जपानी ऑटोमेकर टोयोटा किर्लोस्कर मोटर कंपनीचा भारतीय वाहन बाजारात दबदबा वाढू लागला आहे. टोयोटाच्या कारला बाजारात मोठी मागणी आहे. टोयोटाची वाहनं देशात मोठ्या प्रमाणात पसंत केल्या जातात. टोयोटाची एसयूव्ही वाहने जगभरात लोकप्रिय आहेत. टोयोटा मोटर्स बाजारपेठेत आपले नवनवे माॅडेल्स लाँच करीत असते. टोयोटा कंपनीच्या एका कारला बाजारात तुफान मागणी आहे. या तगड्या मागणीमुळे कंपनीने कार्ससाठी बुकिंग्स घेणं थांबवलं आहे. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कंपनी आपल्या नवीन गाड्या विकण्यासाठी ग्राहकांकडून बुकिंग घेते, ज्याच्या आधारे उत्पादन किती करायचे हे ठरवले जाते. तथापि, काही वेळा कंपनीला जास्त मागणीमुळे बुकिंग थांबवावे लागते. असे घडते याचे कारण म्हणजे कंपनी दिलेल्या वेळेत मर्यादित संख्येनेच कार बनवू शकते. कंपनीने अधिक बुकिंग घेतल्यास गाड्यांच्या प्रतीक्षा कालावधीतही वाढ होईल आणि त्यामुळे ग्राहक इतर कंपन्यांकडे जाण्यास सुरुवात करतील.

(हे ही वाचा : किंमत २.८९ लाख, मायलेज १९.७१ किमी; मारुतीची ७ सीटर कार स्वस्तात आणा घरी, कुठे मिळतेय शानदार डील?)

सध्या टोयोटाच्या बाबतीतही असेच काहीसे घडत आहे. टोयोटाने अलीकडेच आपल्या ८ सीटर एसयूव्ही इनोव्हा हायक्रॉसच्या काही प्रकारांचे बुकिंग थांबवले आहे. इनोव्हा हायक्रॉस – ZX आणि ZX (O) चे हे टॉप रेंज व्हेरियंट आहेत. त्यांचे बुकिंग सुरू होऊन केवळ एक महिना झाला होता पण कंपनीने पुन्हा बुकिंग बंद करण्याचा निर्णय घेतला. टोयोटा हायक्रॉसच्या या प्रकारांना जोरदार मागणी आहे. परंतु कंपनी त्यानुसार पुरवठा करू शकत नाही. एप्रिल २०२३ मध्येही टोयोटाने पुरवठा समस्यांमुळे ZX आणि ZX (O) साठी बुकिंग घेणे बंद केले होते. आता पुन्हा एकदा कंपनीने असेच केले आहे.

कंपनीला ग्राहकांकडून इनोव्हा हायक्रॉसला जोरदार मागणी मिळत आहे, परंतु कंपनी मर्यादित प्रमाणातच कार पुरवू शकते. यामुळे कंपनीला वारंवार बुकिंग थांबवावे लागत आहे. ZX आणि ZX (O) च्या बंपर बुकिंगमुळे, दोन्ही प्रकारांचा प्रतीक्षा कालावधी वाढला आहे, ज्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी कंपनीला बुकिंग थांबवावे लागले.

(हे ही वाचा : बाकी कंपन्यांना फुटला घाम! महिंद्राच्या ‘या’ स्वस्त ७ अन् ९ सीटर कारला दरमहिन्याला मिळतेय १० हजार बुकींग, किंमत…)

इनोव्हा हायक्रॉस ZX किंमत

इनोव्हा हाय क्रॉसच्या ZX व्हेरियंटची एक्स-शोरूम किंमत ३०.३४ लाख रुपये आहे, तर ZX (O) व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत ३०.९८ लाख रुपये आहे. मे २०२४ पर्यंत, संकरित मॉडेल VX आणि VX (O) प्रकारांमध्ये उपलब्ध असेल ज्याचा प्रतीक्षा कालावधी १४ महिन्यांपर्यंत पोहोचेल.

इनोव्हा हायक्रॉस इंजिन आणि प्रकार

टोयोटा इनोव्हा हायक्रॉस दोन इंजिन पर्यायांसह येते, ज्यात २.० लिटर मजबूत हायब्रिड इंजिन आणि २.० लिटर चार सिलेंडर पेट्रोल इंजिन समाविष्ट आहे. हायब्रिड इंजिनमध्ये ई-सीव्हीटी गिअरबॉक्स आहे, तर पेट्रोल इंजिनमध्ये सीव्हीटी गिअरबॉक्स आहे. ही कार सात प्रकारांमध्ये येते – G, GX, GX (O), VX, VX (O), ZX आणि ZX (O). या कारचे मायलेज २४ किमी पर्यंत आहे. कंपनीने नुकतेच आपले नॉन-हायब्रिड GX (O) मॉडेल सादर केले आहे, ज्याची किंमत २०.९९ लाख रुपये आहे.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Toyotas decision to temporarily halt bookings for innova hycross zx and zx o variants pdb
First published on: 23-05-2024 at 19:33 IST