– स्वप्निल घंगाळे

आयुष्याची दैनंदिनी बनवून १३ जून किंवा १४ जून या तारखांची पानं उघडून पाहिल्यास सर्वाधिक कनटेन्ट असणारी पानं असतील ही. यामागील कारण या तारखा म्हणेज ‘शाळा’ सुरु होण्याच्या तारखा. अर्थात आता अनेक प्रकारचे बोर्ड (म्हणजे एसएससी, सीबीएससी वगैरे वगैरे) आल्याने शाळा सुरु होण्याचे वेळापत्रक फिक्स राहिलेले नाही. तरी ९० च्या दशकामधील मुलांना आजही १३ जून म्हटल्यावर शाळा सुरु होण्याचा दिवस आठवतो. आयुष्य रुपी वहीमधील हे सर्वात महत्वाचे पान कधीही न विसरता येणारे अन् पुढची वही कशी असेल याची झलक दाखवणारे पान… आयुष्यातील याच दैनंदिनीमधील या महत्वाच्या पानाबद्दल आजच्या खास दिवशी थोडसं…
शाळेचं पान…

pune mba cet marathi news, mca cet marathi news
आणखी दोन अभ्यासक्रमांचे प्रवेश सीईटीद्वारे, अर्ज नोंदणीसाठी १८ एप्रिलपर्यंत मुदत
The Capital Markets Regulatory Authority imposed a fine of Rs 12 crore on Rabindra Bharti Educational Institute in an interim order
वित्तरंजन: हजार टक्क्यांच्या परताव्याचे आमिष
curiosity about indians performance in paris olympic
अन्वयार्थ : असले ‘अव्वल स्थान’ काय कामाचे?
High rate of gold prices in the domestic market
सोन्याचा सार्वकालिक उच्चांक; मुंबईत तोळ्यामागे घाऊक भाव ७०,४७० रुपयांवर

कॉर्पोरेटमध्ये येऊन तुम्हाला कितीही वर्षे झालेली असो किंवा अगदी शाळा सोडून एखादे दशक उलटले असले तरी १३ जून म्हटल्यावर हार्ट डोळ्यात असणारा स्मायली येतो ना. मला ना शाळेचा पहिला दिवस म्हटल्यावर माझा भाऊ आठवतो. बदामी शर्ट, चॉकलेटी चड्डी, उजव्या बाजूला त्रिकोणी रुमाल आणि डाव्या बाजूला बिल्ला पीनअप करून लावलेला हातात बास्केट असा त्याचा गोंडस फोटो होता. आपल्यापैकी अनेकांचे असे शाळेच्या ड्रेसमधले पहिल्या दिवसाचे गोंडस फोटो असणार.

खरं तर १३ जून हा दिवस म्हणजे एखाद्या सोहळ्यासारखा असायचा. या सोहळ्याची तयारी काही दिवस किंवा जवळजवळ आठवडाभर आधी सुरु व्हायची. म्हणजे शाळा सुरु होणार असायच्या म्हणून गावावरून लवकर येणे. मग ती शाळेची शॉपींग. शाळेची शॉपिंग म्हटल्यावर मुलांना आनंदाच्या उकळ्या फुटायच्या. नवीन वह्या-पुस्तकांचा येणारा तो टिपीकल सुगंध, नवीन दप्तरात पहिल्याच दिवशी मस्त कव्हर घालून नेलेल्या वह्या, एका कप्प्यात ठेवलेली ती मोजकी पुस्तकं आजही आठवतात. अगदी प्राथमिकमध्ये असतानाचे ते आडवे दप्तर आणि त्यातील तो स्पंजचा डब्बा. मनाचे श्र्लोक, हनुमान चालीसा यासारखी डायरीच्या आकाराची लहान पुस्तके, दोन्ही बाजूला उघडणारी कंपास, प्रत्येक वर्षी न चूकता घेतलेली कॅमलीनची कंपास असं सगळं आजही स्पष्ट आठवतं. मोठे झालो तसे आडव्या दप्तारावरून उभ्या दप्तरावर येणे हेही त्याकाळी मोठे ट्रान्सफॉर्मेशन होते. पावसाळ्यातच शाळा सुरु होणार असल्याने शाळेच्या शॉपिंगमध्ये रेनकोट किंवा छोट्या छत्रीची शॉपिंग ठरलेली असायची. बरं कितीही भारी छत्री किंवा रेनकोट घेतला तरी भिजूनच घरी जायची वेगळीच मज्जा असायची. शाळेतल्या मैदानात झालेला चिखल अन् त्यात कपडे खराब करून घरी गेल्याने खाल्लेला मार अगदी काल परावाची गोष्ट वाटते नाही का?

