लोकसत्ता व्यापार प्रतिनिधी
मुंबई : रिझर्व्ह बँकेने बँकेतर वित्तीय कंपन्यांनी (एनबीएफसी) सोने तारण कर्ज घेणाऱ्यांना जास्तीत जास्त २०,००० रुपये रोख स्वररूपात वितरित करावेत, त्यापेक्षा अधिक नाही, असे स्पष्ट निर्देश दिले असून, प्राप्तिकर कायद्यानुसार दिलेल्या या निर्देशांचे काटेकोर पालन करण्यासही तिने फर्मावले आहे.  

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

आठवड्याच्या सुरुवातीला सोने तारण कर्ज क्षेत्रातील वित्तीय संस्था आणि बचतगट संस्थांना जारी केलेल्या सल्ला निर्देशांमध्ये, रिझर्व्ह बँकेने प्राप्तिकर कायद्याच्या ‘कलम २६९ एसएस’चे कसोशीने पालन करण्यास सुचविले आहे. या कलमानुसार, एखादी व्यक्तीला इतरांकडून ठेव किंवा कर्ज म्हणून रोख नोटांच्या रूपात कमाल २०,००० रुपये स्वीकारता येण्याची मर्यादा ठरवण्यात आली आहे.

हेही वाचा >>>देशाची सुरक्षा बाजारपेठ २०२९ पर्यंत ७३६ कोटी डॉलरवर जाण्याचा अंदाज

रिझर्व्ह बँकेने नुकतेच आयआयएफएल फायनान्सला अनेक गैरप्रथा अनुसरल्याबद्दल सोने तारण कर्ज मंजूर करण्यास किंवा वितरित करण्यास मनाई केली आहे आणि आता त्याचेच पुढचे पाऊल म्हणून हे निर्देश जारी केले आहेत. तथापि अनुपालनास प्राधान्य देण्यासाठी मध्यवर्ती बँकेकडून टाकण्यात आलेल्या या पावलांचे वित्तीय संस्थांनीही  प्रशंसा आणि स्वागत केले आहे. 