25 September 2020

News Flash

विनोदी विदूषक

साहित्य : आइस्क्रीमचा डिस्पोजेबल कप, जॅमचा डिस्पोजेबल डबा, वेगवेगळ्या आकारांचे चपटे-गोल डिस्पोजेबल डबे, रंगीत कार्डपेपर, लेस, बटन, टिकल्या, मणी, स्केचपेन, डबलसाइड टेप, क्रेयॉन्स, पेन्सिल,

| March 31, 2013 01:02 am

साहित्य : आइस्क्रीमचा डिस्पोजेबल कप, जॅमचा डिस्पोजेबल डबा, वेगवेगळ्या आकारांचे चपटे-गोल डिस्पोजेबल डबे,  रंगीत कार्डपेपर, लेस, बटन, टिकल्या, मणी, स्केचपेन, डबलसाइड टेप, क्रेयॉन्स, पेन्सिल, कात्री, रेती किंवा धान्य (मूठभर) केरसुणीची जाड काडी.

कृती : उभट डिस्पोजेबल कपाच्या उंचीच्या आयताकृती रंगीत कागदावर क्रेयॉन्सने तिरप्या रेघा काढून घ्या व तो कागद कपाला चिकटवा. गोलाकार चपटय़ा डिस्पोजेबल जॅमच्या डब्यालाही अशाच पद्धतीने सुशोभित करा. आणखी एक डबी (चपटी-गोल) अशीच बनवा व जॅमच्या डबीला आडवी चिकटवा. विदूषकाचे धड व डोके तयार झाले. डोक्याच्या बाजूस पिवळ्या रंगाचा कार्डपेपर गोलाकार लावा व टिकल्या, मणी, बटन्स लावून चेहरा तयार करा. थोडय़ा मोठय़ा डिस्पोजेबल कपाला खोलगट भागास बाहेरील बाजूस लेस चिकटवा व टोपी तयार करा. विदूषकाचे धड, डोके व टोपी एकमेकांना डबल टेपच्या सहायाने चिकटवा. उभट कपाच्या आत रेती किंवा धान्य घालून त्यात केरसुणीची काडी उभी करा. या काडीवर विदूषकाचे डोके बसवा. हवेने छान हलणारे विनोदी दिसणारे विदूषक तुमच्या टेबलाची शोभा नक्कीच वाढवेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 31, 2013 1:02 am

Web Title: comedy joker
टॅग Loksatta
Next Stories
1 आर्ट गॅलरी
2 होळी
3 आर्ट गॅलरी
Just Now!
X