सगळेच पराभव विसरण्यासारखे नसतात. काही पराभव नावाला पराभव असले तरी तुम्हाला अजरामर करुन जातात. अशाच एका पराभवाबद्दल थोडं‘फार’. पानिपतच्या २५८ व्या स्मृतीदिनाच्या निमित्ताने…

पेशवा म्हटल्यावर टिपीकल फेटा वगैरे घातलेले, टिळा लावलेले आणि तिरका असा सदरा टाइप पोषाख असलेली माणसे डोळ्यासमोर येतात. सिनेमा आणि मालिकांनी पेशवा ज्याप्रकारे साकारला आहे त्याचा यात सर्वात मोठा वाटा आहे. पेशव्यांना संपूर्ण देशाने त्यांच्या कर्तबगारीऐवजी दुय्यम गोष्टींसाठी लक्षात ठेवलं हे वाईटच(बाजीराव मस्तानी वगैरे). सांगण्याचा उद्देश काय तर एका मोठ्या समाजासमोर पेशव्यांना व्हिलन ठरवले जात आहे. मुळात त्या काळातील विचारसणीला व्हिलन ठरवायला हवे. पेशव्यांचा पराक्रम पार अफगाणपर्यंत ज्ञात आहे. पेशवे सर्वोत्तम लढवय्ये होते या विचाराचा आहे मी. हो म्हणजे प्रत्येक समाज, व्यक्ती किंवा राजवट थोडी अशीतशी असते कारण कोणीच परफेक्ट नसतो. तसंच पेशव्याचंही होतं. ते थोडे ऐशोआरामी, मनमौजी आणि जातीव्यवस्था मानणारे होते, असे असले तरीही ते तितकेच शूरही होते. ‘भागो पेशवा आया है’, या वाक्यात जी काही भिती आहे ना त्याची दाहकता त्या युध्दभूमीवर नक्कीच जास्त जाणवत असेल. पेशव्यांचं कसं होतं माहीतय (वाचनात आलेल्या काही पुस्तकांचा आणि लेखांचा संदर्भ घेऊन सांगतोय) एखाद्याची वाट लावायची म्हटल्यावर लावायची, मग त्यात आपली वाट लागली तरी हरकत नाही पण समोरच्याची लागलीच पाहिजे. आपल्या कॉलेजच्या नाक्यावरील भाषेत सांगायचे झाले तर ‘नडला की फोडला.’ मुळात पेशव्यांची विचारसरणीच विस्तारवादाची होती त्यामुळे ते भूभागासाठी आणि राज्य वाढवण्यासाठीच लढले. मग छत्रपतींच्या गादीच्या संरक्षणासाठी वगैरे हे शूगर कोटिंग केलं जायचं या विस्तारवादाला. सर्वच लढाया ते विस्तारवादासाठी आणि मिळवलेलं टिकवून ठेवण्यासाठी लढले पण एक लढाई ते हिंदुस्तानासाठी लढले, ती म्हणजे पानिपतची.

INDIA parties project unity at rally in Ranchi
आघाडीत राहिल्यामुळेच सोरेन तुरुंगात; ‘इंडिया’च्या सभेत खरगे यांचा आरोप
Sambhaji Raje Chhatrapati, criticises bjp, 400 seats change constitution, Sambhaji Raje Chhatrapati criticises bjp, shahu maharaj, kolhapur lok sabha seat
संविधान मोडून काढण्यासाठी ‘चार सो पार’ची धडपड – संभाजीराजे छत्रपती
Why did Lawrence Bishnoi gang fire outside Salman Khans house What is the extent of this gang
लॉरेन्स बिष्णोई टोळीने सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार का केला? या टोळीची व्याप्ती किती? पुन्हा हल्ला करण्याची धमकी किती गंभीर?
pune crime news, son beats mother pune marathi news,
मुलाकडून आईला बेदम मारहाण… घर नावावर करून देत नसल्याने डोक्यात मारली खूर्ची

