‘अखेर एकदाची त्याला फाशी झाली.’ मोठय़ाने बातमी वाचत विराज सांगत आला. त्यावर आई म्हणाली, ‘‘शिशुपालाचे शंभर अपराध भरले म्हणायचे.’’ आईच्या

या बोलण्यावर  विराज आँ करत तिच्याकडे पाहू लागला. ‘‘आई, जरा एक्सप्लेन कर ना!’’

What Supriya Sule Said?
“जो तुम्हाला धमक्या देतो आहे, त्याला..”, सुप्रिया सुळे भाषणात नेमकं काय म्हणाल्या?
Rajyog Lakshmi Narayan Rajyoga
मे महिन्यात निर्माण होईल लक्ष्मी नारायण राजयोग! या तीन राशींचा सुरु होईल सुवर्णकाळ, मिळेल बक्कळ पैसा
chaturang article dr sudhakar shelar s friendship memories and sensible female friend
माझी मैत्रीण : समंजस मैत्री
Taiwanese nurses protecting babies during earthquake video
Taiwan Earthquake Video: अन् मृत्यूही हरला! तैवान भूकंपात नर्सनी जीव धोक्यात घालून बाळांना वाचवले; थरारक ३१ सेंकद व्हायरल

आई म्हणाली, ‘‘करते बाबा, तुझं काय ते एक्सप्लेन. महाभारतात कौरव-पांडव या भावंडांमध्ये तेढ होती. विशेषकरून कौरवांना पांडवांचा द्वेष होता. त्यांनी राज्याच्या वाटणीच्या वेळी पांडवांना खांडववन नावाचे अरण्य दिले. तिथेही पांडवांनी त्यांच्या कर्तृत्वाने सुंदर नगरी वसवली. त्या नगरीला इंद्रप्रस्थ असे नाव दिले. चारी दिशांच्या राजांना जिंकून त्यांना आपले मांडलिक बनविले. त्यानंतर युधिष्ठिराने राजसूय यज्ञ केला. त्या महान सोहळ्याला अनेक देशांचे राजे, कौरव, भीष्म, अनेक ऋषिगण आले होते.  यज्ञाच्या वेळी  पांडवानी अग्रपूजेचा मान श्रीकृष्णाला दिला. चेदिराजा शिशुपालाला ते काही रुचले नाही. तो कृष्णाचा आतेभाऊ होता. त्याचा श्रीकृष्णावर राग होता. यापूर्वीही त्याने श्रीकृष्णाची निर्भर्त्सना केली होती. पण श्रीकृष्णाने त्याच्या आईला वचन दिले होते, ‘शिशुपालाचे शंभर गुन्हे मी माफ करीन. त्यानंतर मात्र त्याला शिक्षा करीन.’

राजसूय यज्ञाच्या वेळी युधिष्ठिराने श्रीकृष्णाला अग्रपूजेचा मान दिला. भीष्मांनी त्याला दुजोरा दिला तेव्हा शिशुपाल खूप संतापला. त्याने सर्वाची खूप निर्भर्त्सना केली. श्रीकृष्णाची योग्यता समजून न घेता तो अनेक प्रकारे त्याला बोलला. ‘‘या गवळ्याच्या पोराला तुम्ही मान देता, त्याच्यापेक्षा अनेक श्रेष्ठ असे क्षत्रिय इथे उपस्थित असताना या कृष्णाला मान देताना तुमची सर्वाची बुद्धी भ्रष्ट झाली का?’’ त्याचे असे बोलणे ऐकून अनेक लोक  सभामंडपातून बाहेर पडले. भीष्मांनी त्याला सडेतोड उत्तर दिले, तरीही शिशुपाल काही बोलायचे थांबेना. त्याने सातत्याने श्रीकृष्णाला नावं ठेवणे चालूच ठेवले. एवढेच नाही तर उपस्थित लोकांनाही तो अद्वातद्वा बोलू लागला. नंतर मात्र भगवान श्रीकृष्णांनी उग्र रूप धारण केले. ‘‘तुझे शंभर अपराध भरले. आता तुला शासन करण्यावाचून पर्याय नाही,’’ असे सांगून श्रीकृष्णाने त्याला शिक्षा केली.

अशा प्रकारे गुन्हा करणारी व्यक्ती कितीही शिताफीने शिक्षेपासून दूर राहिली तरी एक ना एक दिवस कोणत्या तरी प्रकारे त्याला शिक्षा होतेच; तेव्हा ‘शिशुपालाचे शंभर अपराध भरले’ असे म्हणतात.

‘‘गॉट इट?’’ आईने हसून विराजला विचारले. तिच्या या वाक्यावर खुश होत  बाबा विराजला म्हणाले, ‘‘तुमच्यासारखं ऊठसूट इंग्लिशची फोडणी देत नसली तरी शिकलेली आहे माझी बायको.’’

– मेघना फडके
memphadke@gmail.com