News Flash

डोकॅलिटी :

नववर्षांचे स्वागत करण्याच्या निमित्ताने निखिल, अखिलेश आणि अनिकेत एका रेस्टॉरंटमध्ये भेटले.

तन्वी जोशी, पार्ले टिळक विद्यालय (आयसीएसई) पूजा पवार, डी. जे. हायस्कूल, जोगेश्वरी

bal04नववर्षांचे स्वागत करण्याच्या निमित्ताने निखिल, अखिलेश आणि अनिकेत एका रेस्टॉरंटमध्ये भेटले. प्रत्येकाने आपल्या आवडीचे सूप, भाजी आणि गोडाचा पदार्थ मागवला. तिघांनी मागवलेले पदार्थ पूर्णपणे वेगळे होते. या आणि पुढे दिलेल्या माहितीच्या आधारावर कोणी काय पदार्थ मागवले, ते शोधा.
सूप : १) टोमॅटो २) स्वीट कॉर्न
३) व्हेज क्लियर
जेवणातील मुख्य डिश (भाजी) :
१) मशरूम मसाला २) बटर चिकन
३) फिश करी
गोड पदार्थ (डेझर्ट) : १) आइस्क्रीम
२) फ्रुट पंच ३) फुट्र केक

सूचक माहिती (क्लू)

१) निखिलने सूप आणि गोड पदार्थातील पहिला पर्याय निवडला नाही.
२) अखिलेशने बटर चिकन घेतले होते. परंतु गोड पदार्थाचा दुसरा पर्याय निवडला नव्हता.
३) ज्या मित्राने पहिला गोडाचा पदार्थ घेतला होता त्याने भाजीचा तिसरा पर्याय निवडला.
४) निखिल आणि अखिलेशने दुसऱ्या प्रकारचे सूप घेतले नव्हते. ल्ल

कसे सोडवाल?
१) दुसऱ्या क्लूनुसार अखिलेशने बटर चिकन घेतले होते.
२) पहिल्या आणि तिसऱ्या क्लूनुसार अनिकेतने फिश करी घेतली आणि आइस्क्रिम घेतले होते.
३) चौथ्या क्लूनुसार अनिकेतने स्वीटकॉर्न सूप घेतले. त्यामुळे पहिल्या क्लूनुसार निखिलने व्हेज क्लियर आणि अखिलेशने टोमॅटो सूप घेतले.
४) अनिकेतने आइस्क्रीम निवडलेले असल्यामुळे दुसऱ्या क्लूनुसार अखिलेशने फ्रुट केक आणि निखिलने फ्रुट पंच मागवले होते.
bal03
मनाली रानडे

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 20, 2015 12:53 am

Web Title: games for the brain
टॅग : Games
Next Stories
1 देवाचा शिक्का
2 गणिती शब्दकोशांचा खजिना
3 डोकॅलिटी
Just Now!
X