प्राथमिकमध्ये असे पर्यंत बाई (वर्गशिक्षिका) नाही असल्यास वर्ग वाटला जायचा. आता वर्ग वाटणे पद्धत नसावी कदाचित (कोणाला काही ठाऊक असल्यास कमेन्टमध्ये कळवा) हे वर्ग वाटणे म्हणजे करण-अर्जून बिछडण्यासारखे दु:ख होते. हेच दु:ख टाळण्यासाठी मित्र आणि आपण एकाच वर्गात असावे म्हणून रांगेत एकामागे एक उभे राहणे. वर्ग वाटण्याची रांग उंचीनुसार केली असल्यास टाचा वर करून अथवा ठेंगणे होऊन केलेली सेटिंग म्हणजे मित्रबरोबर रहायची ती धडपड आठवून आज हसू येते. बरं वर्ग वाटल्यावर बाईंच्या टेबलजवळ समोरच्या मोकळ्या जागेत एका दिवसासाठी मांडी घालून मांडलेला संसार. मांडी घालून बसायला खूप कंटाळा यायचा तेव्हा पण त्यातही मज्जा होती कारण आमच्या अभ्यासक्रम वेगळा सुरु असायचा आणि ज्या वर्गात आम्ही गेलोय त्या वर्गाचा वेगळा म्हणून लिहायचं तर लिहायचं नाहीतर अँक्टींग करायची लिहायची.

आज सरार्सपणे लहान मुलांपासून सर्वचजण पेन वापरतात. पण ९०’स किड्स शाळेत होते त्यावेळी पेन्सिल सोडून पेनने लिहायला मिळणं हे त्या पिढीसाठी खूप मोठ रिव्हेल्यूशन किंवा युग बदल वगैरे असं काहीतरी होतं. तसं आणखी एक रिव्हेल्यूशन म्हणजे हाफ चड्डीची फूल पॅण्ट होणं. शाळा सुरु झाल्यावर वर्गशिक्षिका कोण याबद्दल सुरु असलेल्या चर्चा, प्रिन्सिपलला ‘मोठ्या बाई’ नावाने आम्ही हाक मारली जायची तेव्हा मराठी शाळांमध्ये. या ‘मोठ्या बाई’ विशेषणाचा आता विचार केला तरी ते एकदम विचित्र वाटतं ऐकायला आणि बोलायलाही, पण तो काळचं तसा होता जेव्हा हे ऑकवर्डनेस वगैरे असं काही वाटायचं नाही. सगळं कसं नॉर्मल होतं तेव्हा ग्लोबलायझेशनचं वारं नव्हतं लागलं शाळांना एवढी स्पर्धा नव्हती. माझ्या पिढीत (माझा जन्म १९९१ चा) मराठी शाळांमध्ये शिकणाऱ्यांना इंग्रजीही पाचवीपासून सुरु झालं होतं. मी तेव्हापासूनच माठ म्हणजे A…B…C…D… पाठ करून यायाला सांगितलेलं तेव्हा मी चक्क ते ‘हम साथ साथ हैं’ मधलं A..B…C…D…E…F…G…H….I… गाणं पाठ करून जायचा प्रयत्न केला होता. ही अक्कल हुशारी मला चांगलीच महागात पडली अन् माझी ABCD दहा की पंधरा लेटर्सनंतर संपली कारण मी एक संपूर्ण कडवं विसरलो. मग काय दोन पट्ट्यांचा प्रसाद घेतला हातावर आणि बसलो खाली. त्याशिवाय पुस्तकामधून धडे वाचताना आपला नंबर कोणत्या परिच्छेदाला येईल याचा अंदाज बांधत बसण्यात वेगळीच गंमत वाटायची. ‘ऑफ पिरेड’ म्हणजे ‘पीटी’चा तास असा आमचा समज. त्यातही ‘पीटी’चे सर गैरहजर असले आणि आवडीचे शिक्षक आले की ‘पीटी’ नाहीतर पोर्शन पळवा एक्सप्रेस सुरु व्हायची आलेल्या शिक्षकांची. तेव्हा शाळांमध्ये कंप्युटर तास पहिल्यांदाच सुरु झाले होते. शाळांमध्ये या कंप्युटरच्या तासासाठी लॅब बाहेर रांग करून उभं राहणं मग दिलेल्या कंप्युटरवर बसून काहीतरी तेव्हाचं बेसिक शिकवलं जायच. तेव्हा कंप्युटरबद्दल आकर्षण होते. आत तर अनेकदा आपल्याला आपला लॅपटॉपही कधीकधी उशी खाली सापडतो. निवृत्ती महाराज देशमुख म्हणतात तसं ‘वस्तुची किंम्मत नाही कमी झाली वस्तुबद्दल असणारा जिव्हाळा कमी झालाय.’ रोजच्या रोटेटिंग बेंच सिस्टीममुळे रोज बदलणारी वर्गातली जागा हे पण भारी असायचं एकदम.

