साहित्य : चॉकलेटचा चौकोनी डबा (पारदर्शक), रिळांचे ४ रिकामी बंडल्स,  ३डी आऊटलायनर्स, रंगीत पूड, गम, ग्लिटर्स इ.
कृती : चॉकलेटच्या चौकोनी डब्यावर उलटय़ा बाजूस ३ डी आऊटलायनर्सने साधेसे चित्र काढा. जमत नसल्यास ग्लास डिझाइनप्रमाणे कागदी चित्र खाली ठेवून वरून गिरवूनसुद्धा काढता येईल. चित्राला पूर्णपणे वाळू द्या. वाटल्यास इतर रंगांच्या मदतीने त्याला अंधिक आकर्षक करा. पूर्ण वाळल्यावर चित्राच्या आंत रंगीत पावडरचा थर गम लावून पसरवा (रांगोळीप्रमाणे भरा.)  मध्ये व चार कडांना सुशोभित करा व व्यवस्थित वाळू द्या. रिळांचे चार रिकामी बंडल्स चारही कोपऱ्यांमध्ये चिकटवा. झाला तुमचा सुबक चौरंग तयार!