scorecardresearch

Royal Enfield Classic 350 च्या किमतीत खरेदी करा मारुतीची ‘ही’ लोकप्रिय कार, ऑफर जाणून होणार थक्क

कमी किमतीमध्ये जास्त मायलेज देणारी नवीन कार खरेदीचा विचार करत असाल तर एका भन्नाट डिस्काउंट ऑफरबद्दल जाणून घ्या, ज्याच्या मदतीने तुम्ही तुमच्यासाठी बाजारात लोकप्रिय ठरलेली कार खरेदी करु शकता.

Maruti Dzire
Maruti Dzire स्वस्तात आणा घरी (Photo-financialexpress)

सेडान कारच्या सेगमेंटमध्ये, फक्त कमी बजेटच्या कार आहेत, त्यापैकी एक मारुती सुझुकी डिझायर आहे, ज्याला कमी बजेटमध्ये जास्त मायलेज, केबिन स्पेस आणि बूट स्पेससाठी प्राधान्य दिले जाते. मारुती डिझायरची सुरुवातीची किंमत ६.४४ लाख रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) आहे जी टॉप मॉडेलसाठी ९.३१ लाख रुपयांपर्यंत जाते. जर तुम्हाला ही सेडान आवडली असेल पण तुमच्याकडे ती खरेदी करण्याचे बजेट नसेल, तर तुम्ही त्या ऑफर्सची माहिती जाणून घेऊ शकता ज्यामध्ये तुम्हाला मारुती डिझायरचे सेकंड हँड मॉडेल अर्ध्या किमतीत मिळू शकते.

मारुती डिझायरवरील ऑफर मारुती सुझुकीच्या सेकंड हँड कार विक्री आउटलेट MARUTI SUZUKI TRUE VALUE वरून घेण्यात आली आहे. ज्यामध्ये तुम्हाला या कारच्या तपशीलासह ऑफरची संपूर्ण माहिती कळेल.

MARUTI SUZUKI TRUE VALUE वरील ऑफर अंतर्गत, ग्राहकांना येथे सूचीबद्ध Dzire खरेदी करताना फायनान्स प्लॅन, वॉरंटी आणि फायनान्स प्लॅन देखील मिळतील.

(हे ही वाचा : ५.६९ लाखाच्या जबरदस्त कारची बंपर विक्री, ‘या’ कारपुढे Mahindra पासून Tata पर्यंत सर्वच झाल्या फेल!)

‘या’ ठिकाणी माॅडेल आहे स्वस्तात उपलब्ध

  • नवसारी येथे नोंदणीकृत मॅन्युअल ट्रान्समिशन मॉडेलसह २०१२ मारुती सुझुकी डिझायर येथे सूचीबद्ध आहे. या कारची मालकी पहिली आहे आणि ही कार आजपर्यंत १,९५,२३६ किमी धावली आहे. ही कार खरेदी करताना ६ महिन्यांची वॉरंटी, मोफत सेवा आणि फायनान्स प्लॅन देखील मिळू शकते.
  • मारुती डिझायरची दुसरी ऑफर OLX वेबसाइटवर अपलोड करण्यात आली आहे. येथे दिल्ली नोंदणीसह मारुती डिझायरचे २०१३ चे मॉडेल सूचीबद्ध आहे. या कारची किंमत २.३ लाख रुपये ठेवण्यात आली आहे, परंतु विक्रेत्याकडून तिच्यासोबत कोणतीही ऑफर किंवा फायनान्स प्लॅन उपलब्ध होणार नाही.
  • कमी बजेटमध्ये वापरलेली मारुती डिझायर खरेदी करण्याचा तिसरा स्वस्त सौदा CARTRADE वेबसाइटवर उपलब्ध आहे. या कारचे मॉडेल वर्ष २०१४ आहे आणि तिची नोंदणी हरियाणाची आहे. या कारची किंमत ३ लाख रुपये ठेवण्यात आली असून, या कारच्या खरेदीवर फायनान्स प्लॅनची ​​सुविधाही मिळणार आहे.

महत्त्वाची सुचना: मारुती डिझायर मॉडेल्सवर उपलब्ध ऑफर पाहिल्यानंतर, तुम्ही तुमच्या बजेट आणि पसंतीनुसार कोणताही पर्याय निवडू शकता. परंतु कोणताही पर्याय खरेदी करण्यापूर्वी, तुम्ही कारची खरी स्थिती तपासली पाहिजे जेणेकरून डील झाल्यानंतर तुम्हाला नुकसान सहन करावे लागणार नाही.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 20-03-2023 at 10:40 IST

संबंधित बातम्या