मॉनेटर हे प्रकरण अगदी वेगळंच होतं त्याकाळी. मुलांचा वेगळा मॉनेटर, मुलींचा वेगळा मॉनेटर असायचा अनेकदा. तासाला बाई न आल्यास ते समोर उभे राहून बोलणाऱ्यांची नावे लिहायचे फळ्यावर. त्यात एकदा नाव लिहील्यानंतरही परत बोलताना दिसल्यावर मारलेली X ची फुल्ली. अशी ती मॉनेटरगिरीची वेगळीच सिस्टीम होती. ‘ऑफ पिरेड’ला जास्त कल्ला केला की बाजूच्या वर्गातल्या बाई येऊन ओरडून जायच्या. त्यांनी डोकं दरवाजाबाहेर नेताच कल्ला परत सुरुच. तासाची घंटा (नंतर त्याची बेल झाली) पडल्यानंतर लगेच शिक्षक न आल्यास मिळणारा एक्स्ट्रा ब्रेक तर बोनस असायचा. सात वाजून पाच मिनिटांनी शाळा सुरु व्हायची. नैतिक शिक्षणाच्या तासाला आलेल्या शिक्षकांनी त्यांच्या विषय शिकवू नये म्हणून एकामागोमाग एक म्हटलेल्या किती तरी अर्थपूर्ण आणि अर्थहिन प्रार्थना आठवून हसू येते. वो बीस मिनिटी सर्व्हाइव्ह करणे विरुद्ध प्रार्थना संपवून विषयाला हात घालणे अशी ती लढाई असायची. ही लढाई अनेकदा विद्यार्थीच जिंकायचे.

घरी सोडणारे रिक्षावाले काकाही शालेय जीवनातील खूप जास्त जिव्हाळ्याचा विषय. रिक्षाच्या काचेवर असणाऱ्या नावावरून रिक्षा ओळखली जायची पार्वती, निळी, शंकर या नावाच्या रिक्षा मला आजही आठवतात. त्या काकांनी अचानक दिलेली ५० पैसे किंवा एक रुपयावाल्या पॅप्सीच्या पार्टीमुळे दिवस मेमोरेबल व्हायचा. तर ४ रुपयांच्या बजेटमध्ये वडापाव परवडत नसे म्हणजे त्याने पोट भरत नसे म्हणून त्याच पैश्यात खाल्लेले दोन चटणी पाव पोटाची खळगी भरत. लांबलचक लाइनमध्ये १५-२० जणांनी बसून खेळलेला ‘अंतरराष्ट्रीय दर्जा’चा खो-खो, शिक्षकांना ठेवलेली टोपण नावे असं बरंच काही या शालेय आठवणींच्या अभ्यासक्रमात होतं.

नैतिक शिक्षणाचा व्यावसाय, गृहपाठाच्या वह्या, हातावर पडलेली पट्टी, राष्ट्रगीताआधी वर्गात पोहण्याची सक्ती तसे न केल्यास खाली एन्ट्री जवळ दैनंदिनीवर मिळालेला लेट मार्कचा शेरा या गोष्टीही आज केवळ आठवणींमध्ये राहिल्या आहेत. आजही माझ्याकडे शाळेची दैनंदिनी आहे जपून ठेवलेली. आठवड्यातील ‘पीटी’च्या तासांमधील एक तास ‘मास पीटी’चा असायचा तेव्हा कधीतरी एकत्र कावयती व्हायच्या त्यावेळी ढोलच्या तालावर केलेल्या कवायती म्हणजे फुल ऑन धम्माल असायच्या. ह्या आत्ता आठवलेल्या आठवणी लिहील्यात अशा विसरून गेलेल्याही बऱ्याच आहेत.

शाळेतले असं काही जिवा भावाचे कोणी मित्र उरलेले नाही. रायदर नव्हतेच तेव्हा कोणी खास जवळचे मित्र. आज जे शाळेतले ओळखीचे आहेत तेही कॉलेज संपल्यानंतर पुन्हा भेटल्याने जवळ आलेला मित्रपरिवार आहे. त्यामुळे आज खरंच परत एकदा शाळेत जाऊन त्या बाकावर कोप-यातल्या जागेसाठी भांडावसं वाटतयं इतकंच. मला कधीतरी वाटतं शाळेत जिवाभावाचे मित्र न कमावणारा मीच एकटा आहे. कारण आजही शाळेतल्या पोरांचे व्हॉट्सअपवर ग्रुप आहेत पण मी कोणाच्याच कॉनटॅक्टमध्ये नाहीय. एका अर्थाने हे बरंच आहे कारण आताचे आहे त्याच मित्रांना वेळ देता येत नाहीय. तरी शाळेतली मोजकी पाच-सहा टाळकी कॉनटॅक्टमध्ये आहेत हे खूप जास्त महत्वाचं वाटतं मला. शाळेतला माझ्या आईचा एक ग्रुप होता मैत्रिणींचा त्यात पाचजणींचा. माझा शाळेतील मित्रपरिवार नसला तरी या पाचजणी आवर्जून भेटतात आणि आजही कॉनटॅक्टमध्ये आहेत आता आमच्यामुळे त्यांची मैत्री झाली की त्यांच्यामुळे आमची हा डिबेटचा विषय होऊ शकतो म्हणून मी इथेच थांबतो.

तुमच्या शाळेच्या आठवणी नक्की शेअर करा.

– swapnil.ghangale@loksatta.com