Premium

सोन्याच्या भावाची उसळी, सहा महिन्यांतील उच्चांकी पातळी

मुंबईच्या सराफा बाजारात २४ कॅरेट शुद्ध सोन्याचा भाव तोळ्याला ८२० रुपयांनी वाढून ६३ हजार ३८० रुपयांवर पोहोचला. चांदीच्या भावानेही किलोमागे ७०० रुपयांची वाढ नोंदवून ७९ हजार २०० रुपयांची पातळी गाठली.

Gold-Silver Price on 16 February
सोन्याचे आजचे दर पहा (फोटो सौजन्य- लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

मुंबई : आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याच्या भावाने सहा महिन्यांतील उच्चांकी पातळी गाठली आहे. यामुळे देशांतर्गत बाजारपेठेतही सोन्याच्या भावाने बुधवारी उसळी घेतली. मुंबईच्या सराफा बाजारात २४ कॅरेट शुद्ध सोन्याचा भाव तोळ्याला ८२० रुपयांनी वाढून ६३ हजार ३८० रुपयांवर पोहोचला. चांदीच्या भावानेही किलोमागे ७०० रुपयांची वाढ नोंदवून ७९ हजार २०० रुपयांची पातळी गाठली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आंतरराष्ट्रीय पातळीवर सोन्याचा भाव प्रति औंस २,०४१ डॉलर आणि चांदीचा भाव प्रति औंस २४.९५ डॉलरवर पोहोचला आहे. याचवेळी ‘कॉमेक्स’ मंचावर वायदे व्यवहारात सोन्याचा भाव प्रति औंस २७ डॉलरने वाढून २,०४१ डॉलरवर गेला. डॉलरमध्ये झालेली घसरण आणि अमेरिकेची मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हकडून पुढील वर्षापासून व्याजदर कपातीचे संकेत आहेत. त्यामुळे सोन्याच्या भावात तेजी दिसून येत असून, भावातील हा मे महिन्यानंतरचा उच्चांकी स्तर आहे, अशी माहिती एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक सौमिल गांधी यांनी दिली.

हेही वाचा… विकास दरात दुसऱ्या तिमाहीतही वाढीचे अनुमान, आज अधिकृत आकडेवारीची घोषणा

हेही वाचा… ‘इरेडा’च्या शेअरचे पुढे करावे काय? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत, ‘इरेडा’च्या भागधारकांना पहिल्याच दिवशी ८७ टक्क्यांचा लाभ

दिवाळीनंतर भाव तेजी…

जागतिक पातळीवरील तेजीचे पडसाद देशांतर्गत सराफा बाजारातही उमटले. मुंबईतील सराफा बाजारात सोन्याचा भाव बुधवारी तोळ्यामागे ६३ हजार ३८० रुपये या आतापर्यंतच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला. मुंबईतील सराफा बाजारात मंगळवारी सोन्याचा भाव तोळ्याला ६२ हजार ५६० रुपयांवर होता. दिवाळीतही सोने नरमलेले होते, नंतरच्या १० दिवसांत मात्र किरकोळ भावात (कर वगळता) प्रति १० ग्रॅम तब्बल १,७४० रुपयांची वाढ झाली आहे. चांदीच्या किरकोळ भावातही गत १० दिवसांत किलोमागे ३,२०० रुपयांची वाढ झाली आहे.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Gold price touches six months high print eco news asj

First published on: 30-11-2023 at 13:27 IST
Next Story
विकास दरात दुसऱ्या तिमाहीतही वाढीचे अनुमान, आज अधिकृत आकडेवारीची घोषणा