scorecardresearch

मोठी बातमी! १.७६ लाख कोटींच्या गोदरेज समूहाची विभागणी होण्याची शक्यता

गोदरेज समूहाच्या सध्या ५ लिस्टेड कंपन्या आहेत. यामध्ये गोदरेज इंडस्ट्रीज, गोदरेज कन्झ्युमर प्रॉडक्ट्स, गोदरेज अॅग्रोव्हेट, गोदरेज प्रॉपर्टीज आणि लाइफसायन्स यांचा समावेश आहे.

Godrej Group
(फोटो क्रेडिट- फायनान्शिअल एक्सप्रेस)

देशातील आघाडीच्या उद्योगपतींचा विचार केल्यास अंबानी, टाटा, बिर्ला, गोदरेज यांची नावे डोळ्यांसमोर येतात. परंतु आता १२६ वर्षे जुना गोदरेज समूहाचे विभाजन होण्याची शक्यता आहे. १.७६ लाख कोटी रुपयांच्या या घरातील व्यवसायाची विभागणी करण्याची कसरत सुरू झाली आहे. काय आहे प्रकरण आणि या दिग्गज कुटुंबात कशी फूट पडेल, चला जाणून घेऊ यात.

कॉर्पोरेट्सची विभागणीही विशेष असते, कारण त्या कुटुंबाबरोबरच इतर अनेकांचे भविष्यही त्यात गुंतलेले आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मोठ्या उद्योग समूहांच्या विभाजनात अनेक गुंतागुंत असते. जर तुम्हाला मुकेश अंबानी आणि अनिल अंबानी यांच्यातील फाळणी आठवत असेल तर तुम्ही हे समजू शकता.

reliance retail
रिलायन्स रिटेलने ब्रिटिश कंपनी सुपरड्रायकडून दक्षिण आशियातील मालमत्ता घेतल्या विकत, ४०० कोटी रुपयांचा करार
Lava Blaze Pro 5G Vs Itel S23+ comparison
Lava Blaze Pro 5G Vs Itel S23+: १५ हजारांच्या आतील कोणता स्मार्टफोन कॅमेरा आणि फीचर्समध्ये आहे बेस्ट? जाणून घ्या
Power Grid Corporation of India Limited Recruitment of Diploma Trainee Posts Job Opportunity Job
नोकरीची संधी
iphone 12
फ्रान्समध्ये आयफोन १२ च्या विक्रीवर बंदी, नेमके कारण काय? जाणून घ्या….

गोदरेज समूहाची किंमत १.७६ लाख कोटी रुपये

गोदरेज समूहाचे नाव समोर आले की, सर्वात प्रथम लक्षात येते ते म्हणजे टाळे. विशेष म्हणजे १.७६ लाख कोटी रुपयांच्या गोदरेज समूहाने कुलूप विकून आपला प्रवास सुरू केला. भारतातील सर्वात जुन्या कंपन्यांपैकी एक असलेला हा समूह ५ दशकांपूर्वी सुरू झाला होता. इकॉनॉमिक टाइम्सच्या वृत्तानुसार, आता या समूहाच्या विभाजनाबाबत चर्चा सुरू आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही चर्चा प्रगत टप्प्यावर पोहोचली असून, लवकरच त्याची अधिकृत घोषणा होऊ शकते.

हेही वाचाः ३० सप्टेंबरपर्यंत ३०.५ लाख लोकांनी ऑडिट रिपोर्ट केला सादर, प्राप्तिकर विभागाची माहिती

सध्याची परिस्थिती काय?

गोदरेज समूहाच्या सध्या ५ लिस्टेड कंपन्या आहेत. यामध्ये गोदरेज इंडस्ट्रीज, गोदरेज कन्झ्युमर प्रॉडक्ट्स, गोदरेज अॅग्रोव्हेट, गोदरेज प्रॉपर्टीज आणि लाइफसायन्स यांचा समावेश आहे. गोदरेज कुटुंबात सध्या दोन गट आहेत. गोदरेज समूहाचे प्रमुख आदि गोदरेज आणि त्यांचा भाऊ नादिर गोदरेज इंडस्ट्रीज आणि असोसिएट्सवर नियंत्रण ठेवतात. तर गोदरेज आणि बॉयस मॅन्युफॅक्चरिंग कंपनीचे प्रमुख आदि गोदरेजचे चुलत भाऊ जमदेश गोदरेज आणि स्मिता कृष्णा गोदरेज आहेत. आता बातमी अशी आहे की अभियांत्रिकी, सुरक्षा, कृषी, रिअल इस्टेट आणि ग्राहक उत्पादनांच्या या विभागाचे विभाजन केले जाऊ शकते.

हेही वाचाः अदाणी समूहाची सौरऊर्जा निर्मितीबाबत मोठी योजना, २०२७ पर्यंत १० गिगावॅट क्षमता तयार करणार

कुलूप विकून केली सुरुवात

तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, आज समूहाचे मूल्यांकन १.७६ लाख कोटी रुपये आहे. त्याची सुरुवात एकदा कुलूप विकण्यापासून झाली होती. आता या समूहाने आपला आवाका इतका वाढवला आहे की, जवळपास प्रत्येक क्षेत्रात तो आपले नशीब आजमावत आहे. या समूहाने २०२३ या आर्थिक वर्षात ४२,१७२ कोटी रुपयांचा मोठा महसूल मिळवला आहे. नफ्याबद्दल बोलायचे झाल्यास या कालावधीत कंपनीचा नफा ४ हजार कोटी रुपयांच्या पुढे गेला आहे.

विभाजन कुठे अडकू शकते?

कोणत्याही मोठ्या व्यवसाय विभागात अनेक गुंतागुंत असतात. गोदरेज समूहाबद्दल बोलायचे झाल्या इथेही एक समस्या दिसून येते. तज्ज्ञांच्या मते, कंपनीची मालमत्ता असलेल्या G&B च्या ३४०० एकर जमिनीचा प्रश्न सोडवणे महत्त्वाचे आहे. इक्विटी क्रॉसहोल्डिंगमुळे या जमिनीच्या वितरणात समस्या आहेत. मात्र, या समस्येवर अंतर्गत तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. याचे निराकरण करण्यात सर्वात मोठी समस्या त्याच्या मूल्यांकनाची आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Big news 1 76 lakh crore godrej group likely to be split vrd

First published on: 03-10-2023 at 13:54 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×