ते पानिपतवर हिंदुस्तानासाठी लढले. या लढाईत पहिल्यांदा हिंदुस्तानच्या सीमेवर कोणीतरी उभे राहिले तेही परकियांना रोखण्यासाठी. आतमध्ये कितीही संस्थाने असली तरीही हिंदुस्तानकडे एक अखंड भूभाग म्हणून या लढाईत पहिल्यांदा पाहिले गेले. बरं तिथे पेशवे फक्त लढले नाहीत तर ‘मोडेल पण वाकणार नाही’ म्हणत उभ्या जागी लढता लढता मेले. इतके झाले तरीही ते इंचभरही मागे हटले नाहीत. या लढाईत अफगाणचे सैन्य जिंकून माघारी गेले ते परत कधीही न येण्यासाठीच. या लढाईत पेशवे हरले का? तर त्यांनी आपला सगळा गणगोत लढाईला नेला होता आणि त्यातील अनेकजण फक्त देवदर्शन, तिर्थदर्शनाला गेले होते. लढाईत त्यांच्या संरक्षणासाठी बरीच ताकद गेली आणि आपल्या पायात आपणच बेडी घातल्यासारखा डोईजड झाला हा गोतावळा.

पानिपताची लढाई ही इतरांसाठी इतिहासाच्या पानांतील फक्त एक लढाई आहे जी अमूक ते तमूक पानांमध्ये संपते आणि त्यात काही चूकीचे नाही, पण मराठी माणसासाठी ती एक भळभळती जखम आहे. मात्र त्याबद्दल वाईट वाटण्यासारखे काहीच नाही. समोरुन शत्रू येत असताना घाबरून पळून येण्याऐवजी पेशवे लढत राहिले आणि लढता लढता हरले ते १४ जानेवारी १७६१ या दिवशी…

या लढाईकडे नेहमी पेशव्यांच्या इतिहासाला लागलेला डाग म्हणून का पाहिले जाते ठाऊक नाही. कदाचित इतिहासाकडे आपण केवळ विजय या एकाच चष्म्यातून पाहत आलो आहोत म्हणून असेल पण एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की, प्रत्येक राजसत्ता जशी कधीतरी सुरु होते तशी ती कधीतरी संपते. असंच काहीसं झालं पेशव्यांबद्दलही. फरक इतकाच की काही राजसत्ता काही दशकांच्या कालावधीमध्ये संपते तर काहींना इतका मोठा फटका बसतो की एका दणक्यात त्या संपल्यासारख्या होतात. पानिपत पराभव हा पेशव्यासाठी तसाच मोठा दणका होता असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. पण यामुळे पेशवाई पूर्णपणे कोलमडली नाही तर ती पुढे ५८ वर्षे टिकली. पानिपताच्या लढाईबद्दल मराठी माणसाला लाज वाटत असली तर ते आपले दुर्दैव. तसचं नेहमीप्रमाणे आपल्याला आपल्या गोष्टीची किंमत नसली तरी तरी पाश्चिमात्यांना या पराभवाचीही किंमत आहे. या लढाईनंतर पराभूत झालेल्या पेशव्यांची त्यांनी स्तुती केली आहे. हो पराभूत झालेल्याची स्तुती जरा वेगळं वाटतं नाही ऐकायला, पण पाश्चिमात्य याबाबतीत उदारमतवादी होते. चांगलं ते चांगलं असं स्पोर्टींगली सांगायचे तोंडावर. याच लढाईबद्दलचा असाच एक संदर्भ देऊन थांबतो.

‘पानिपतवर मराठे लढले ते ‘सर्व हिंदी लोकांसाठी हिंदुस्थान’ या ध्येयाने. जरी मराठ्यांचा या लढाईत पराभव झाला, तरी अफगाण विजयानंतर जे मायदेशी परत गेले ते हिंदी राजकारणात ढवळाढवळ करण्यासाठी पुन्हा न येणअयासाठीच.’
इव्हॅन्स बेल, पाश्चिमात्य इतिहासकार (त्र. शं. शेजवलकर यांच्या पानिपत १७१६ या पुस्तकातून)

एक डायलॉग आठवला नाना पाटेकरांचा ‘मराठा मारता है या मरता है…’ तोच थोडा बदलून पेशवे स्वत:ला असं इन्ट्रोड्यूस करुन देवूच शकतात… ‘पेशवा मारता है या मरता है…’

पानीपतची लढाई झाली तेथे उभारण्यात आलेले स्मुतीस्थळ

राष्ट्ररक्षणासाठी महाराष्ट्राने एक पिढी पानिपताच्या वेदीवर समर्पित केली.  पुन्हा एकदा प्राणाचे बलिदान दिलेल्या असंख्य पेशवा सैनिकांना आणि वीरांना शतश: प्रणाम!!

– स्वप्निल घंगाळे
swapnil.ghangale@loksatta.com