मुंबई: शहरी गजबजाटात, टाकाऊ वस्तू, कचरा आणि भंगार सामग्रीपासून निसर्ग-सुंदर थीम पार्क विकसित करण्यात आणि ते चालवण्यात विशेषज्ञता असलेल्या झेड टेक (इंडिया) लिमिटेड प्रारंभिक समभाग विक्रीतून (आयपीओ) ३७.३० कोटी रुपये उभारू पाहत आहे.
राष्ट्रीय शेअर बाजाराच्या ‘एनएसई इमर्ज’ या बाजारमंचावर सूचिबद्धतेसाठी या आयपीओ कंपनीने गुंतवणूकदारांना बोली लावण्यासाठी प्रति समभाग १०४ रुपये ते ११० रुपये असा किंमतपट्टा निर्धारीत केला आहे. वैयक्तिक गुंतवणूकदारांना किमान १,२०० समभागांसाठी बोली लावावी लागेल. या दिल्लीस्थित कंपनीच्या २९ मे ते ३१ मे या दरम्यान खुल्या असणाऱ्या आयपीओ प्रक्रियेचे व्यवस्थापन नारनोलिया फायनान्शियल सर्व्हिसेस या कंपनीद्वारे पाहिले जात आहे.
हेही वाचा >>> पीएफ खात्यातील शिल्लक रक्कम पाहा फक्त एका मिस्ड कॉलवर; काय आहे नंबर अन् प्रोसेस? घ्या जाणून
समभाग विक्रीतून उभ्या राहणाऱ्या निधीपैकी प्रवर्तक अथवा प्रवर्तक समूहापैकी कोणालाही निधी मिळणार नसून, त्यापैकी २३.७६ कोटी रुपये हे झेड टेककडून खेळते भांडवल म्हणून वापरात येणार आहे. कंपनीचे सध्या दिल्ली, उत्तरप्रदेश येथे सहा थीम पार्क कार्यरत असून, महाराष्ट्रात नागपूर, पिंपरी-चिंचवड यासह देशभरात एकंदर १० ठिकाणी या धर्तीची उद्याने कंपनीकडून विकसित केली जाणार आहेत. त्यासाठी स्थानिक प्रशासन आणि राज्य सरकारशी तिच्या वाटाघाटी अंतिम टप्प्यांत आहेत. शिवाय, औद्योगिक सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याच्या आणि मुख्यत: प्रदूषणकारी आणि रासायनिक उद्योगांना जैव-तांत्रिक उपाययोजना कंपनीकडून पुरविल्या जातात. कंपनीने दिलेल्या माहितीप्रमाणे तिच्याकडे सध्या १५८ कोटी रुपयांचे कार्यादेश आहेत. कंपनीने आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये ६७.३७ कोटी रुपयांच्या महसुलावर, ७.७९ कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला आहे.