खड्डेमय रस्ते आणि वाहतूक कोंडी यामुळे इच्छित ठिकाणी वेळेवर पोहोचणं कठीण असतं. त्यामुळे अशा अडचणीत असताना थेट उडून एखाद्या ठिकाणी जावं अशी कल्पना आपल्या मनात येतं.अशी वाहनं आपण भविष्याचा वेध घेणाऱ्या काल्पनिक चित्रपटात अनेकदा पाहिली आहेत. आता ही कल्पना प्रत्यक्षात येईल, असं कुणी म्हटलं तर तुम्हाचा विश्वास बसणार नाही. पण भविष्यात ऑटो क्षेत्रात बरेचसे बदल आपल्याला पाहायला मिळणार आहेत. इलेक्ट्रिक वाहनांसोबत आता फ्लाईंग कार आणि ऑक्टोकॉप्टरमधून आपल्याला प्रवास करता येणार आहे. नुकतंच फ्लाईंग सॉसरने सरळ उड्डाण करत भविष्यातील वाहतुकीचा रस्ता दाखवला आहे. वॉशिंगटन आधारित कंपनी झेवा एरोने ही कल्पना प्रत्यक्षात साकार करून दाखवली आहे. झेवा एरोचे सह-संस्थापक आणि सीईओ स्टीपन टिबिट्स यांच्या प्रयत्नांना यश मिळालं आहे. फ्लाईंग सॉसरसारख्या वाहनाच्या प्रोटोटाइपने नुकतेच पूर्ण स्केल वर्टिकल टेकऑफ केले.

टिबिट्स यांनी सांगितलं की, “हे एक ऑक्टोकॉप्टर आहे. वरच्या बाजूला असलेल्या चार आणि तळाशी असलेल्या चार मोटर्स आहेत. हे एक मिश्रित विंग बॉडी आहे. पुढे उडत असताना सरळ वर जाता येतं. या वाहनांचा प्राथमिक उपयोग डॉक्टरांना अपघातस्थळी तात्काळ पोहोचण्यास होणार आहे. जेणेकरून आघातग्रस्तांवर शक्य तितक्या लवकर उपचार करता येतील. आमच्याकडे अनेक श्रीमंत व्यक्ती आहेत. त्यांना लेक हाऊसमधून शहराकडे आणि त्यांच्या कार्यस्थळी यातून उड्डाण करायचे आहे.” पेंटागॉनने देखील या स्टार्टअपमध्ये स्वारस्य दाखवलं आहे. प्रत्येकाच्या दारासमोर हे वाहन असायला हवं असं झेवा एरोचे उद्दिष्ट आहे.

wildlife lovers, Tigers, forest, cages,
‘वाघ जंगलात नको, पिंजऱ्यात हवेत का?’ वन्यजीवप्रेमींचा सवाल; प्रकरण काय? जाणून घ्या…
uran, fishers, financial crisis
मत्स्यसंपदा घटल्याने लाखो मच्छीमारांवर आर्थिक संकट
Maldhok birds
अग्रलेख: पूतनामावशीचे पर्यावरणप्रेम!
navi mumbai, Water Supply Worker, neglect, Leads to Flood Like Situation, main valve broke, water entered the chalwl, water supply workers slept, water waste, kopar khairane news, navi mumbai news, water news, marathi news, water leakage in kopar khairane,
नवी मुंबई : निष्काळजीपणामुळे लाखो लिटर पाण्याची नासाडी, कर्मचाऱ्यांची झोप नडली; रहिवाशांनी रात्र जागून काढली

या ऑक्टोकॉप्टरची किंमत अंदाजे २,५०,००० अमेरिकन डॉलर्स आहे. त्यामुळे अति श्रीमंत व्यक्ती सोडता इतरांना परवडेल, असं तरी सध्या चित्र नाही. मात्र असं असलं तरी झेवा एरोचे मुख्य तंत्रज्ञान अधिकारी गुरबीर सिंग आशावादी आहेत.”बॅटरी तंत्रज्ञानामध्ये जसजश्या सुधारणा होत आहे, तसा हा क्राफ्ट अधिक चांगला होत जाणार आहे. आम्ही पुढे जात असताना अधिकाधिक चांगल्य गोष्टी करू शकू.”