scorecardresearch

प्रतीक्षा संपली! ULTRAVIOLETTE F77 आज होणार लाँच; ३०७ किमी रेंज, ‘ही’ आहे टॉप स्पीड

Ultraviolette F77 luanch : आज अल्ट्राव्हॉयलेट ही कंपनी तिची बहुप्रतीक्षित Ultraviolette F77 ही बाईक आज भारतात लाँच करणार आहे. बाईक स्थानिक पातळीवर डिजाईन करण्यात आली असून ती टप्प्याटप्प्याने देशात सादर केली जाणार आहे.

प्रतीक्षा संपली! ULTRAVIOLETTE F77 आज होणार लाँच; ३०७ किमी रेंज, ‘ही’ आहे टॉप स्पीड
(pic credit – financial express)

Ultraviolette F77 luanch in india : इेलक्ट्रिक स्कुटर्सनंतर अनेक कंपन्या आता इलेक्ट्रिक बाईकवर काम करत आहेत. मॅटरने आधीच आपली गियर इलेकट्रिक ई बाईक बाजारात लाँच केली आहे. त्यानंतर आज अल्ट्राव्हॉयलेट ही कंपनी तिची बहुप्रतीक्षित Ultraviolette F77 ही बाईक आज भारतात लाँच करणार आहे. बाईक स्थानिक पातळीवर डिजाईन करण्यात आली असून ती टप्प्याटप्प्याने देशात सादर केली जाणार आहे. सुरुवात बंगळुरूपासून होणार आहे. ही बाईक अमेरिका आणि युरोपमध्येही विक्रीसाठी उपलब्ध करण्यात येणार आहे.

सिंगल चार्जमध्ये इतक्या रेंजचा दावा

सिंगल चार्जमध्ये Ultraviolette F77 ही बाईक ३०७ किमीची रेंज देत असून तिची सर्वोच्च स्पीड १५० किमी प्रति तास असल्याचा दावा करण्यात आला आहे. या बाईकची एक्स शोरूम किंमत २ लाखांवर असण्याची शक्यता आहे. २३ ऑक्टोबरपासून बाईकसाठी प्री बुकिंगची सुरुवात झाली होती.

(2023 TATA TIGOR EV ३१५ किमी रेंजसह सादर; जाणून घ्या किंमत आणि फीचर्स)

कंपनीनुसार, अल्ट्रावॉयलेट एफ ७७ मध्ये भारतातील विद्यमान इलेक्ट्रिक बाईकपेक्षा २.५ एक्स जास्त बॅटरी क्षमता आहे. बाईकचे संपूर्ण बॅटरी आर्किटेक्चर आणि बॅटरी व्यवस्थापन प्रणाली ही अल्ट्राव्हॉयलेटने डिजाईन आणि विकसित केली आहे. एफ ७७ बाईकच्या बॅटरीची अ‍ॅसिलरेटेड एजिंग आणि थर्मल स्ट्रेस चाचणी करण्यात आली आहे, असा कंपनीचा दावा आहे.

बाईक लेझर, एअर स्ट्राइक आणि शाडो या तीन व्हेरिएंटमध्ये लाँच होणार असल्याचे कंपनीने सांगितले होते. बाईक पूर्वीपेक्षा ३० टक्के हलकी असून दुप्पट कडक आहे. याने चांगली स्थिरता मिळेल आणि चालकाला अधिक सुरक्षा मिळेल, असा दावा कंपनीचे म्हणणे आहे. बाईकचे बॅटरी पॅक अ‍ॅल्युमिनियम केसिंगच्या आत असून ते भारतातील कोणत्याही इलेक्ट्रिक दुचाकीपेक्षा मोठे असल्याचा कंपनीचा दावा आहे. बॅटरी पॅसिव्ह एअर कुलिंग तंत्रज्ञान आणि सुरक्षेच्या पाच स्तरांसह मिळणार असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे.

मराठीतील सर्व ऑटो ( Auto ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या