फिनटेक स्टार्टअपसाठी प्रसिद्ध असलेले पेटीएम पुन्हा एकदा चुकीच्या कारणास्तव चर्चेत आले आहे. पेटीएमने पुन्हा एकदा आपल्या कर्मचाऱ्यांना कंपनीतून काढून टाकण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पेटीएमने या कपातीमध्ये एकूण कर्मचाऱ्यांपैकी सुमारे १० टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्यात आले आहे.

…म्हणून अनेक कर्मचाऱ्यांना मिळाला नारळ

ET च्या अहवालानुसार, Paytm ची मूळ कंपनी One97 Communications ने यावेळी १००० हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढले आहे. सूत्रांच्या हवाला देत ईटीच्या अहवालात नोकर कपातीचा दावा करण्यात आला आहे. गेल्या काही महिन्यांपासून पेटीएममध्ये टाळेबंदी झाली आहे. त्यामुळेच पेटीएमच्या विविध युनिट्सचे कर्मचारी या नोकर कपातीला बळी पडले आहेत. पेटीएमने आपला खर्च कमी करण्यासाठी आणि आपल्या विविध व्यवसायांची पुनर्रचना करण्यासाठी ही टाळेबंदी केली आहे.

India Wholesale Inflation Reaches 3 Month High
घाऊक महागाई दर मार्चमध्ये किंचित वाढून तिमाही उच्चांकावर
Elon Musk
टेस्लातील १० टक्के कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांवर कुऱ्हाड, एलॉन मस्क यांनी मेलद्वारे दिला इशारा; म्हणाले, “खर्च कमी करण्यासाठी…”
pashmina march will be held there on April 7 to highlight the issues in Ladakh
लडाखवासीयांचा आक्रोश सरकारच्या कानावर पडतच नाही; तुम्हाला तरी ऐकू येतोय?
Loksatta anvyarth wheat rates Pradhan Mantri Garib Kalyan Food Yojana to Central Government
अन्वयार्थ: गव्हाचा सरकारी तिढा!

हेही वाचाः छोट्या कंपन्यांच्या समभागांना, अतिभव्य प्रतिसाद; ५१ ‘एसएमई आयपीओं’मध्ये १०० पटींहून अधिक भरणा

भारतीय स्टार्टअपची सर्वात मोठी नोकर कपात

पेटीएमच्या या नोकर कपातीमुळे त्यांच्या एकूण कर्मचार्‍यांपैकी सुमारे १० टक्के कर्मचारी प्रभावित झाले आहेत. कोणत्याही भारतीय स्टार्टअपमधील ही आतापर्यंतची सर्वात मोठी नोकर कपात मानली जाते. २०२३ हे स्टार्टअप कंपन्यांसाठीही चांगले वर्ष ठरले नाही. यंदा भारतीय स्टार्टअप्सनी पहिल्या तीन तिमाहीत २८ हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले. याआधी २०२२ मध्ये स्टार्टअप कंपन्यांनी २० हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढले होते आणि २०२१ मध्ये ४ हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्यात आले होते.

हेही वाचाः वाणिज्य वापराच्या ‘एलपीजी’मध्ये ३९.५० रुपयांनी दरकपात; घरगुती वापराच्या सिलिंडरच्या किमती मात्र जैसे थे

RBI च्या कारवाईचा परिणाम

पेटीएमबद्दल बोलायचे झाल्यास वाईट बातम्यांची मालिका थांबण्याचं नाव घेत नसल्याचं पाहायला मिळेल. यापूर्वी रिझर्व्ह बँकेने असुरक्षित कर्जांवर नियामक निर्बंध लादले होते, ज्यामुळे पेटीएमवरही परिणाम झाला होता. आरबीआयच्या कारवाईनंतर पेटीएमने छोटे ग्राहक कर्ज बंद करण्याचा निर्णय घेतला होता. ताज्या टाळेबंदीचा सर्वाधिक फटका या दोन विभागातील कर्मचाऱ्यांना बसल्याचे बोलले जात आहे.

दबावाखाली शेअर्सची कामगिरी

शेअर बाजारातही कंपनी सतत संघर्ष करीत आहे. पेटीएमचे शेअर्स गेल्या एका महिन्यात जवळपास २८ टक्क्यांनी घसरले आहेत. गेल्या ६ महिन्यांत त्याची किंमत २३ टक्क्यांहून अधिक कमी झाली आहे. डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला पेटीएम शेअर्सला २० टक्के लोअर सर्किटला सामोरे जावे लागले. आता टाळेबंदीच्या बातम्या समोर आल्यानंतर शेअर्सवर आणखी विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे.