Money Mantra : फंड घराणे – आयसीआयसीआय प्रुडेंशिअल म्युच्युअल फंड

·फंडाचा प्रकार – मिड कॅप इक्विटी फंड
·एनएव्ही- (२३ एप्रिल २०२४ रोजी) ग्रोथ पर्याय – २४९ रुपये प्रति युनिट
·फंड मालमत्ता (२३ एप्रिल २०२४ रोजी ) – ५५१७ कोटी रुपये.
·फंड मॅनेजर – ललित कुमार.

Is strength training really easier for women with PCOS?
PCOS आहे? करा ‘हे’ व्यायाम अन् पीसीओएस नियंत्रणात ठेवा, भविष्यातील धोके टाळा
Hundreds of engineers deployed from Microsoft Attempts to restore a malfunctioning system
मायक्रोसॉफ्टकडून शेकडो अभियंते तैनात; बिघडलेली यंत्रणा पूर्ववत करण्याचे युद्धपातळीवर प्रयत्न
Windows devices, Microsoft Outage, CrowdStrike
Microsoft Outage चा फटका जगभरातील किती Windows उपकरणांना बसला? आकडा वाचून धक्का बसेल
Attempting a system restore after a Windows crash
विंडोज’मधील बिघाडानंतर यंत्रणा पूर्ववत करण्याचे प्रयत्न
Confusion over CrowdStrike company Falcon Sensor software update
प्रतीक्षा, खोळंबा, अपरिहार्यता! संगणकीय व्यवस्थेतील एका दोषाने जगभर गोंधळ
The blue screen on Windows caused a worldwide uproar
‘विंडोज’वरील निळ्या पडद्यामुळे जगभर तंत्रकल्लोळ
woman groped on flight By jindal ceo abu dhabi
Naveen Jindal: “विमानात पॉर्न व्हिडीओ दाखविला, मला जवळ…”, जिंदल स्टिलच्या सीईओंवर महिला सहप्रवाशाचे गंभीर आरोप
dior armani bag controversy
लाखोंची ‘Dior’ बॅग तयार होते चार हजारात? कामगारांचं होतंय शोषण; काय आहे बड्या ब्रॅंडमागचे सत्य?

फंडाची स्थिरता ( २३ एप्रिल २०२४ )

·पोर्टफोलिओ टर्नओव्हर ६९ %
·स्टँडर्ड डिव्हिएशन १४.९५
·बीटा रेशो ०.८९

हेही वाचा…‘हायब्रिड’च्या निमित्ताने …

पोर्टफोलिओ टर्नओव्हर म्हणजे एखाद्या फंड मॅनेजरने फंड योजनेमध्ये शेअरची सतत खरेदी विक्री खरेदी सुरू ठेवणे. जेवढे जास्त खरेदी विक्री व्यवहार घडतील तेवढाच फंडाचा खर्च वाढतो. पोर्टफोलिओ टर्नओव्हर जास्त असणे फारसे चांगले मानले जात नाही.

स्टॅण्डर्ड डिव्हिएशन

स्टॅण्डर्ड डिव्हिएशन म्हणजेच एखाद्या फंडाचा परतावा गेल्या तीन वर्षात किती स्थिर राहिला आहे त्याचे निर्दशक आहे. म्हणजेच दोन फंडाची तुलना करता ज्या फंडाचा हा आकडा कमी आहे तो फंड साधारणतः पुढील काळात दुसऱ्या फंडा पेक्षा तसेच परतावे देण्याची शक्यता आहे उदाहरण घेऊया फंड X आणि फंड Y यांनी १२ % परतावा मागच्या पाच वर्षात दिला आहे. जर स्टॅण्डर्ड डिव्हिएशन चा फंड X चा आकडा Y पेक्षा कमी असेल तर फंड X पुढील काळात तसाच सर्वसाधारण परतावा देऊ शकतो तर, फंड Y मधून मिळणारा परतावा बदलू शकतो.

बीटा

बीटा म्हणजेच गेल्या तीन वर्षात फंडाने दिलेल्या परताव्यावरून भविष्यात तो फंड किती वर किंवा खाली जाईल याचा अंदाज लावणे, जेवढी बीटा व्हॅल्यू कमी असेल तेवढाच फंड भरवशाचा.

हेही वाचा…मार्ग सुबत्तेचा : दीर्घकाळासाठी नियोजन करताना…

शार्प रेश्यो

शार्प रेश्यो म्हणजे अधिक रिटर्न्स मिळवण्यासाठी फंडाने किती जोखीम घेतली आहे, अधिकाधिक रिटर्न मिळवण्यासाठी फंड मॅनेजरने घेतलेली जोखीम अधिक असेल तर त्याचे प्रतिबिंब यामध्ये उमटते.

