साहित्य : वर्तमानपत्राची रद्दी, फेविकॉल, सुतळी, रबर बँड. हा मोढा बनविण्याआधी  दोन-तीन महिन्यांची रद्दी साठवून ठेवा. कारण यासाठी आपल्याला सोळा पानी ऐंशी वर्तमानपत्रं लागणार आहेत.

कृती : प्रथम सोळा पानी पेपरची घट्ट गुंडाळी करून घ्या व त्याला रबर बँडनी बांधून घ्या. अशा प्रकारे सर्व ऐंशी पेपरच्या गुंडाळ्या करून घ्या. मध्यभागी एक आणि त्याच्या भोवती एक-एक अशा गुंडाळ्या फेविकॉलने चिकटवत जा. सर्व चिकटवून झाल्यावर सुतळीच्या साह्यने हा मोढा बांधून घ्या. बसण्यासाठी मोढा तयार होईल. हा मोढा व्यवस्थित वापरल्यास खूप दिवस टिकतो.

गौरी केतकर  ketkargauri@gmail.com