाधिक विक्री होणाऱ्या SUV च्या यादीत कायम आहे. आर्थिक वर्ष २०२३ मध्ये देखील ही SUV सर्वाधिक खरेदी करण्यात आली आहे.

‘या’ कारने वर्षभर गाजवले वर्चस्व

Tata Nexon SUV ही FY23 मध्ये सर्वाधिक विकली जाणारी SUV आहे. संपूर्ण वर्षात १७२,१३९ युनिट्सची विक्री झाली आहे. अशाप्रकारे, Nexon ने FY२०२३ च्या तुलनेत ३८.६८ टक्क्यांची वाढ नोंदवली आहे. संपूर्ण आर्थिक वर्षात १५०,३७२ युनिट्सच्या विक्रीसह Hyundai Creta दुसऱ्या स्थानावर आहे. त्याचप्रमाणे मारुती सुझुकी ब्रेझा FY23 मध्ये १४५,६६५ युनिट्स विकून तिसऱ्या क्रमांकावर आहे.

why Sleeping Pills Rising Among Young Adults
झोपेच्या गोळ्या निद्रानाशावरचा अंतिम उपाय आहेत का? झोपेच्या गोळ्या शक्यतो घेऊ नका असं डॉक्टर का सांगतात?
Best Selling Car
Baleno, Brezza, Nexon, Creta नव्हे तर ‘या’ ५.५४ लाखाच्या हॅचबॅक कारसाठी ग्राहकांच्या लागल्या रांगा, झाली तुफान विक्री
Mumbai new road
मुंबई : रस्त्यांच्या कॉंक्रिटीकरणाच्या नवीन कामांसाठी १५ कंत्राटदारांचा प्रतिसाद
Sensex Nifty gains higher as a result of mineral oil prices
तेलाच्या भडक्याने ‘सेन्सेक्स-निफ्टी’च्या दौडीला पाचर

मार्चमध्ये दुसऱ्या क्रमांकावर

मार्च महिन्याबद्दल बोलायचे झाल्यास, टाटा नेक्सॉन ही १४,७६९ युनिट्सची विक्री करून दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक विक्री होणारी SUV ठरली आहे. तथापि, पहिल्या स्थानावर मारुती ब्रेझा आहे, ज्याने १६,२२७ युनिट्सची विक्री केली. तिसरा क्रमांक Hyundai Creta ने मिळवला ज्याने १४,०२६ युनिट्सची विक्री केली.

(हे ही वाचा : मारुतीचा खेळ संपला? टाटाने खेळला नवा गेम, दोन सिलिंडर कारची केली बुकिंगच सुरु, मे मध्ये विक्री, किंमत…)

किंमत आणि वैशिष्ट्ये

Tata Nexon SUV ची किंमत ७.७९ लाख रुपयांपासून सुरू होते आणि टॉप मॉडेलसाठी १४.३५ लाख रुपयांपर्यंत जाते. हे पेट्रोल आणि डिझेल इंजिनसह अनेक प्रकारांमध्ये उपलब्ध आहे. पेट्रोल व्हेरियंटमध्ये १.२-लिटर टर्बोचार्ज केलेले इंजिन आहे, जे ११८bhp पॉवर आणि १७०Nm टॉर्क प्रदान करते. त्याचवेळी, डिझेल वेरिएंटमध्ये १.५ लिटर इंजिन आहे, जे १०८bhp पॉवर आणि २६०Nm टॉर्क प्रदान करते. यासोबतच ६-स्पीड मॅन्युअल आणि AMT ट्रान्समिशनचे पर्याय देण्यात आले आहेत.

वाहनाला एक नवीन स्टीयरिंग व्हील मिळते, ज्याला एक प्रीमियम दिसणारा मल्टीमीडिया आणि लहान हॉर्न पॅडसह क्रूझ कंट्रोल बटणे मिळतात. याशिवाय, यात डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि ७-इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम देखील मिळते. ही कार ६ वेगवेगळ्या रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे आणि ५ लोकांची आसनक्षमता आहे. ती मारुती ब्रेझा, ह्युंदाई व्हेन्यू, किया सोनेट, रेनॉल्ट किगर आणि निसान मॅग्नाइटशी स्पर्धा करते.