scorecardresearch

‘ही’ स्कूटर घेण्यासाठी ग्राहकांची शोरुम्सवर गर्दी, किंमत फक्त ७४ हजार, ३० दिवसात विकल्या १.७४ लाख स्कूटी

Best Selling Scooter: फेब्रुवारी महिन्यात ‘या’ स्कूटरने मार्केटमध्ये राज्य केला आहे. देशात मागच्या महिन्यात ह्या स्कूटर सर्वाधिक विकल्या गेल्या आहेत. चला तर जाणून घेऊया कोणत्या आहेत, या स्कूटर…

scooters
'ही' स्कूटर घेण्यासाठी ग्राहक तुटून पडले(Photo-financialexpress)

Best Selling Scooter: फेब्रुवारीमध्ये सर्वाधिक विक्री होणाऱ्या दुचाकींबद्दल आम्ही तुम्हाला आधीच सांगितले आहे. स्कूटरला भारतात बाइक्सइतकीच मागणी आहे. Hero पासून Honda आणि TVS पर्यंत वेगवेगळ्या किमतीच्या स्कूटर विकत आहेत. गेल्या काही महिन्यांपासून स्कूटरच्या मागणीत वाढ झाली आहे. या सेगमेंटमध्ये इलेक्ट्रिक मॉडेल्सच्या विक्रीतही सातत्याने वाढ होत आहे. आज आपण गेल्या महिन्यातील टॉप दहा स्कूटर पाहणार आहोत. फेब्रुवारी २०२३ मध्ये टॉप दहा स्कूटरची विक्री ३,६०,९६३ युनिट्स झाली आहे, जी फेब्रुवारी २०२२ च्या तुलनेत ३०.०९ टक्के जास्त आहे.

भारतीय ग्राहकांचा ‘या’ ५ स्कूटर्सवर विश्वास

१. Honda Activa विक्रीत अव्वल स्थानावर आहे. फेब्रुवारी २०२३ मध्ये त्याची १,७४,५०३ युनिट्सची विक्री झाली आहे. फेब्रुवारी २०२२२ मध्ये विकल्या गेलेल्या १,४५,३१७ युनिटच्या तुलनेत ही २०.०८ टक्के वाढ आहे. स्कूटर चार प्रकारांमध्ये येते, स्टँडर्ड, डिलक्स, प्रीमियम एडिशन डिलक्स आणि स्मार्ट की. त्याची किंमत ७४ हजार रुपयांपासून सुरू होते.

२. TVS ज्युपिटर गेल्या महिन्यात ५३,८९१ युनिट्सच्या विक्रीसह दुसऱ्या क्रमांकावर होता. फेब्रुवारी २०२३ मध्ये विकल्या गेलेल्या ४७,०९२ युनिट्सच्या तुलनेत ज्युपिटरने १४.४४ टक्के वाढ नोंदवली आहे.

(हे ही वाचा: Royal Enfield Classic 350 च्या किमतीत खरेदी करा मारुतीची ‘ही’ लोकप्रिय कार, ऑफर जाणून होणार थक्क )

३. फेब्रुवारी २०२३ मध्ये, Suzuki Access ची विक्री ७.१५ टक्क्यांनी वाढून ४०,१९४ युनिट झाली. फेब्रुवारी २०२२ मध्ये ३७,५१२ मोटारींची विक्री झाली. जरी त्याची विक्री मासिक आधारावर थोडी कमी झाली आहे.

४. ओला या यादीत चौथ्या क्रमांकावर, पुन्हा एकदा भारताचा नंबर १ इलेक्ट्रिक स्कूटर ब्रँड. फेब्रुवारी २०२३ मध्ये ओलाची किरकोळ विक्री १७,६४७ युनिट्स होती, जी फेब्रुवारी २०२२ च्या तुलनेत ३५१.३३ टक्के जास्त होती.

५. TVS Ntorq विक्री फेब्रुवारी २०२३ मध्ये २५.७४ टक्क्यांनी घसरून १७,१२४ युनिट्सवर आली. फेब्रुवारी २०२२ मध्ये त्याची २३,०६१ युनिट्सची विक्री झाली.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 20-03-2023 at 12:06 IST

संबंधित बातम्या