‘ब्लॉग बेंचर्स’ बिर्ला महाविद्यालयाच्या प्रणव आगाशे याचा गौरव

‘लोकसत्ता’च्या ‘ब्लॉग बेंचर्स’चा मान या आठवडय़ात बिर्ला महाविद्यालयाच्या प्रणव आगाशेला मिळाला. वाणिज्य विभागाचा विद्यार्थी असणाऱ्या प्रणवने ‘ब्लॉग बेंचर्स’मध्ये यश संपादन केल्याने महाविद्यालयातील प्राचार्यासह प्राध्यापकांनी त्याचे कौतुक केले. वर्षभरात ‘ब्लॉग बेंचर्स’मध्ये ५२ वेळा लिखाण करण्याची संधी ‘लोकसत्ता’ने उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे या व्यासपीठाचा उपयोग बक्षिसे मिळविण्यापेक्षा आपल्यास काय लिहिता येते आणि कसे व्यक्त होता येते यासाठी करण्याचा मानसही प्रणवने व्यक्त केला. वर्षभरात या ब्लॉगच्या माध्यमातून ५२ प्रकारचे लिखाण करणार आहोत, असेही त्याने सांगितले.

‘समलिंगी संबंध’ या विषयावरील ‘ब्लॉग बेंचर्स’मध्ये प्रणवने आपली मते व्यक्त केली होती. तो बिर्ला महाविद्यालयात द्वितीय वर्ष वाणिज्य शाखेत (लेखा आणि वित्त) शिक्षण घेत आहे. ‘ब्लॉग बेंचर्स’मध्ये यश मिळविल्याबद्दल प्रणवचा  प्राचार्य डॉ. नरेशचंद्र यांच्या हस्ते प्रमाणपत्र आणि धनादेश देऊन गौरव करण्यात आला. यावेळी प्रा. नितीन बर्वे, मराठी विभागप्रमुख प्रा. अरुण देवरे उपस्थित होते.

‘लोकसत्ता’ हे अभिव्यक्तीचे सशक्त व्यासपीठ-पीयूष देशपांडे

विद्यार्थ्यांना लिहिते करण्यासाठी ‘लोकसत्ता’ने सुरू केलेल्या ब्लॉग बेंचर्स या स्पध्रेच्या माध्यमातून आपल्याला निर्भिडपणे भूमिका मांडण्याची संधी मिळाली, हा अनुभव आयुष्यभर आठवणीत राहणारा आहे. ‘लोकसत्ता’ हे अभिव्यक्तीचे सशक्त व्यासपीठ आहे, असे मत ब्लॉग बेंचर्स स्पध्रेत महाराष्ट्रातून प्रथम आलेल्या पीयूष देशपांडे याने येथे व्यक्त केले. येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या पीयूष देशपांडेचा नुकताच महाविद्यालयाच्या सभागृहात सत्कार करण्यात आला.

वाचन, लिखाणाची आपणास आवड आहे. प्रा. देवरे, प्रा. बर्वे, प्रा. नारायणन यांच्याकडून लिखाण, व्यक्त होण्यास मार्गदर्शन व प्रोत्साहन दिले जाते. याच प्रोत्साहनातून ‘लोकसत्ता’च्या ब्लॉग बेंचर्समध्ये सहभागी झालो. त्यातून आत्मविश्वास  बळावला आहे. यापुढेही या उपक्रमात सहभागी होणार आहे.

प्रणव आगाशे

प्रणव आगाशे या विद्यार्थ्यांने ‘ब्लॉग बेंचर्स’मध्ये यश मिळविल्याबद्दल त्याचा प्राचार्य डॉ. नरेशचंद्र यांच्या हस्ते प्रमाणपत्र व धनादेश देऊन गौरव करण्यात आला. सोबत प्रा. अरुण देवरे, प्रा. नितीन बर्वे व इतर प्राध्यापक उपस्थित होते.     छाया : दीपक जोशी  
प्रणव आगाशे या विद्यार्थ्यांने ‘ब्लॉग बेंचर्स’मध्ये यश मिळविल्याबद्दल त्याचा प्राचार्य डॉ. नरेशचंद्र यांच्या हस्ते प्रमाणपत्र व धनादेश देऊन गौरव करण्यात आला. सोबत प्रा. अरुण देवरे, प्रा. नितीन बर्वे व इतर प्राध्यापक उपस्थित होते.     छाया : दीपक जोशी