हा फंड महत्त्वाचा का ?

या फंडाच्या फंड मॅनेजरने कायमच पाच वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त गुंतवणूक करणे या उद्देशानेच पोर्टफोलिओ बांधणी केली आहे. कोणत्याही एका सेक्टरचा आग्रह न धरता जागतिक आणि भारतीय बाजारातील घडामोडींचा ज्या सेक्टरला फायदा होणार असेल अशा सेक्टरमध्ये फंड गुंतवणूक करताना दिसतो. गेल्या वर्षभराच्या काळात जागतिक शेअर बाजाराच्या तुलनेत भारतातील शेअर बाजारातील संधी वाढलेल्या दिसल्या मात्र मिडकॅप प्रकारच्या शेअर्समध्ये अचानकपणे आलेली रॅली पाहता फंड मॅनेजरने ‘बॉटम अप अॅप्रोच’ ठेवून मिडकॅप व्हॅल्यू प्रकारातील गुंतवणूक कायम ठेवली आहे . पोर्टफोलिओ मध्ये शेअर्सची संख्या जास्त ठेवून उपलब्ध असलेल्या सर्व संधींचा फायदा करून घेणे हे धोरण फंड मॅनेजर राबवताना दिसतो. रिस्को मिटरचा विचार करायचा झाल्यास ‘Very High’ म्हणजेच सर्वाधिक जोखीम असलेल्या श्रेणीमध्ये हा फंड मोडतो.

हेही वाचा…Money Mantra: इन्शुरन्स पॉलिसी- फ्री लूक परियड म्हणजे काय? तो कसा वापरावा?

२३ एप्रिल २०२४ रोजी फंडाचा परतावा (CAGR पद्धतीने)

·एक वर्ष – ५४. ५२ %
·दोन वर्षे – २५. ४१%
·तीन वर्षे – २५. ८५%
·पाच वर्षे – २१. १०%
·दहा वर्षे – १९. ०९%
·फंड सुरु झाल्यापासून – १७. ९३ %

फंडाने गुंतवणूक कुठे केली आहे ?

३१ मार्च २०२४ अखेरीस पोर्टफोलिओ मध्ये एकूण ८४ शेअर्सचा समावेश केला गेला आहे. जिंदाल स्टेनलेस, हिंदुस्तान पेट्रोलियम, लुपिन, फिनिक्स मिल, जिंदाल स्टील अँड पॉवर हे आघाडीचे पाच शेअर्स पोर्टफोलिओ मध्ये आहेत.

कॅपिटल गुड्स १५.८३% रियल इस्टेट ११.५२% ऑटोमोबाईल ११.४५% हेल्थकेअर १० % कन्स्ट्रक्शन ७.७४% या क्षेत्रात पोर्टफोलिओत सर्वाधिक गुंतवणूक आहे. अलीकडील काळात फंड मॅनेजरने टीव्हीएस, ईरेडा, वर्धमान, ऑइल इंडिया, एन.एच.पी.सी. टाटा टेक्नॉलॉजी यामधील गुंतवणूक विकली आहे तर निप्पॉन लाईफ इन्शुरन्स, टाटा केमिकल्स हे दोन शेअर नव्याने पोर्टफोलिओ मध्ये समाविष्ट झाले आहेत.

हेही वाचा…Money Mantra: टॅक्स हार्वेस्टिंग म्हणजे काय? त्याचा वापर कसा कराल? केव्हा टाळाल?

‘एसआयपी’तील दीर्घकालीन परतावे

तुम्ही या फंडात दरमहा एक हजार रुपयांची गुंतवणूक केली असती तर

·एक वर्षापासून एसआयपी केली असती तर ५४.८८ %

·दोन वर्षे ३७. ७६ %

·तीन वर्षे २८. ०९ %

·पाच वर्षे २७. ८९ %

·सलग दहा वर्ष १८. ४३ %

असा स्थिर परतावा मिळालेला दिसतो.

हेही वाचा…क्षेत्र अभ्यास : ‘एफएमसीजी’ : फक्त किराणा नव्हे बरेच काही…

-एका निर्णयाद्वारे फंड घराण्यांनी जाहिरात करताना दहा वर्षाच्या सरासरी रिटर्नचा (CAGR) समावेश त्यात करावा अशी मार्गदर्शक सूचना करण्यात आली. त्यानुसार निवडक फंडांचे विश्लेषण या लेखमालिकेतून केले जात आहे. फंड योजनेत गुंतवणूक करावी असा सल्ला देणे हा या लेखमालिकेचा उद्देश नाही. या फंडात गुंतवणूक करताना सर्व जोखीम विषयक माहिती वाचून आपल्या जबाबदारीवरच गुंतवणूक करावी.