टू व्हीलर सेक्टरच्या स्कूटर सेगमेंटमध्ये मायलेज स्कूटरपासून ते हाय स्पीड आणि स्पोर्टी डिझाइन्सच्या स्कूटर उपलब्ध आहेत. तुम्हालाही स्पोर्टी डिझाईनची स्कूटर खरेदी करायची असेल, तर तुम्ही या सेगमेंटच्या दोन लोकप्रिय स्कूटर्सची संपूर्ण माहिती जाणून घेऊ शकता. या तुलनेसाठी TVS Ntorq 125 आणि Aprilia SR 125 स्कूटर आहेत. यात तुम्हाला या दोन्ही स्कूटर्सच्या किंमतपासून मायलेजपर्यंतची संपूर्ण माहिती मिळेल.

TVS Ntorq 125: टीव्हीएस एनटॉर्क १२५ ही कंपनीची एक लोकप्रिय स्कूटर आहे. कंपनीने पाच प्रकार आतापर्यंत बाजारात लाँच केले आहेत. स्कूटरमध्ये सिंगल सिलेंडरसह १२४.८ सीसी इंजिन आहे. हे इंजिन १०.२ पीएस पॉवर आणि १०.८ एनएम पीक टॉर्क जनरेट करते. ब्रेकिंग सिस्टीमबद्दल सांगायचे तर, कंपनीने पुढच्या चाकामध्ये डिस्क ब्रेक आणि मागील चाकामध्ये ड्रम ब्रेक दिले आहेत. यात अलॉय व्हील आणि ट्यूबलेस टायर देण्यात आले आहेत. टीव्हीएस एनटॉर्क १२५ स्कूटर ५४.३३ किमीचा मायलेज देते. हा मायलेज ARAI ने प्रमाणित केला आहे. टीव्हीएस एनटॉर्क १२५ कंपनीने ७७,१०६ रुपये (एक्स-शोरूम) सुरुवातीच्या किंमतीसह बाजारात लाँच केली आहे. टॉप व्हेरिएंटमध्ये जाताना ८९,२११ रुपयांपर्यंत जाते.

boys did dangerous stunt with car to make reels video went viral on social media
रिल्ससाठी जीवघेणा स्टंट! मित्राला प्लास्टिकच्या रॅपरमध्ये गुंडाळले अन् चालत्या कारच्या बाहेर…
This fan’s reaction after seeing Shubman Gill at hotel is viral Relatable much
“दिल मे बजी घंटी…टंग टंग टंग!” शुभमन गिलला समोर पाहताच चाहतीच्या काळजाचा चुकला ठोका! Viral Video एकदा बघाच
Jugaad Video
चावी न वापरता सुरू करता येईल स्कुटी! अनोखा जुगाड पाहून तुम्हीही व्हाल अवाक्, पाहा व्हिडीओ
kid making sandwich for grandpa viral video
गोंडस चिमुकल्या शेफने बनविले आजोबांसाठी सॅण्डविच! व्हायरल Video पाहून तुम्हीही कराल कौतुक…

विश्लेषण: Okinawa ने ३,२१५ इलेक्ट्रिक स्कूटर्स परत मागवल्या, कारण…

Aprilia SR125: अप्रीलिया एसआर १२५ ही एक प्रीमियम स्कूटर आहे. कंपनीने वेगवान गतीसह आकर्षक डिझाइनमध्ये बनवली आहे. कंपनीने या स्कूटरचे तीन प्रकार बाजारात लाँच केले आहेत. स्कूटरच्या इंजिन आणि पॉवरबद्दल बोलायचे झाले तर, कंपनीने यामध्ये १२४.४५ सीसीचे सिंगल सिलिंडर इंजिन दिले आहे. हे इंजिन ९.९२ पीएस पॉवर आणि ९.७ एनएम पीक टॉर्क जनरेट करते. पुढच्या चाकामध्ये डिस्क ब्रेक बसवण्यात आला आहे आणि मागील चाकामध्ये ड्रम ब्रेक आहे. तसेच ट्यूबलेस टायर आणि अलॉय व्हील्स जोडण्यात आले आहेत. मायलेजबद्दल कंपनीचा दावा आहे की, ही स्कूटर ३८ किमीचा मायलेज देते आणि हा मायलेज ARAI ने प्रमाणित केला आहे. अप्रीलिया एसआर १२५ ची प्रारंभिक किंमत ९६,०३७रुपये आहे, जी टॉप व्हेरियंटमध्ये जाताना १.०८ लाखांपर्यंत जाते.