भाषेचे अधिकाधिक आकलन होण्यासाठी त्या भाषेतील पुस्तकांचं वाचन आवश्यक मानलं जातं. मग ती इंग्रजी असो, मराठी वा अन्य भाषा. मराठी माध्यमात शिकणाऱ्या मुलांना इंग्रजी उत्तम यायचे असेल तर इंग्रजी पुस्तकांचं वाचन हाच त्याला उत्तम पर्याय आहे. परंतु अनेकदा इंग्रजी शब्दांचा अर्थ न कळणे, शब्दकोशाचा वापर करण्यास कंटाळा करणे, यामुळे मराठी माध्यमातील अनेक मुलांना इंग्रजी वाचन टाळण्याकडे कल जातो. या मुलांनी नेमकी हीच अडचण ओळखून यो.ग.व्या.स. प्रकाशनाच्या विनायक पोंक्षे यांना एक कल्पना सुचली आणि त्यांनी ती सत्यात उतरवली. या कल्पनेनुसार इंग्रजी गोष्टींबरोबर सोबत कठीण शब्दांचे अर्थ (ज्या शब्दांमुळे वाक्याचा अर्थ कळत नाही वा ज्या शब्दांमुळे वाचनाचा कंटाळा केला जातो.) त्या शब्दाशेजारीच कंसात दिले आहेत. उदा. ळँी ेल्ल‘ी८ स्र्ीस्र्’ी ं१ी १४ीि (उद्धट). यामुळे कठीण शब्दांचा अर्थ व गोष्टीचा भावार्थ मुलांना समजणे सोपे जाते व इंग्रजी वाचनात खंड पडत नाही.
‘ऑल टाइम क्लासिक’ या मालिके अंतर्गत लहान मुलांच्या प्रसिद्ध कथा साध्या-सोप्या शब्दांमध्ये, कठीण शब्दांच्या अर्थासकट दिले आहेत. या मालिके अंतर्गत प्रसिद्ध होणाऱ्या पुस्तकांपैकी ‘जंगल बुक’ व ‘२०००० लीग्ज् अंडर द सी’ ही दोन पुस्तके प्रकाशित झाली आहेत.
‘जंगल बुक’मध्ये मोगली आणि त्याचे मित्र, त्यांच्या करामती, साहस वाचायला मिळते. तर ‘जंगल बुक’ व ‘२०००० लीग्ज् अंडर द सी’ या पुस्तकात प्रोफेसर अॅरोनॅक्स यांचे साहस व समुद्री जीवांविषयीची रोचक माहिती मिळते. या पुस्तकातील चित्रे तुम्हाला समुद्राची अनोखी सफर घडवितात.
ही पुस्तके वाचल्यानंतर इंग्रजी शब्दांचा अर्थ आपल्याला सहज कळतो आणि इंग्रजी वाचन आपण सलग करू शकतो, याचा आनंद नक्कीच मिळतो.
राधिका अय्यंगार यांनी ओघवत्या इंग्रजीमध्ये गोष्टींचे पुनर्लेखन केले आहे. भूषण राव यांनी पुस्तकाची उत्तमप्रकारे मांडणी केली आहे. चित्रं हा या पुस्तकांचा महत्त्वाचा भाग आहे. प्रमोद दीक्षित यांनी गोष्टीला साजेशी आणि लहान मुलांना भावतील अशी रेखाचित्रे काढली आहेत. या पुस्तकांसाठी आर्ट पेपर वापरण्यात आला आहे, त्यामुळे यातील चित्रांची व रेखाचित्रांची वेगळीच गंमत अनुभवायला मिळते. दर्जाच्या तुलनेत इंग्रजी पुस्तकाच्या तोडीची अशी ही पुस्तके आहेत.
पुस्तकाच्या शेवटी वाचनात आलेले कठीण इंग्रजी शब्द दिले आहेत. त्या शब्दांचे मराठी अर्थ मुलांनी आठवून लिहायचे आहेत. यामुळे कठीण शब्द व त्याचा अर्थ मुलांच्या लक्षात राहण्यास मदत होईल व इंग्रजी शब्दभांडार वाढेल. या पुस्तकांची वितरण व्यवस्था ज्योत्स्ना प्रकाशनाकडे आहे.
‘जंगल बुक’, पृष्ठे- ८४ आणि ‘२०००० लीग्ज् अंडर द सी’, पृष्ठे- ६८, यो.ग.व्या.स प्रकाशन, मुंबई
 मूल्य- प्रत्येकी २०० रुपये.
’ं३ं.िंुँ’‘ं१@ी७स्र्१ी२२्रल्ल्िरं.ूे

Dram Hridayangam picture and biography of village culturea
नाट्यरंग: ‘मुक्काम पोस्ट आडगाव’; ग्रामसंस्कृतीचं हृदयंगम चित्र आणि चरित्र
balmaifal story for kids why we celebrate gudi padwa as a new marathi year
बालमैफल: नवचैतन्याचा पाडवा
aicte directed question papers of technical education courses in two language
पुणे: तंत्रशिक्षणाची प्रश्नपत्रिका आता भाषासुलभ! काय आहे ‘एसआयसीटीई’चा निर्णय?
english medium schools in pune advertising on social media to attract students
पुणे: इंग्रजी शाळांवर समाजमाध्यमांत जाहिराती करण्याची वेळ… नेमके झाले काय?