लक्झरी वाहन निर्माता कंपनी Volvo ने आपली नवीन इलेक्ट्रिक SUV Volvo XC40 रिचार्ज लॉंच केली आहे. कंपनीचा दावा आहे की, ही इलेक्ट्रिक SUV लाँच होताच विक्रीत प्रचंड यश मिळाले आहे, याचा पुरावा तिची प्रचंड मागणीच देत आहे.

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, Volvo XC40 रिचार्ज लॉंच केल्यानंतर कंपनीने त्याचे बुकिंग सुरू केले होते आणि या कारचा संपूर्ण स्लॉट अवघ्या २ तासात बुक झाला. ही इलेक्ट्रिक एसयूव्ही लॉंच केल्यानंतर, कंपनीने पहिल्या टप्प्यात १५० युनिट्सची विक्री करण्याचा निर्णय घेतला होता, ज्यांचे बुकिंग अवघ्या २ तासांत झाले आहे.

कंपनी ऑक्टोबर २०२२ मध्ये या इलेक्ट्रिक एसयूव्हीच्या पहिल्या बॅचची म्हणजेच १५० कारची डिलिव्हरी सुरू करेल आणि डिसेंबर २०२२ पर्यंत सर्व कारची डिलिव्हरी केली जाईल.

आणखी वाचा : Top 3 Best Selling Electric Cars India: ‘या’ आहेत देशातील टॉप ३ बेस्ट सेलिंग इलेक्ट्रिक कार, मजबूत डिझाईनसह मोठी ड्रायव्हिंग रेंज देतात

पहिला स्लॉट पूर्णपणे बुक केल्यानंतर ते खरेदी करू इच्छिणाऱ्या ग्राहकांना लक्षात घेऊन, कंपनीने पुढील वर्षासाठी म्हणजेच २०२३ साठी या इलेक्ट्रिक एसयूव्हीसाठी प्री-बुकिंग सुरू केली आहे.

२०२३ मध्ये Volvo XC40 रिचार्ज खरेदी करण्यासाठी, ग्राहक कंपनीच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन ऑनलाइन बुक करू शकतात किंवा त्यांच्या जवळच्या व्हॉल्वो डीलरशिपला भेट देऊन ऑफलाइन देखील बुक करू शकतात.

जर तुम्ही प्रीमियम इलेक्ट्रिक कार खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर या व्हॉल्वो XC40 रिचार्जची किंमत ते त्याची रेंज, फीचर्स आणि स्पेसिफिकेशनपर्यंतचे संपूर्ण तपशील येथे जाणून घ्या.

आणखी वाचा : बजेट कमी आहे पण हॅचबॅक कार घ्यायचीय? मग अर्ध्यापेक्षा कमी किमतीत खरेदी करा Renault Kwid, वाचा ऑफर

Volvo XC40 Recharge Price
कंपनीने ही इलेक्ट्रिक एसयूव्ही ५५,९०,००० रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीसह लॉंच केली आहे जी ५६,४५,९०० रुपयांपर्यंत जाते.

Volvo XC40 Recharge Variant
Volvo ने या इलेक्ट्रिक SUV चा फक्त एक व्हेरिएंट बाजारात आणला आहे जो पूर्ण लोडेड P8W ट्रिम आहे.

Volvo XC40 Recharge Seating Capacity
ही इलेक्ट्रिक एसयूव्ही ५ सीटर कार आहे, ज्यामध्ये पाच लोक एकाच वेळी प्रवास करू शकतात.

Volvo XC40 Recharge Battery Electric Motor
या इलेक्ट्रिक एसयूव्हीच्या बॅटरी पॅक आणि मोटरबद्दल बोलायचे झाल्यास, कंपनीने यामध्ये ७८ kWh चा लिथियम-आयन बॅटरी पॅक दिला आहे. या बॅटरीसोबत ड्युअल मोटर सेटअप देण्यात आला आहे जी ४०८ PS पॉवर आणि ६६० Nm पीक टॉर्क जनरेट करते.

आणखी वाचा : केवळ ५७ हजारात घरी घेऊन जा ३१ किमी मायलेज देणारी देशातील सर्वात स्वस्त कार Maruti Alto 800 CNG, वाचा ऑफर

Volvo XC40 Recharge Range
ड्रायव्हिंग रेंजबद्दल व्होल्वोचा दावा आहे की, हे XC40 रिचार्ज पूर्ण चार्ज केल्यावर ४१८ किमीची रेंज देते. यासोबतच कंपनीने आपल्या स्पीडबद्दल दावा केला आहे की ही इलेक्ट्रिक एसयूव्ही ४.९ सेकंदात ० ते १०० किलोमीटर प्रति तासाचा वेग वाढवू शकते, ज्यामध्ये कंपनी फोर व्हील ड्राइव्हची सुविधा देत आहे.

Volvo XC40 Recharge Charging
बॅटरीच्या चार्जिंगबाबत कंपनीचा दावा आहे की, फास्ट चार्जरने चार्ज केल्यावर हा बॅटरी पॅक ४० मिनिटांत ८० टक्क्यांपर्यंत चार्ज होतो.

Volvo XC40 Recharge Features
फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास कंपनीने ९ इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, १२ इंच डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, हीटिंग आणि कूलिंग फंक्शनसह पॉवर्ड फ्रंट सीट, पॅनोरॅमिक सनरूफ, ३६० डिग्री व्ह्यू कॅमेरा, ड्युअल झोन क्लायमेट कंट्रोल यांसारखी फीचर्स दिली आहेत.

Volvo XC40 Recharge Safety
सुरक्षितता लक्षात घेऊन व्होल्वोने या SUV मध्ये ISOFIX चाइल्ड सीट अँकर, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टीम, लेन कीप असिस्ट आणि अ‍ॅडॉप्टिव्ह क्रूझ कंट्रोल यांसारखी फीचर्स दिली आहेत.