साहित्य : आइस्क्रीमच्या सहा काडय़ा, फेव्हिक्विक, कात्री, गम, जिलेटिन पेपर, अ‍ॅक्रॅलिक रंग, ब्रश, थ्रीडी आऊटलायनर्स इ.
कृती : आइस्क्रीमच्या ४ काडय़ा कापून घ्या. त्यांचे चपटे समान ८ भाग करा. डोळे पूर्णपणे झाकले जातील अशाप्रकारे या भागांच्या फ्रेम्स बनवा आणि त्या फे व्हिक्विकने चिकटवा. त्या वाळू द्या. आणखी दोन काडय़ांना साधारण माप घेऊन सारख्या अंतरावर खाचा बनवा. बनवलेल्या दोन्ही फ्रेम्स एका छोटय़ा पट्टीच्या तुकडय़ावर चिकटवा व अ‍ॅक्रिलिक रंगात रंगवून घ्या. पूर्णपणे वाळल्यावर
थ्रीडी आऊटलायनर्सने रंगवा, छान सुशोभित करा. मागील बाजूस रंगीत जिलेटिन पेपरचे तुकडे चिकटवा. खाचा केलेल्या काडय़ांनासुद्धा अ‍ॅक्रिलिक रंगात दोन्ही बाजूने रंगवा व वाळू द्या.